माझी कविता

तरीही....(विडंबन)

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in जे न देखे रवी...
7 Feb 2026 - 7:17 pm

प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता...

तरीही....

नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही
का होईना पोळी माझी गोल तरीही....

पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे..
अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही....

काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी...
तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही....

भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय
म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही....

कोरीव भृकूटी मम सखीची पाहून ती पोळी
का मज वाटे अधिकच झाली खोल तरीही....

gajhalgazalgholपाककृतीमाझी कविताविडम्बनविडंबनगझल

काही आठवणी शब्दांत अडकतात… ❤️ | Marathi Kavita | Truptis Kavita

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
18 Jan 2026 - 5:29 pm

आठवणी आठव्याला गेलं की खरंच खूप आठवणी आठवतात
काही आठवणी गाण्यांमध्ये रमतात तर काही शब्दांमध्ये अडकतात

काही आठवणी चेहऱ्यावर उगाच हसू आणतात
तर काही आठवणी उगाच मनास छळू पाहतात

काही आठवणी पुन्हा आठवणी मध्ये गुंतवतात
तर काही आठवणी आठवणींचा गुंता सोडवू पाहतात

काही आठवणी आयुष्य सुंदर बनवतात
तर काही आठवणी आयुष्य जगायला शिकवतात.

ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. ❤️
व्हिडिओला LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका!

Written By: Trupti S. Tilloo

आठवणीकविता माझीभावकवितामाझी कविताकविताचारोळ्याप्रेमकाव्य

नरो वा कुंजरो वा

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Jan 2026 - 12:24 pm

पोटाची खळगी भरणे कारणी
स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी

हसणे होईल पातक घोर
भवती मूर्खांचा वाढेल जोर

सत्य नित्य नको ओठी
वाचेत मुग्धतेची पराकोटी

आणि...

मती निकामी होय तेधवा
म्हणावे, नरो वा कुंजरो वा

- संदीप भानुदास चांदणे

midlifeआयुष्यकविता माझीदृष्टीकोनमाझी कवितामुक्त कवितासंस्कृतीकलाकवितासाहित्यिक

कळलं च नाई

सुखी's picture
सुखी in जे न देखे रवी...
22 Oct 2025 - 8:20 am

इवले इवले डोळे, खूप खूप खेळले,
दमून झोपी कधी गेले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, खेळता खेळता रडले,
रडता रडता कधी हसले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, छोटे छोटे डोळे,
मोठे कधी झाले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, दूर निघून गेले,
कधी परत येतात, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, परत फिरून आले,
नवीन इवले डोळे, सोबत कधी आले कळलं च नाई.

अव्यक्तबालसाहित्यमाझी कविताकविता

सहा कोवळे पाय

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
21 Jul 2025 - 6:58 pm

नादमय सरसर
कोवळ्याशा वाटेवर
कोवळ्या सहा पायांची
चाल होई भरभर

एकामागे दुजा चाले
पुढचे न पाहताना
पुढच्याचे ध्यान नाही
पुढे पुढे चालताना

कधीतरी भांबावून
पुढचा जागी थिजतो
हरवल्या मागच्याला
चार दिशांत शोधतो

मागलाही नकळत
गेलेला पुढे जरासा
थबकून तोही टाके
पुढच्यासाठी उसासा

क्षणातच पुन्हा होई
नजरेत त्यांची भेट
हुश्श मनात करूनि
चालू पुढे त्यांची वाट

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५)

bhatakantiकविता माझीमाझी कवितामैत्रीशांतरसकवितामौजमजा

यंदाचा पाऊस .

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
20 Jun 2025 - 11:49 am

पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .
इकडे तिकडे पळता पळता मध्येच . . , आंगणात थबकतोय !

बराच चिखल मग बरेच उन्ह
मग मधेच रिपरिप , टाकते नाहवून
निसरडा कधी , गच्च ओला
क्षणात रस्ता भिजवतोय !

पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ १ ॥

गच्चीत कधी तोच एकटा , मी मोठा तो धाकटा ,
तरिही अंगावर आणवून काटा
मोठ्या भावासारखा घाबरतोय !

पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . ॥ २ ॥

माझी कविताशांतरसकविता

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
14 Jun 2025 - 8:48 am

जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे
जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे
कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला
अवघडावे असे लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

अदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयअव्यक्तआगोबाआता मला वाटते भितीआयुष्याच्या वाटेवरकखगकविता माझीकाणकोणकाहीच्या काही कविताजिलबीदुसरी बाजूदृष्टीकोनप्रेरणात्मकफ्री स्टाइलबापजन्मभूछत्रीमनमेघमाझी कवितामिक्स फ्रुट जॅममुक्त कवितारंगरतीबाच्या कविताविडम्बनविडंबन

भय इथले संपत नाही (विडंबन- काम इथले संपत नाही)

OBAMA80's picture
OBAMA80 in जे न देखे रवी...
27 Oct 2024 - 2:24 pm

भय इथले संपत नाही (मूळ कवी - ग्रेस)
*****************************************
भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही

ते झरे चंद्र सजणांचे
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही

तो बोल मंद, हळवासा
तो बोल मंद, हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला

माझी कविताविडम्बनविडंबन

मी आणि तू (प्रणय कविता)

OBAMA80's picture
OBAMA80 in जे न देखे रवी...
27 Oct 2024 - 1:39 pm

रेखीव भृकुटी तुझ्या ललाटी
मी चंद्रकोर सुबक नेटकी
वसतो तुझ्या मृगनयनी
मी गोड आनंदाश्रू मिलनी
रसरशीत तुज गोड ओठात
मी ऐन मोरपिशी यौवनात
रेशमी तुझ्या धुंद श्वासात
मी जन्मतो नव्याने सतत
शिंपूनी लाली तुझ्या गाली
मी विणतो तारूण्य मलमली
मन माझे तुझ्या पावली
जसा नाद नाजूक पैंजणी
गुंफूनी गजरा तव कुंतलात
मी रंगवितो बेधुंद रात
गुंतूनी तुझ्या मादक यौवनी
मी चेतवतो प्रणय अनादी
पोर्णिमेचा चन्द्र मी आणि
शुक्राची तू ग चांदणी

कविता माझीप्रेम कवितामाझी कवितामुक्त कविताशृंगारप्रेमकाव्य

"मी, शिल्पकार माझ्या जीवनाचा !!"

भम्पक's picture
भम्पक in जे न देखे रवी...
23 Aug 2024 - 4:58 pm

न करीशी व्यर्थ चिंता तू
ठाऊक मज सामर्थ्य माझे !

कुणाशी कसे वदावे कसे वागावे
काय केल्याने काय होईल....
हि चिंता तयास
ज्याने क्रमिला पथ दुहेरी
माझा पथ सुर्यप्रकाशाहूनही स्वच्च्छ
कण भारही किंतु तयात नाही !
नकोत सला-मशवरा मजला
ठाऊक मज मार्गक्रमण माझे !
मान्यता जगात उदंड जाहल्या
त्या प्रती जगणारे अमाप ...
मी तर अव्यक्ताचा चाहता
जी माझी कृती तीच परिणती !
का कशाचीही बाळगावी मी भीती
ठाऊक मज अंतिम ध्येय माझे !!

माझी कविताकविता