प्रेमकाव्य

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
20 Jun 2021 - 12:22 pm

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_boras...

येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे.

सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतवाङ्मयकथाकविताप्रेमकाव्यविनोदमौजमजामाध्यमवेधलेखमाहितीप्रतिभा

मधाळलेल्या कुण्या मिठीची...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
14 May 2021 - 2:48 pm

मधाळलेल्या कुण्या मिठीची
चव लाघवी पीठीसाखरी,
झळा भोवती वैशाखी तरी
गोड सावली आम्र पाखरी.

एकच पुरतो कटाक्ष तिरका
नजर अशी की तिख्खी मिर्ची,
पेटवते मग रंध्रांध्रातून
अन्वर ज्वाला आसक्तीची.

दातांचा तो चिमणी चावा
करकरीत जणु कैरी कच्ची,
शिरशिर अंगी हवीहवीशी
कशी लपावी नाजूक नक्षी?

स्पर्श असा की शामक अमला
तनामनाचा दाह उतारी,
कषाय जणू तो प्याल्यामधला
क्षणात देतो कशी उभारी.

खट्ट्या मिठ्ठ्या श्वासांमध्ये
शब्द बिचारे हरवून जाती.
नमकीन काही घडून जाते
अर्थ उगाचच शोधत बसती..

कविताप्रेमकाव्य

(बहुतेक रेशमी "होती" !)

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जे न देखे रवी...
20 Apr 2021 - 10:34 am

आमची प्रेरणा : राघवांची सुंदर कविता : ..बहुतेक रेशमी होते!

आमची शंका : विडंबन हे हास्य किंव्वा बीभत्सरसात असावे असा काहीसा संकेत आहे, किमान मिपावर तरी तसे पाहण्यात आलेले आहे. "शृंगाररसातील" विडंबन केल्याबद्दल मराठी साहित्यपीठ अस्मादिकांना माफ करेल काय ;)

आकार घडीव होते..
आघातही नाजुक होते!

ओठांना ओठ हे भिडती..
[तेव्हा] "शब्देविण संवादु" होते!

नैतिकतेचे ठाऊक नाही...
[पण सीत्कार सोवळे होते!]

"अंधार कर ना जरासा"..
नवखेपण लाजत होते !

शृंगारप्रेमकाव्य

प्रोफाइलवरती बाई..!!

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
26 Feb 2021 - 5:41 pm

(टीप: अनाहितांची साष्टांग माफी मागून)

प्रोफाइलवरती बाई
अशि काही दिसते धासू
तो फोटो पाहुन येती
झुंडीने चावट वासू

कुणी भोजनपृच्छा करतो
कुणी थेट घालतो डोळा
बाईच्या भवती जमती
भुंगे सतराशे सोळा

बाईचे आशिक मुबलक
कुणि पुतण्या तर कुणि काका
रंगेल एकसे एक
बाईस मारिती हाका

मेसेज पटापट येती
गालात हासते बाई
पाहता गड्यांची गर्दी
तिज हसू अनावर होई

ती विचार करुनी लिहिते,
पुसते, -अन पुन्हा लिहिते
ते 'टायपिंग..' दिसताच
वासूंचे भान हरपते

कविताप्रेमकाव्यविडंबनविनोद

असंही व्हॅलेंटाइनचं सेलिब्रेशन...

मनस्विता's picture
मनस्विता in जे न देखे रवी...
15 Feb 2021 - 2:41 pm

उगवला प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत

त्याच्या हृदयाची वाढली होती धडधड
तिच्याही काळजात होत होतं लकलक
कारण तो होता ट्रेडमिलवर धावत
आणि तिच्या लेकीच्या व्हॅनचा हॉर्न होता वाजत

दिले तिने त्याला आवर्जून फूल
पण होतं ते डब्यातलं कोबीचं फूल
निघाला मग तो एकटाच लॉंग ड्राईव्हवर
कारण होतं त्याचं ऑफिस नगर रोडवर

पोहोचला एकदाचा तो ऑफिसला
होतीच 'ती' तिथे सोबतीला
सुरु झालं त्याचं आणि तिचं गूज
म्हणला तो तिला दिवसभराची राणी माझी तूच

प्रेमकाव्य

लाल बदामी प्रेम

प्रज्ञादीप's picture
प्रज्ञादीप in जे न देखे रवी...
11 Jan 2021 - 5:27 am

जेव्हा माझी गोष्ट ....
तुझ्या तोंडून सुरु होते होते ना ,
ती मी भान हरपुन ऐकते

तु म्हणतोस " स्विटु ..तुझा DP मी जेव्हाही zoom करुन बघतो तेव्हा तेव्हा जाणवतं तुझं वेगळेपण ....
भव्य कपाळ , त्यावर शोभणारी चंद्रकोर ...
डोळे ...बोलके नि काळेभोर...
नाकावरचा तीळ तर रेअर खुप रेअर ...
गुलाबी गुलाबी ओठ , हसलीस की त्यातुन एक साइडचा दात हळुच डोकावतो बाहेर ..."

मी हाताच्या तळव्यांनी चेहरा झाकुन , लाजुन चुर

प्रेमकाव्य

मन तुझे-माझे

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
15 Dec 2020 - 1:12 am

तुझ्याशी बोलता
मन माझे जणु बेभान होते
तुझ्याचं विचारात
मन माझे विरते

तु जवळ नसता
मन तुझ्यासाठीच झुरते
विरहात ही
मी तुझ्यातच रमते

तु कितीही दुर असावा
तरी तुझ्या मनाला
कधीही माझा विसर
न व्हावा

कितीही मैलांचे
अंतर असले तरी
मनाने तु सदैव
माझ्या पास असावे
तनाने दुर असलो
तरी मनाने एकरूप व्हावे!

-Dipti Bhagat
4 March, 2019

कविताप्रेमकाव्यमुक्तक

चंद्रायण..!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
2 Dec 2020 - 4:50 pm

ही रात निळीशार,
ओतीत चंद्र-धार...
स्वप्नातल्या कळ्यांना
देते नवा आकार!

पाण्यात चंद्र-पक्षी,
मांडून सौख्य-नक्षी...
किरणावरी शशीच्या
होतात मंद स्वार!

पाहून चंद्र-मेळा,
क्षितिजास ये उमाळा...
नक्षत्र बांधतात
तारांस एक-तार!

स्वप्नील चंद्र-गाणे
मधु-मीलनी उखाणे...
गातात फूल, वारे
छेडीत गंध-तार!

एकांत चंद्र-वेडा,
वितळून जात थोडा...
देतो अनामिकेला
अलगूजशी पुकार!

उचलून चंद्र-मेणा,
र्‍हदयात चंद्र-वेणा...
कित्येक चंद्र-वेळा,
करतात येरझार!

— सत्यजित

shabdchitreगाणेभावकवितामाझी कविताशृंगारकविताप्रेमकाव्यरेखाटनस्थिरचित्र

शहाणी मुलगी....

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
5 Nov 2020 - 11:34 am

तुझ्या समोर मी नेहमीच शहाण्यासारखं वागायचं ठरवते.
खूप वाटंत असतं तुझ्याकड अनिमिष नेत्रांनी पहावं..
तुझ्या कपाळावर येणारी चुकार बट, तुझे भुरभुरणारे केस,
तुझ्या गालावरची खळी, बोलताना हलणारे लोभस ओठ..
पण मी अगदी शहाण्या मुलीसारखी बसते, डोळे झुकवून.

कविताप्रेमकाव्यमुक्तक

कुणीतरी, केव्हातरी, कधीतरी, कुठंतरी ...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
29 Oct 2020 - 8:36 am

उन्हाच्या सावलीत
सावलीतल्या उन्हात
कधीतरी वेडं मन भिजतं ना?

गप्पांच्या नादात
नादावल्या जगात
कुणीतरी गोलगोल फिरतं ना?

चहाच्या कपात
कपातल्या चहात
काहीतरी गोडगोड घडतं ना?

मनातल्या प्रश्नाचं
मनातलं उत्तर
केव्हातरी कुठंतरी मिळतं ना?

कसंतरी कुठंतरी
कुणीतरी केव्हातरी
कधीतरी प्रेमात पडतं ना?
पडतं ना?

कविताप्रेमकाव्य