वेळणेश्वर
रास्तों पर निगाह रखने वाले, मंज़िल कहाँ देख पाते हैं|
सफर तो ताउम्र हैं, दरमियाँ सुकून के दो-पल कमाने है|
रास्तों पर निगाह रखने वाले, मंज़िल कहाँ देख पाते हैं|
सफर तो ताउम्र हैं, दरमियाँ सुकून के दो-पल कमाने है|
जानेवारी 2022मध्ये ऐन थंडीच्या कडाक्यात आम्ही मणिपूर राज्याची एक छोटेखानी, चार दिवसीय, रोमांचक रस्ता सहल स्वतःच्या चतुष्चक्रीने केली होती. इंफाळ, लोकटाक व मोरे या ठिकाणी भेट दिली होती व इंफाळमध्ये एका उच्यमध्यमवर्गीय मैती कुटुंबाने चालवलेल्या airbnbमधे राहिलो होतो.
मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यात उफाळलेला कुकी- मैती संघर्ष हिंसेच्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या वाचून ती सहल पून्हा आठवली.
या दुव्यावर इथे माझ्या ब्लॉगवर या सहलीचा प्रकाशचित्र वृत्तांत आहे. इंग्रजीत असला तरी समजण्यास कठीण जाऊ नये.
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.
Thrills on Wheels
( Thane - Statue of Unity - Thane)
चौथा टप्पा
२६ जानेवारी. आजपासून परतीचा प्रवास सुरू. येताना जेव्हढे रिलॅक्स होतो त्यापेक्षा जरा काळजीत होतो. काळजी एवढ्याचसाठी की आलो तेव्हा कुठे थांबणार हे पक्क होत, हॉटेल बुक केलेली होती. आता आम्ही आमचा अंदाज घेवून त्यातल्या त्यात मोठ्या शहरात जाऊन मग तिथे हॉटेल बघून राहणार होतो. त्यामुळे वेळेत निघणं, वेळेत पोहोचणं गरजेचं होत. सुरवातीला अंकलेश्र्वर नक्कीच होत.
Thrills on Wheels
( Thane - Statue of Unity - Thane)
तिसरा टप्पा
लेख वाचण्यागोदर पूर्वसूचना - हा लेख १० दिवसीय नर्मदा पदपरिक्रमेच्या (परिभ्रमणाच्या) अनुभव कथनावर आधारीत आहे.
Thrills on wheels
( Thane - Statue of Unity - Thane)
दुसरा टप्पा
सकाळी ५ वाजता उठून तयार होऊन सायकल खाली घेवून आलो नि बॅग सायकलला जोडल्या. माझी मैत्रीण कांचनचा नवरा सूरज सायकलिस्ट आहे. तो आम्हाला ठाण्याहून अहमदाबाद हाय वे पर्यंत सोबत करणार होता. बरोबर ६ वाजता तो हजर झाला.ठाण्याचे एक एक रस्ते पार करत घोडबंदरच्या चढाला लागलो. सुदैवाने अजिबात ट्रॅफिक नसल्याने आणि सकाळच्या फ्रेश मूड मध्ये चढ चढून उतार एकदम मस्त उतरलो. काशिमीरा जंक्शन ला उजवीकडे वळून अहमदाबाद हाय वे ला लागलो.