डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भारताच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली, भारताचे संविधान लिहिले .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अजून एक पैलू म्हणजे त्यांचे इकॉनॉमिक्स या क्षेत्रातील योगदान! त्यांनी या विषयात अनेक डिग्री मिळवल्या आणि त्यांनी यात त्यांची डॉक्टरेट पण मिळवली होती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय आणि त्याचे भारतीय इतिहासातील महत्त्व आपण या लेखात बघणार आहोत.