आनंदयात्री
सरल्या साऱ्या चिंता खंती
उरल्या नुसत्या खाली भिंती
नाही कुणाचे उगा लोढणे
दुसर्या साठी उगा कुढणे
संपून गेले वसंत वैभव
भोगत आहे शिशीराचे यौवन
फणसा सारखे पिकले गरे
आपण बरे,आपले काम बरे
पांघरून भूत भूतकाळाचे
वेध लागले भविष्याचे
खेद ना खंत या भूताचा
विचार आता फक्त स्वताचा
आनंदयात्री या जगातील
वाट चालतो अनंताची
ठेऊन दृष्टी अदृष्यातील
वाट पाहतो गंतव्याची