हिरवाई

(वळण)

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
29 Mar 2020 - 6:37 pm

(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत

प्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजाgholmiss you!अदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरस

आगळा अनुराग

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
13 Jul 2018 - 11:10 am

आगळा अनुराग

रान हिरवे लाजलेले लाजल्या त्या रानवेली
निर्झराला जाग आली मेघ आले सांजवेळी

कोणता तो जलद वेडा भिजवुनी गेला धरेला
वृक्षगर्भी ओज आले तेज हिरव्या कांकणाला

अंबरावर रेखिली आरक्त नक्षी गूलबक्षी
अन नभाच्या लाजण्याला रक्तवर्णी सुर्य साक्षी

एक रस्ता कोरडासा खेळला त्या पावसाशी
पावले तेथे कळ्यांची नाचली पाण्यात खाशी

साजरी झाली धरित्री लेवुनी बेबंध वारा
वाहले रस यौवनाचे पावसाची बनुन धारा

रात्र गरती होतसे मग जाहले आरक्त डोळे
आगळा अनुराग जागे बरसती ते मेघ ओले

© विशाल कुलकर्णी

कवितावृत्तबद्ध कविताहिरवाई

'गुलज़ार'

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
21 Aug 2017 - 6:18 pm

सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे
काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे!

दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे
की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे!

जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे
जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे!

कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे
शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे!

शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर
चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे!

—सत्यजित

कवितागझलमराठी गझलहिरवाई

पहाट धुके २

Pradip kale's picture
Pradip kale in जे न देखे रवी...
11 Jan 2017 - 6:42 pm

नमस्कार. हि माझी दुसरी कविता. माझ्या पहिल्या कवितेचे नाव देखील पहाट धुके हेच होतं. दोन्ही कवितां मधे काहीही फरक नाही. फक्त शब्दरचनेत बदल आहे. फरकच नाही तर मग हि कविता लिहली कशासाठी असेहि वाटु शकते. तर निसर्गाचे अनेक अवतार आहेत, कधी शांत वाटनारा निसर्ग अचानक रौद्र रूप घेतो तर कधी इतका रम्य वाटतो की आपण याच्या प्रेमात पडतो. आणि अशा रम्य क्षणांच कितीही वर्णन केले तरी कमीच आहे. पहाटेची वेळ ही अशाच क्षणाच उदाहरण. शांत वारा, बोचरी थंडी आणि धुक्याची चादर खुपच सुंदर दृश्य, त्याच कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे.

कविताकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीहिरवाई

'बघणं' राहूनच गेलं

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
29 Dec 2016 - 3:37 pm

...

शब्दांमागे धावण्यात
'बघणं' राहूनच गेलं
रस्त्याकडेचं इवलं रोपटं
कुणी न बघताच मेलं

शब्दांचा पसारा हवा
मोर-पिसारा नको
शब्दात उलगडून सांगा
'नुस्तं बघणं' नको

'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात
सौंदर्यगंध दरवळतो
समजून घेण्याच्या नादात
तोच नेमका हरपतो

संस्कृतीकलासाहित्यिकसमाजमौजमजाअदभूतकविता माझीप्रेम कवितामुक्त कविताहिरवाई

पहाट धुके

Pradip kale's picture
Pradip kale in जे न देखे रवी...
30 Nov 2016 - 1:39 pm

नमस्कार , माझं मिपावरील हे पहिलच लिखान आहे. आज पर्यंत फक्त एक मुकवाचक होतो. तर प्रथम थोडं कवितेबद्दल सांगतो. खरतर माझी ही चौथी कविता आहे. पहिल्या तीन कविता लिहलेले कागद हरवल्या नंतर मी एका वहीत कविता लिहायला सुरवात केली. काही दिवसाने ही वहीदेखील हरवली. पण मागच्या दोन महीण्याखाली जुनी पुस्तके चाळताना त्या गठ्ठ्या मधे ही वही सापडली. आणि खजिना सापडल्यासारखा आनंद झाला. आणि त्या कविता पोस्ट करू करू म्हणत आज मुहुर्त आला.

कविताकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीमुक्त कविताहिरवाई

(हूं)

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
4 Oct 2016 - 11:44 pm

आमची प्रेरणा

आशा मनात तुझी धुसर धुसर,
मागताना आवाज कातर कातर,
स्मरता जुन्या त्या आठवणींना,
दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!!

क्लायंट कायम करतो काशी,
म्हणतो पगार कसा छापाल छापाल
मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला
शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!!

डिजाइन टीमची असते बोंब
रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर,
क्यूएची आहे नसती कटकट मागे ,
बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!!

विडंबनइशाराकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीभूछत्रीरतीबाच्या कविताहिरवाईहास्य

स्वप्नातली शामली

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जे न देखे रवी...
1 Jun 2016 - 10:39 pm

तुझी आठवण आता येतच नाही ,
समजावलय मी या वेड्या मनाला.
पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे,
पण या काळजावर दगड ठेवला ..
तुझा तो हसरा चेहरा खरच खुप आवडत होता ग मला ,
मग का नकार दिलास तु या वेड्या जीवाला.
तुझ्या डोळ्यातील ती काजळ मला क्षणात घायाळ करायची सखे.
पण हळुहळु ती काजळ फिकी पडली.
आता तुला माझी नजर नाही शोधणार ..
कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार.

तुझ्या विना खरचं मी काहीच नाही .
पण आता अस वाटतय मी एकटा आहे हेच बरं आहे.
तु माझी मी तुझा हे आता होणे अशक्यच आहे.

( स्वप्नातली शामली)

मांडणीकविताप्रेमकाव्यरेखाटनकविता माझीहिरवाई

जीव नांगरटीला आलाय

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
27 Apr 2016 - 10:09 pm

उनाचं नुसतं मजी नुसतं तापत हुतं
घंघाळभर पाण्यानं भागंना
आता हिरीतंच खुपशी घालावी म्हूण
खळ्यावर आलू

बांधावर फिरताना जवा
सोग्यानं त्वांड पुसलं
तवा म्होरल्या वावरात मला
ऊसाचं कांडं रवताना
उफाड्याचं सामान दिसलं

आभाळाची पाखरं भिरीभिरी हाणत
पायताणं तिकडं वळावली
मग दगडं घेऊन गोफणीत
जवारीवरं भिरकावली

तसं म्होरलं वाफं सोडून
सामान मधल्या आळ्याकडं आलं
कंबरचा काष्टा काढून
निऱ्या सावरत ताठ उभं झालं

वावरमौजमजाकाहीच्या काही कवितावाङ्मयशेतीहिरवाई

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
5 Jan 2016 - 1:06 pm

प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...

कवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडारेखाटनdive aagarvidambanअनर्थशास्त्रअनुवादअभंगआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचिकनचौरागढछावाजिलबीनागद्वारप्रवासवर्णनप्रेम कविताफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमराठीचे श्लोकमुक्त कवितावाङ्मयशेतीविठ्ठलशिववंदनाशृंगारहिरवाईहास्यशांतरस