Skip to main content

प्रेमकाव्य

महिला दिन: काही कविता

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 14/03/2026 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
या कविता महिला दिवससाठी लिहल्या होत्या. पण सौला हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करावे लागले होते. आता ती ठीक आहे. त्यामुळे कविता टंकायला आज फुरसत मिळाली.

गालावरी लाली नभाची.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 06/03/2026 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
गालावरी लाली नभाची ओठावरी मधाळ शब्द या काजळी केसात तुझिया माझे गुंतले प्रारब्ध. घेती चुंबन सागर लाटा वाळूवरच्या पाऊल खुणा स्पर्श करण्या पिसाट वारा हा येई धावत पुन्हा पुन्हा पाहून तुजला या नभाचे तारे अता हे झाले बेधुंद. तू असता बघ बहर फुलांना तू नसताना विराण जसे माझ्या क्षणा क्षणा वरती आता तुझे उमटले ठसे वाटे मला आता तुझीया सहवासात अपार आनंद. काचवटी ही तुझी कंकणे खणखण करुनी गाती गाणे शुध्द रुपेरी तुझी पैंजणे सूर छेडूनी करी दिवाणे येथे तुला मी पाहुनी आता का होतोसे निशब्द. https://youtu.be/W8HVgfbmvvU

काही आठवणी शब्दांत अडकतात… ❤️ | Marathi Kavita | Truptis Kavita

लेखक तृप्ति २३ यांनी रविवार, 18/01/2026 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी आठव्याला गेलं की खरंच खूप आठवणी आठवतात काही आठवणी गाण्यांमध्ये रमतात तर काही शब्दांमध्ये अडकतात काही आठवणी चेहऱ्यावर उगाच हसू आणतात तर काही आठवणी उगाच मनास छळू पाहतात काही आठवणी पुन्हा आठवणी मध्ये गुंतवतात तर काही आठवणी आठवणींचा गुंता सोडवू पाहतात काही आठवणी आयुष्य सुंदर बनवतात तर काही आठवणी आयुष्य जगायला शिकवतात. ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. ❤️ व्हिडिओला LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! Written By: Trupti S. Tilloo https://www.youtube.com/@truptiskavita

ओलसर क्षण...

लेखक निशांत_खाडे यांनी बुधवार, 04/06/2025 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची सुरुवात नेहमीच अनाहूत असते — नवे नभ, जुना ओळखीचा ओलसर वास घेऊन येणारा वारा, अन् अवचित उगम पावलेली नवीन आठवण, जशी एखादी शब्दावाचून उमजलेली कविता, जी वाचली नाही, पण आत कुठेतरी कायमची ठसलेली आहे. पावसाचा स्पर्श म्हणजे केवळ थेंबांचा ओलावा नव्हे — तर काळाचा एक अतिसूक्ष्म आविष्कार. काही वेळा वाटतं, जसे तिच्या अस्तित्वाच्या सीमारेषा पाण्यात विरघळल्या आहेत, ज्याचा अर्थ अजूनही टिकून आहे, माझ्या आत खोल दडलेला. तीही तशीच भासायची — क्षणागणिक, जणू एखादी अंतर्मुख लय, स्वतःच्या विचारांत गुंतलेली. कधी खळखळून हसायची अन् त्या हसण्यात क्षण कानू स्थिर, स्तब्ध व्हायचे त्या स्थिर क्षणांच्या काही आठवणी

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 17/04/2025 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

मी आणि तू (प्रणय कविता)

लेखक OBAMA80 यांनी रविवार, 27/10/2024 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
रेखीव भृकुटी तुझ्या ललाटी मी चंद्रकोर सुबक नेटकी वसतो तुझ्या मृगनयनी मी गोड आनंदाश्रू मिलनी रसरशीत तुज गोड ओठात मी ऐन मोरपिशी यौवनात रेशमी तुझ्या धुंद श्वासात मी जन्मतो नव्याने सतत शिंपूनी लाली तुझ्या गाली मी विणतो तारूण्य मलमली मन माझे तुझ्या पावली जसा नाद नाजूक पैंजणी गुंफूनी गजरा तव कुंतलात मी रंगवितो बेधुंद रात गुंतूनी तुझ्या मादक यौवनी मी चेतवतो प्रणय अनादी पोर्णिमेचा चन्द्र मी आणि शुक्राची तू ग चांदणी

चकलीची भाजणी

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 17/10/2024 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
उतारवयात सुद्धा जवळ घ्यावंसं वाटतं प्रेम आणी माया एकत्र अनुभवास वाटतं निश्चिंतता, मिठीत तीच्या मजला वाटते बायको माझी मज आयुर्विम्या सम भासते वेणी,थोडी साखर पेरणी एव्हढाच हप्ता बसतो पाॅलिसी मॅच्युरिटीचा आनंद ,वेगळाच असतो काय सांगू तुम्हांला आनंदाचे डोही आनंद तरंग जेंव्हा बनतो उडन खटोला, बेतुक्याचा पलंग. -बेतुक्याची गवळण.

तृषा

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 03/10/2024 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
चमचमणारी चांदणी मला व्हायचीच नाही, काळ्याकुट्ट रात्री ती चंद्राशिवाय एकटीच झुरत राहते... पहाटेची उषा मला व्हायचीच नाही विखुरलेल्या किरणांनी सूर्य हट्टाने तिला होरपळतो... रंगीत फुलपाखरू मला व्हायचेच नाही कोमल फुलाला नकळतही टोचून बढेजाव मिरवायचा नाही... मला व्हायचंय नदी...सरिता... खळखळ मधूर नादात अस्तित्व माझं जपतं तुझ्या कुशीत शिरणार आहे नदी-समुद्राच्या मिलनात तू माझा समुद्र होशील ना.. तिथे तृषा विरेल बहरेल अंतरंग गहिरे -भक्ती

( वर्दी )

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 18/09/2024 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धोन्मीलित डोळे, स्वप्नांची गर्दी झाली "ती",येत आहे याची अवचित वर्दी आली हृदयात प्रेम वारू, फुरफूरू लागला होता मनात प्रेम ज्वर माझ्या,दाटू लागला होता वाजे डोक्यात प्रेमघंटा,फुटती प्रितीचे धुमारे पडे मन अंगणात,आठवांचा प्राजक्त सडा रे झाले तप्त श्वास माझे,गात्रे सुखावून गेली पहाटफुटणी मनीचा,अंधार विझवून गेली नयनात श्रावण धारां,अंगी कडाडते विज उरी दाटल्या प्रमादांचे सांगीन तीला मी गुज नाद पैजंणाचा कानी येता,जागला प्रेम दर्दी उघडता नयन, तया कळाले , उफ्फ sssssss की "ती",.........सर्दी होती.
काव्यरस

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/03/2024 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......