आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?
नकोच ते युद्ध नको
नकोच ते मृत्यू नको
सहन न होणार्या वेदना
नकोच नको
पैशापायी जायी पैसा
युद्धापायी भरडते जनता
भावनेला घालती गोळी
"युद्धच हवे" बोलतो वर नेता
रणभुमीवर कुणी मारतो कुणी मरतो
बाप, मुलगा, नवरा, भाऊ जातो
घर दार कोसळूनी होते सुने
नशीबी राही केवळ वाट पहाणे
जमावात बातमी युद्धाची ऐकता
विरश्री संचारून अंगी हाताच्या मुठी वळतसे
परी कुणी एकच घरचा धारातिर्थी पडता
युद्ध नको, युद्ध नकोच शब्द वदनी येतसे
- पाषाणभेद
०२/०३/२०२२
मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले
अजूनी होते हवे ते परी न आता उरले
उबदार किती ते वाटे गारठ्यामधे
लेवून अंगी जणू चिलखत ते भासे
कितीही संकटे आली जरी
घाव वर्मी ते सोसतसे
किती निगूतीने वस्त्र निर्माण केले
उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले
शिलाई नाजूक टाके अचूक
रंग तयाचे भरदार असले
या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण
कुणी न विणकर आता न विणणार
भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला
पुन्हा कधी न उमटे
माझेच दु:ख मोठे का?
इतरांचे दु:ख छोटे का?
हातातले गमावले सारे काही
त्यांनी तरी कमावले का?
पर्वतासम संकटे आली
हादरून मी गेलो, ते नाही का?
जे गेले ते माझे होते
इतरांचे काहीच नव्हते का?
मानले माझे माझे, केले माझे माझे
असेच असते इतरांचेही, नव्हे का?
तू जीव माझा -
तू प्राण माझा -
घ्यावया
नच होतीस आली
मालूम होते मला
शौच्यालयात घुसता
मग सावरून बसता
मोबाइलात रमता
आलीस तू अवचिता
जवळि जवळ येता
मग कडकडून डसता
मम उष्ण रक्त प्रशिता
मेरा चैन-वैन सब लुटिता
वाजवून टाळिका
मी जीव तुझा - मी प्राण तुझा
- हरिला -
अल्विदा मच्छरिनी -
अल्विदा.
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ
शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा
खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा
सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध
धुंद संगीताचा मंद आवाज
"गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी"
बोला आणखी काय हवं?
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही..
'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!
पितळेच्या तबकात पोपटी हिरवी पाने मांडताना
नाकपुडीतनं नसं ओढलेला हात शिकंर-नाकासहीत
धोतराला पुसतं आजोबा आवाज द्यायचे.
बरेचसे इतर आजोबा पुजाअर्चात रमायचे
पण हे मात्र
सुपारीची खांड फोडतानाचा घोळक्यासह
मास्तर पैसे लावून रम्मी खेळतात म्हणूनशान
विद्यार्थ्याने चालवलेल्या छोट्याश्या
गावातल्या पेप्रातपण यायचे
पान खाता खाता आठवतं काहीबाही..
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
आणि तुला माझी खूप खूप आठवण येईल ना,
आणि तेव्हा जेव्हा आपण भेटू ना,
तू म्हणशील, "नमस्कार मॅडम!"
मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग तुझ्या बाजूला गाडीत बसेन.
"अगं, बेल्ट!"
मी मग चिडून बेल्ट लावेन.
"बोला!", तू म्हणशील.
मग मात्र मला रहावणार नाही.
मी तुझा गीअरवरचा हात हातात घेईन.
गालापाशी नेईन.
तू हसशील..म्हणशील, लोक बघतील
मी म्हणेन बघुदेत.
रहावणार नाहीच मला..
बेल्ट काढेन, अशी अख्खी झुकून मी तुझ्या जवळ पोचेन.
तुझ्या छातीवर डोक ठेवेन..
मान वर करून तुझ्याकडे पाहीन.
एक जुना वाडा
भंगलेले तुळशी वृंदावन
विरलेली स्वप्नं
अन् उदास माझं मन
परसातल्या चाफ्याला
आता येत नाहीत फुलं
अंगणात कधीच
खेळत नाहीत मुलं
ओसरीवरचा चौफाळा
वाऱ्यासोबत रडणारा
दारातील पिंपळ
दिवसभर झडणारा
गंजलेले तावदान
कुजलेली खिडकी
धुळीने माखलेली
उतरंडीची मडकी
माळवदातील घरटं
चिमणीने सोडलंय
दारावरचं आडनाव
केंव्हाच मोडलंय