Skip to main content

वकीलाना टाटा-बायबाय

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 02/06/2025 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
ए० आय० ने अनेक क्षेत्रात धूमाकूळ घालत आपले पाय रोवले आहेत. ए० आय० मुळे आता वकीलांना लवकरच "टाटा-बायबाय" करायची वेळ आली आहे. असे झाले तर कायद्याच्या लढाया लढण्यासाठी उर्मट आणि स्वत:च्याच अशीलांचे रक्त पिणार्‍या, तसेच फसवणार्‍या वकीलांना मोठी जरब बसेल अशी चिन्हे आहेत. अर्थात अडाणी लोकांना ही जमात फसवत राहीलच... https://youtu.be/WoqcSIcdx-Y?si=FURG5R1kytIfSUeB

पुस्तकं..

लेखक आजी यांनी सोमवार, 26/05/2025 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात. जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं.

प्रा. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

लेखक कपिलमुनी यांनी मंगळवार, 20/05/2025 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय खगोलशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र यांचे दिग्गज प्रा. जयंत नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ भारतीय विज्ञानच नाही तर जागतिक विज्ञानसमाजानेही एक महान विचारवंत, संशोधक आणि समाजसुधारक गमावला.

आव्वाज आव्वाज..

लेखक आजी यांनी मंगळवार, 13/05/2025 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात. पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात. यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.

मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 13/05/2025 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप https://youtu.be/oq35bx7ktEM?si=SHdxD8Kmglr2iXD5 माझी उत्तरे प्रश्न १ - समझौत्याची घोषणा भारत आणि पाक यांच्या ऐवजी त्रयस्थ पक्षाने करणे केव्हाही हितावह. जो पक्ष समझौत्याची भाषा करतो तो कमकुवत मानला जाऊ शकतो. भारताने अशी घोषणा केली असती तर पाकला आयते कोलीत मिळाले असते. प्रश्न २ भारताच्या परराष्ट्र नीतीची कोणतीही अडचण झाली असे मला वाटत नाही. कोणत्याही युद्धात सन्मान्य माघार विजया इतकीच महत्त्वाची असते.

समईतलं तेल संपूनही उरणारं तेज

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/05/2025 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते! नऊ दशकांचा प्रवास केलेली माझी आजी- सौ. स्नेहप्रभा नारायणराव वेलणकर. जिचे तीन भाऊ दुसर्‍या महायुद्धात युरोप व आफ्रिकेत लढले होते! जिने इंग्रजांपासून अँड्रॉईडपर्यंतचा काळ बघितला!

माध्यमांची आरडाओरड

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 09/05/2025 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच काही आठवड्यापूर्वीचा (पहलगाम घटनेच्या अगोदरचा) एक प्रसंग... एका कंपनीत फायर ड्रील चालू होते. त्यात त्यांना आकस्मिक परिस्थितीमध्ये काय करायचे (उदा० हातातले काम टाकून संकटकालीन मार्गिकेकडे जाण्याच्या) याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर काही दिवसांनी लोकांची तयारी बघण्यासाठी एक दिवस अचानक सायरन वाजवण्यात आला. त्यावर लोकांनी काय करावे? त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना फोन करून "आता काय करायचे" असा प्रश्न विचारला, तेव्हा संबंधितानी कपाळाला हात मारला. आपात्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसाधारण भारतीय नागरिक कसा बेपर्वा किंवा मठ्ठपणे वागतो, हे सर्वांनी करोना काळात बघितले.

कळविण्यास आनंद वाटतो की...

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 04/05/2025 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मला काही वर्षांपूर्वी फेसबुकमुळे छंद जडला - जगभर पाळीव म्हणून मनुष्याच्या संपर्कात वाढलेल्या प्राण्य़ांची रिल्स मधून निरिक्षणे करण्याचा. यात मुख्यत्वे कुत्री आणि इतर प्राणी, पक्षी यांचा समावेश होता. यापूर्वी मी अनेक नामवंत मानववंश शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा परिचय करून घेतला होता. फेसबुक वरील रिल्स मुळे डेस्मण्ड मॉरीसच्या अनेक निरीक्षणावर शिक्कामोर्तब झाले. उदा० क्रॉस स्पिसीज मेटींग, प्राण्यांमध्ये पण हस्त/स्वमैथुनाच्या नैसर्गिक प्रवृत्ती अ्सतात, हे बघायला मिळाले.