नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.
आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.
१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूर जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )
२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५
३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
प्रतिक्रिया
13 Oct 2025 - 11:53 am | विजुभाऊ
नव्या घडामोडीत राज उद्धवर एकत्र येणार अशा बातम्या येताहेत. पण ते एकत्र येऊन काय होणार आहे हेच कळत नाही.
वर्तमानपत्राना बातम्या दाखवता येतील इतकेच.
उद्धवनी कितीही जाहीर केले तरी राज मात्र कोणत्याच बातमीवर मत प्रकट नाहियेत. उबाठांच्या पक्षाचे प्रतोद मात्र रोज वेगवेगळ्या विषयावर कुणी न विचारताच मतप्रदर्शन करत आहेत
13 Oct 2025 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत. महाराष्ट्राने आता इतके बदल पाहिले आहेत की त्याची काही मर्यादा राहिली नाही. तेव्हा, हाही बदल महाराष्ट्राने एकदा पाहुनच घ्यावा.
स्व.बाळासाहेबांनी उद्धव ऐवजी राज यांचीच तेव्हा निवड करायला पाहिजे होती असे मला कायम वाटले आहे.
-दिलीप बिरुटे
13 Oct 2025 - 7:49 pm | सुबोध खरे
बैल गेला आणि झोपा केला.
या म्हणीची आठवण झाली.
मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही.
13 Oct 2025 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली
मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही. .
निवडणूक आयिगाने भाजपला मदत न करता प्रामाणिक निवडणूक घेतल्या तर नक्की होईल.