उतारवयात सुद्धा जवळ घ्यावंसं वाटतं
प्रेम आणी माया एकत्र अनुभवास वाटतं
निश्चिंतता, मिठीत तीच्या मजला वाटते
बायको माझी मज आयुर्विम्या सम भासते
वेणी,थोडी साखर पेरणी एव्हढाच हप्ता बसतो
पाॅलिसी मॅच्युरिटीचा आनंद ,वेगळाच असतो
काय सांगू तुम्हांला आनंदाचे डोही आनंद तरंग
जेंव्हा बनतो उडन खटोला, बेतुक्याचा पलंग.
-बेतुक्याची गवळण.
प्रतिक्रिया
17 Oct 2024 - 8:52 am | कर्नलतपस्वी
प्रेमा मधे आसक्ती, प्रेम दिले तर मिळते. प्रेमात व्यवहार असतो.
माया या शब्दात व्यवहार नसतो.
17 Oct 2024 - 9:14 am | कंजूस
वाह.
सांसारिक चकली आवडली.
(मला वाटलं की काही राजकीय चकली भाजणीचे विडंबन आहे काय.)
17 Oct 2024 - 9:41 am | कर्नलतपस्वी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
17 Oct 2024 - 10:06 am | प्रचेतस
भाजणी चांगली भाजल्यामुळे चकली एकदम खुसखुशीत झालेली आहे.
17 Oct 2024 - 10:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटली पाककृतीच आहे.
हे राम काळजी घ्या. रस्त्याने सुंदर महिला, युवती दिसल्यास आपण
आपलं खाली मान घालून नाकासमोर चालायचं.
उतार वयात प्रेमा आणि माया यांच्यापासून दूर राहीलं पाहिजे.
(हलकेच घ्या साहेब)
-दिलीप बिरुटे
17 Oct 2024 - 5:17 pm | कर्नलतपस्वी
परतीच्या पावसाचा न्यारा ढंग
एकाच सरीत भिजवतो अंग
श्रावणातल्या बुरबूरी पेक्षा
परतीचा पाऊस बरा
नवशिक्या पेक्षा अनुभवी खरा
हलकेच घ्या.
17 Oct 2024 - 10:31 am | Bhakti
दिवाळीची तयारी सुरू झाली?
रोजच दिवाळी दिसतं आहे :)
18 Oct 2024 - 11:08 am | राजेंद्र मेहेंदळे
कविता खुसखुशीत झाली आहे.
शेवटची ओळ तर सिक्सर!! येउंद्या अजुन!!
20 Oct 2024 - 4:02 pm | श्वेता२४
भारीच की..मस्त जमलीय भाजणी...
21 Oct 2024 - 9:31 am | कर्नलतपस्वी
एक वयस्कर जिल्बी पाडली आहे.
शृंगार, अश्लील, प्रेम, व तत्सम शब्दांत खुपच पातळ सीमारेषा आहे. सीमारेषेव,परिणीती व वयस्क वाचक वर्ग यांचे भान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्व प्रतिसादक, वाचकांचे मनापासून आभार.