ढग हे माझे अनोळखे खरे मित्र.
मी अनेकदा पावसावर,वादळांवर लिहिलं आहे.
पण ह्या गोष्टींचा उगम करणाऱ्या ढगांवर लिहिलं नाही.आज मला माझ्या लहानपणी शेतात काम करतानाच्या आठवणी येऊन,भर
पावसाळ्यात शेतात काम करत असताना पावसाची सर आल्यावर धावत घरात जाण्या अगोदर, आकाश कसं ढगाळायचं याची आठवण
आली आणि ढग आठवले.
मी ढगांकडे माझे अनोळखी मित्र समजून पहायचो आणि पहातो.
आभाळात विहरणाऱ्या ढगांकडे विशिष्ट नजरेने त्यांच्याकडे टक लावून मला पाहावसं का वाटायचं, हेच कळत नाही.
मला एक गोष्ट माहीत होती: मला माहीत होतं की हवेवर मुक्तपणे राज्य करणारे ढग सुंदर होते. ढगांचा साधेपणा आणि सौंदर्य निर्विवाद होतं.