माझी दिवाळी
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
मंडळी
मी आज एक फार मोठा स्टंट केला.
ही कल्पना माझ्या डोक्यात स्वतंत्रपणे चमकली असली तरी पूर्णपणे माझी नाही. असे तुरळक प्रयोग जगात काही ठिकाणी चालु आहेत. या प्रयोगाचे दुरगामी परिणाम एआय २.० च्या स्वरूपात आपल्याला लवकरच दिसतील.
समजा दोन ए०आय०ना विशिष्ट विषयावर चर्चा करायला सांगितलं तर?
या मागचा विचार असा की दोन स्वतंत्रपणे विकसित केलेल्या मॉडेल्सच्या ट्रेनिंग/ज्ञानाचा फायदा मिळून चर्चेत जास्त खोली आणि सजीवपणा येईल.
कवि - डॉ० सलील कुलकर्णी
नवीन डेटा पॅक दे रे
आभाळावर थुंकीन म्हणतो
रोज वेगळं नाव लावून
लपून लपून भुंकीन म्हणतो
याच्या साठी काही म्हणजे
काही सुद्धा लागत नाही
कोऽणी इथे तुमच्याकडे
डिग्री वगैरे मागत नाही
कष्ट नको, ज्ञान नको
विषयाची जाण नको
आपण नक्की कोण कुठले
याचे सुद्धा भान नको.
खुप सारी जळजळ हवी
विचारांची मळमळ हवी
दिशाहीन त्वेष हवा
विनाकारण द्वेष हवा
चालव बोटे धारदार
शब्दामधून डंख मार
घेरून घेरून एखाद्याला
वेडाकरून टाकीन टाकीन म्हणतो
प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो याचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी (सर्व खेळ धरून) हा एक. इन्स्टाग्रामवर याचे सर्वाधिक अनुयायी आहेत. अर्थातच सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी सुद्धा आहेच.
आयुष्य शांततेत घालवायचे असेल तर आयुष्यात दुष्ट आणि विषारी लोकांना खड्यासारखे बाजूला करता आले तर आयुष्य प्रवाही बनते. ही माणसे सहसा कोडगी असतात आणि परत-परत आपले विषारी अस्तित्व प्रकट करत राहतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवताना चडफडतात आणि उघडी पडतात आणि मग जिवाच्या आकांताने अनैतिक मार्गाचा अवलंब करतात. आपण सावध राहिलो तर एक वेळ अशी येते की मग ती उघडी पडतात.
#नवरात्री निमित्ताने
परवा एक आंतरजालीय व्याख्यान ऐकत होते त्यामध्ये हडप्पा काळापासून ते आताच्या काळापर्यंत 'घट' (मडके) याचे बदलले स्वरूप, त्या निगडीत प्रथा सांगितल्या गेल्या. व्याख्यान जरी घाईत ऐकले तरी काही मुद्दे लक्षवेधक, नवीन होते.
आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख
ए०आय० आणि उत्पादकता
-- राजीव उपाध्ये
गेल्या काही वर्षांपासून खगोलात काही नाविन्यपूर्ण घटना घडत आहेत. म्हणजे आपल्या सूर्यमालेत बाहेरून येणाऱ्या काही वस्तू. २०१७ पासून, आपल्याला फक्त तीनच अशा वस्तू माहीत झाल्या आहेत ज्या दूर अंतराळातून आपल्या सूर्यमालेत आल्या आहेत.
वडील गेल्याने अचानक सुट्टी घेउन त्याला भारतात यावे लागले. चुलत भावांनी सुरुवातीचे विधी केले होते, पण "निदान पिंडदानाला तरी ये" म्हणुन त्याला गळ घातली होती. गुरुजी आले. त्यानी सगळे विधी समजावुन सांगितले. त्यावर तो आढ्यतेने म्हणाला" माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ थोडक्यासाठी वाद नकोत म्हणुन मी हे सर्व करायला तयार झालोय."
सगळे घाटावर पिंडदानाला जमले. बराच वेळाने एक कावळा पिंडावर उतरला आणि भाताची मूद चिवडु लागला. त्याला एकच पाय होता. याने काही वेळ पाहीले मात्र आणि धाय मोकलुन रडु लागला. गुरुजींना कळेना काय झाले? त्यानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले.