Skip to main content

आठवणी

सैल धागे

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 06/02/2026 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी: शेवटचं तुला भेटायचं राहून गेलं, स्वप्नच तू, जगायचं राहून गेलं... चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ, त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं... ती: अंतरातले अंतर मोजताना, अंतर काही संपत नाही… (२) अंतरात माझ्या पाहताना, अंतर तुला तिथेही नाही. मी: माळले नवकिरणांनी नभाचे हार, रात्रीस बिलगायचं, शेवटचं राहून गेलं... बांधले नजरेचे पूल या डोळ्यांनी, तुझ्यासवे शेवटचं चालायचं राहून गेलं... ती: चंद्र विसावला अंतरी तरी, अंतरात हे कसले अंतर? अंतरात खोल दडले, तुझे माझे सैल धागे - शब्दमेघ (६ फेब्रुवारी २०२६)
काव्यरस

काही आठवणी शब्दांत अडकतात… ❤️ | Marathi Kavita | Truptis Kavita

लेखक तृप्ति २३ यांनी रविवार, 18/01/2026 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी आठव्याला गेलं की खरंच खूप आठवणी आठवतात काही आठवणी गाण्यांमध्ये रमतात तर काही शब्दांमध्ये अडकतात काही आठवणी चेहऱ्यावर उगाच हसू आणतात तर काही आठवणी उगाच मनास छळू पाहतात काही आठवणी पुन्हा आठवणी मध्ये गुंतवतात तर काही आठवणी आठवणींचा गुंता सोडवू पाहतात काही आठवणी आयुष्य सुंदर बनवतात तर काही आठवणी आयुष्य जगायला शिकवतात. ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. ❤️ व्हिडिओला LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! Written By: Trupti S. Tilloo https://www.youtube.com/@truptiskavita

सणासुदीची सफाई

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 17/10/2025 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

'मिसळपाव' चा गदारोळ

लेखक माहितगार यांनी बुधवार, 16/04/2025 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

( वर्दी )

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 18/09/2024 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धोन्मीलित डोळे, स्वप्नांची गर्दी झाली "ती",येत आहे याची अवचित वर्दी आली हृदयात प्रेम वारू, फुरफूरू लागला होता मनात प्रेम ज्वर माझ्या,दाटू लागला होता वाजे डोक्यात प्रेमघंटा,फुटती प्रितीचे धुमारे पडे मन अंगणात,आठवांचा प्राजक्त सडा रे झाले तप्त श्वास माझे,गात्रे सुखावून गेली पहाटफुटणी मनीचा,अंधार विझवून गेली नयनात श्रावण धारां,अंगी कडाडते विज उरी दाटल्या प्रमादांचे सांगीन तीला मी गुज नाद पैजंणाचा कानी येता,जागला प्रेम दर्दी उघडता नयन, तया कळाले , उफ्फ sssssss की "ती",.........सर्दी होती.
काव्यरस

मानवंदना, अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रास

लेखक माहितगार यांनी सोमवार, 06/05/2024 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या एकात्मतेसाठी सीमेवर लढणार्‍या वीरांना मानवंदना नेहमीच देत असतो त्यांचे लढणे जसे समोर दिसते कौतुकही समोरून मिळते याच भारतीय एकात्मतेच्या लढायांना कानांची गरज असतेच गुपचरांच्या सगळकाही जीवन, कुटूंब, पणावर लावून कौतुकाचे दोन शब्दही लाभतील याची शाश्वती नसतानाही कधी आप्तस्वकीयांकडूनच नादान टिका ऐकुनही निष्ठेने कर्तव्य बजावणार्‍या अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रांनो स्विकाराव्या आमुच्या अनेक यशस्वीभव शुभेच्छा आणि साश्रू मानवंदना त्रिवार! त्रिवार!! त्रिवार!!! प्रेर्ना अर्थातच

रापण.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 06/03/2023 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी -प्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे. - तारर्कर्लीच्या समुद्र किनाऱ्यावर भटकंतीचा आनंद घेतला.तेव्हां एक वेगळाच अनुभव आला. रापण,कोकणात कोळ्यांचा पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय. यावेळेस बघायला मिळाला.जाळ्यात अडकलेल्या जलचरांची अवस्था बघून वरील गझल आठवली.काही ओळी सुचल्या त्या पंक्तीबद्ध करायचा प्रयत्न केला.याचे श्रेय मी गझलकारांना देईन. गझलकार अंत्यत संवेदनशील,प्रतिभावान.

आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:

लेखक Bhakti यांनी बुधवार, 22/02/2023 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
भागो यांच्या साय फार कथा वाचून अभ्यासाचे जुने दिवस आठवले.बरोबरीने कवितेचा ही अभ्यास जोरात असायचा :).DNA replication शिकत होते तेव्हा लिहिली ही साय फाय कविता होती ;)....

नको ना रे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/12/2022 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
नको रे नको नको म्हटलं ना नको नक्को ना. नको. अं हं न नको न न नको नक्को ना रे नको

आज ही दिवाळी तशीच आहे...

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 21/10/2022 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज ही दिवाळी तशीच आहे... चार का होईना पण डबे आजही फराळाचे भरतात नऊ वाजता उठणारे एक दिवस का होईना पण चार वाजता उठतात आज ही दिवाळी तशीच आहे... डिओ,शाम्पू,बदामाच्या तेलानी जरी कपाटे भरली असली तरी मोती साबण आवर्जून घरी येतो अनारसे, करंजीचा नैवेद्य पूजेच्या थाळीत आजही सजतो आज ही दिवाळी तशीच आहे... थोडे फटाके सुद्धा वाजतात धुर सुद्धा होतो मातीच्या पणत्यांनी कानाकोपरा उजळतो फक्त आजच्याच दिवस हं!
काव्यरस