पत्रास कारण की
मा० राष्ट्रपती
मा० पंतप्रधान
मा० सरन्यायाधीश,
भारत सरकार
स० न० वि० वि०
या देशाचा नियमित कर भरणारा आणि कायद्याला भिणारा एक नागरिक म्हणून मला देशातील अधिकाधिक गढूळ वातावरणाची चिंता वाटते. आजचे गढूळ वातावरण भविष्याचा पाया असल्याने ते जास्त धोकादायक आहे. मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.