ब्रेकींग - नैराश्य != केमिकल लोच्या
ब्रेकींग - नैराश्य != केमिकल लोच्या
======================
एक महत्त्वाच्या व्यापक आढाव्यातून आढळले आहे की नैराश्य हे रासायनिक असंतुलनामुळे होते याला कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत.
ब्रेकींग - नैराश्य != केमिकल लोच्या
======================
एक महत्त्वाच्या व्यापक आढाव्यातून आढळले आहे की नैराश्य हे रासायनिक असंतुलनामुळे होते याला कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत.
किडकी प्रजा आणि ’ब्रेन रॉट’
===============

मी काही वर्षांपूर्वी विशिष्ट उद्देशाने (समाजाला जागे करण्याच्या) तयार केलेला शब्द प्रयोग काही जणांना अपमान कारक वाटतो. बरं ’किडकी प्रजा’ हे शब्द कुणा विशिष्ट गट किंवा समूहाला टारगेट करून अपमानित करण्यासाठी तयार केलेले नाहीत. एखाद्या महालात राहणार्या व्यक्तीपासून ते रस्त्यावर राहणार्या व्यक्तीपर्यंत कुणीही "किडू" शकतो. मग मला धमक्या पण दिल्या जातात. पण ’पोपट मेला आहे, हे सर्व सार्वत्रिक सत्य कुणालाही स्वीकारायचे नसते.
ग्रोक४
===
बहुचर्चित ग्रोक४ चे नुकतेच अनावरण झाले. मी ग्रोक३ ची सशुल्क सेवा घेत असल्याने आणि मी त्याबाबत समाधानी असल्याने ग्रोक४ काय करणार याची उत्सूकता होतीच.
ग्रोक४ च्या लोकार्पणाचा समारंभ इथे बघायला मिळाला.
https://www.youtube.com/watch?v=MtYsUdfZPMA
या दृक्फितीमध्ये तंत्रसामर्थ्योद्धत महामंडलेश्वर इलॉनशास्त्री मस्क यांचे गर्वसूक्त ऐकून धक्का बसला. सुमारे दीडेक वर्षापूर्वी एका जपानी समूहाने लवकरच ए०आय० पीएचडी दर्जाचे काम करू शकेल असा दावा केला होता.
काही महिन्यांपूर्वी मराठीचिये नगरी पुण्याला गेलो होतो. बाप आपल्या दोन वर्षाच्या मुलीशी आंग्ल भाषेत बोलत होता. दोन्ही उच्च शिक्षित नवरा -बायको ही त्याच भाषेत बोलत होते. दोन दिवस तिथे राहिलो आणि मला आपण "अनपढ़ गंवार" आहोत असा फील येऊ लागला. त्याची लेक बाहेर खेळताना इतर मराठी मुलांशी हिन्दीत मिश्रित आंग्ल भाषेत बोलत होती. बाहेर हिन्दी आणि घरात आंग्ल. लेकीसाठी मराठी भाषा परकी झाली होती. तिच्या वडिलांना ही चूक म्हणू शकत नाही. प्रत्येक पालकला वाटते त्याच्या मुलाने उत्तम दर्जाचे शिक्षण घ्यावे आणि उत्तम पगारची नौकरी त्याला मिळावी.


सायकोपथी हा गुंतागुंतीच्या समाजघातक वर्तनाला कारणीभूत ठरणार्या व्यक्तीमत्वातील बिघाडांचा समूह मानला जातो. अशा बिघडलेल्या व्यक्तीमत्त्वाच्या लोकांना सायकोपॅथ अशी संज्ञा आहे. अशा व्यक्तींची ठळक वैशिष्ट्ये अशी असतात-
(हा लेख लिहण्यापूर्वी उद्यानात सकाळी पाच ते आठच्या दरम्यान अनेक स्वास्थ्य साधकांशी वार्तालाप केला आहे.)
एक मुलाखत:
“नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली.
“पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले.
✪ Too much comfort ultimately leads to much discomfort
✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक
✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का?
✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू?
✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर?
✪ आपत्ती येणारच आहेत
✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो?
मंडळी,
चर्चेसाठी एक रोचक विषय आहे. न्यायाधीशांना अक्कल शिकवणारे, अधिक्षेप करणारे वकील असंख्य असतात. पण वकीलांना सूतासारखे सरळ करणारे न्यायाधीश पण विरळाच...
मला न्यायालयीन कामकाजाच्या क्लिपा बघायचा छंद लागला आहे. त्यात हे एक न्यायाधीश महाशय सापडले. ते कायम अशा रूद्रावतारातच कोर्टरूममध्ये दिसतात.
त्यांच्या पुढील मुलाखतीत ते म्हणतात, कोर्टात दाव्यांचा महास्फोट झाला आहे. हे एक प्रकारे चांगलेच आहे. कोर्टातल्या दाव्यांची संख्या आणखी वाढायला हवी.