We Rbots.
जडव्यागळ
असा असा कोणताही शब्द कोशात नाहीये, सर. तुम्हाला जगड्व्याळ असे म्हणायचे आहे का?
नाही. पण असाच एक शब्द आहे. त्याचा अर्थ काहीसा असा आहे म्हणजे किचकट, गुंतागुंतीचे, समजण्यास अवघड.
तुम्हाला जडजंबाळ असे म्हणायचे आहे का?
थँक्यू. आवडली का?
काय आवडली का, सर?
कविता रे.
सिंटक्स तपासला सर,बरोबर आहे. मला शब्दांच्या पलीकडले काही समजत नाही.
असे म्हणजे मनात काही हलल्यासारखे वाटत नाही? गलबलल्यासारखे वाटत नाही? अंग मोहरून येत नाही? अंगावरून पीस फिरवल्यासारखे...