सहज सुचलं म्हणून
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
पात्रे:
1. धाग्याबाबा - राजकीय लेख लिहिणारा, वाद निर्माण करण्यात पटाईत
2. प्रथम प्रतिसादक - लेखावर जोरदार समर्थन करणारा
3. द्वितीय प्रतिसादक - लेखावर चिरफाड करणारा
4. वाचक - वादाच्या गोंधळात सापडलेला साधा नागरिक
---
(पडदा उघडतो. एका कॅफेच्या कोपऱ्यात धाग्याबाबा लॅपटॉपवर टाइप करत बसलेला आहे. प्रथम आणि द्वितीय प्रतिसादक फोनवर चर्चा करतायत. वाचक एका टेबलवर शांत बसून वर्तमानपत्र वाचतो.)
---
इस रंग बदलती दुनिया मे ...
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे
परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो.
फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
मन कशात लागत नाही,
अदमास कशाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥
-ग्रेस
मित्रहो अशाच मनस्थितीत गेले काही दिवस चालले होते,चिडचिड होत होती.गदिमांच्या गीतरामायणा मधील प्रभू श्रीरामाच्या तोंडून वदवलेल्या प्रसिद्ध ओळी सांत्वन करण्यास कमी पडत होत्या.
"खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".
सकाळी नऊ वाजता उठलो चित्रगुप्त काकांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा मिनिट चालत गेलो, मला T3 ट्रॅम पकडायची होती. तिथून तिकीट काढून ट्रॅम धरली आणि शेवटच्या स्टेशनला पोहोचलो तिथून दुसरी पकडायची होती. एक कृष्णवर्णीय फ्रेंच कर्मचार्याला मला या स्टेशनला जायचंय असा एका इंग्लिश येणाऱ्या मुलीच्या मदतीने सांगितलं. त्याने मला यापुढे ट्रॅम जाणार नाही कारण काम चालूय, त्यासाठी ट्रॅम ने वेगळी बस सुविधा दिलीय ती सुविधा वापर आणि त्या समोरच्या स्टेशनला जाऊन उभा रहा. तिथून ट्रॅम ची बस पकड. मी स्थानकावर जाऊन उभा राहिलो बराच वेळ गेला तरी ट्रॅमची कुठलीही बस आली नाही.
सुम्याच्या लहानपणातल्या प्रेमासंबंधाच्या सतावणार्या त्या आठवणी
सुम्या,तिची मुलगी आणि नवरा घाईगर्दीने कोकणात गेली होती कारण,सुम्याची आई बरीच आजारी होती.एक महिना ती कोकणात राहिली.आईला मुंबईला आणून चांगल्या डॉक्टरला दाखवायचं असा त्यांचा विचार होता.पण हा विचार ऐकून आई खूप नाउमेद झाली. आणि दोन दिवसातच तिचा अंत झाला. सुम्याला आता बेत बदलावा लागला. म्हातार्या वडीलाना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी केला.आणि त्याप्रमाणे कोकणातलं घर बंद करून वडीलांना घेऊन ती सर्व मंडळी मुंबईला आली. जाताना गुरूनाथच्या आईवडीलांकडे त्यानी घराची चावी दिली आणि घरावर लक्ष ठेवायला विनंती केली.
आयुष्यातील वरवर लहान वाटणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी इतक्या लहान नसतात. शेतात काम करताना माझ्या सभोवतालचं नैसर्गिक सौंदर्य आणि काही नकळत होणारी नैसर्गिक
परिवर्तनं लक्षपूर्वक पाहिल्याने मला हे कळू शकलं.
माझ्या लहानपणी माझ्या आजोबांच्या शेतात काम करताना मला याची जाणीव झाली.
मला नांगर चालवायला आणि मी ओढत असलेली अवजारं पाहणं, जमिनीवर काम करणं आवडायचं. आणि हे सर्व करत असताना सभोवती फेकली जाणारी धूळ कशी चोहीकडे फेकली जाते, एव्हढंच नाही तर वर आकाशाकडे जाणारी धूळ आणि त्यातून नकळत होणारी कृत्य आणि कुकृत्य पाहून अचंबा वाटायचा.
काय करावे तजवीज आहे
काय करावे मन उद्विग्न आहे
काय करावे काफिला मार्गस्थ
असताना स्तब्ध झाला आहे
काय करावे प्रसन्नता शोधीत
असताना अनुपस्थित झाली आहे
काय करावे मित्राची जरूरत
असताना नाराज झाला आहे
काय करावे संवाद मनस्थितीचा
असताना नियम लागू झाला आहे
काय करावे हर एक व्यक्ती
अपुला फायदा शोधीत आहे
काय करावे चोहिकडून फक्त
आश्वासन प्राप्त होत आहे
मला वाटतं की बीचवर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ रात्रीची आहे.
मला माझे पाय उबदार वाळूमध्ये रुतून ठेवण्यात मजा येते.भरतीच्या लाटेचं किनाऱ्यावर वेगाने येणारं पाणी पायावर घ्यायला मला मजा येते.
माझ्या सर्व समुद्रकिनाऱ्यावरील अनुभवांपैकी, सर्वात सुंदर आठवणी, तारांकित आकाशाखाली सूर्य मावळल्यानंतरच्या आहेत.
माझ्या लहानपणी प्रत्येक उन्हाळ्यात मी आणि मित्रांचा एक छोटा गट, ही मजा लुटायला बीचवर जात असूं.