सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


कुणीतरी, केव्हातरी, कधीतरी, कुठंतरी ...

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
29 Oct 2020 - 8:36 am

उन्हाच्या सावलीत
सावलीतल्या उन्हात
कधीतरी वेडं मन भिजतं ना?

गप्पांच्या नादात
नादावल्या जगात
कुणीतरी गोलगोल फिरतं ना?

चहाच्या कपात
कपातल्या चहात
काहीतरी गोडगोड घडतं ना?

मनातल्या प्रश्नाचं
मनातलं उत्तर
केव्हातरी कुठंतरी मिळतं ना?

कसंतरी कुठंतरी
कुणीतरी केव्हातरी
कधीतरी प्रेमात पडतं ना?
पडतं ना?

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Oct 2020 - 9:04 am | प्रचेतस

क्या बात...!
एकदम मस्त.

पाषाणभेद's picture

29 Oct 2020 - 10:13 am | पाषाणभेद

वा छान उभारी देणारं काव्य!

प्राची अश्विनी's picture

30 Oct 2020 - 7:39 am | प्राची अश्विनी

प्रचेतस आणि पाषाणभेद.. धन्यवाद!:)

Jayagandha Bhatkhande's picture

30 Oct 2020 - 1:13 pm | Jayagandha Bhat...

मस्त...!!

चांदणे संदीप's picture

30 Oct 2020 - 3:19 pm | चांदणे संदीप

फर्मास! कविता आवडल्या गेली आहे.

सं - दी - प

माहितगार's picture

30 Oct 2020 - 4:00 pm | माहितगार

अगदी फर्मास !

प्राची अश्विनी's picture

6 Nov 2020 - 11:50 am | प्राची अश्विनी

जयगंधा, चांदणे संदीप अन् माहितगार, खूप खूप धन्यवाद.

उत्तम कविता . आपोआप घडल्यासारखी वाटते.

प्राची अश्विनी's picture

10 Nov 2020 - 1:48 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद.
थोडी घडते, थोडी घडवली जाते.
:)

केदार पाटणकर's picture

7 Nov 2020 - 1:17 pm | केदार पाटणकर

रचनेत गोडवा आहे.

साध्या सरळ शब्दांची छान कविता...
आवडली

बबन ताम्बे's picture

8 Nov 2020 - 2:19 pm | बबन ताम्बे

कविता खूपच आवडली .

प्राची अश्विनी's picture

10 Nov 2020 - 1:48 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद सर्वांनाच.

VRINDA MOGHE's picture

12 Nov 2020 - 12:05 pm | VRINDA MOGHE

छान काव्य

rushikapse165's picture

14 Nov 2020 - 11:18 am | rushikapse165

एकदम भारी!