धामणस्करांची 'वोक' कविता
काही मराठी संत कवींनी शृंगार आणि अहंकारपती रचनांचा उपयोग आधी शृंगारीक रंजनाच्या जाळ्यात ओढून षडरीपूंच्या धोक्यांपासून श्रोत्यांना सावध करण्यासाठी केलेला आहे. परवा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्ये धाग्यावरील विवीध मिपाकरांचे प्रतिसाद वाचत वाचत अस्मादीकांची गाडी मारवाजींच्या प्रतिसादांपर्यंत पोहोचली. त्यांच्या सुरवातीच्या प्रतिसादांवरून आठवले ते 'जनतेच्या' महाविद्यालयातील पदव्यूत्तर वाणीज्यचे 'बिझनेस कम्युनीकेशन' विषयाचे रिटायरमेंटला आलेले एक प्राध्यापक. वर्गात मुख्यत्वे मुलींची बहुसंख्या होती.