दिवाळी अंक २०१५: आवाहन
नमस्कार मिपाकर हो,
नमस्कार मिपाकर हो,
मंडळी,
दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
गच्चीवर असाच पडलो होतो. चांदणं बघत. वाऱ्याबरोबर धूळही उडत असल्याने तंद्रीभंग व्हायचा. इतक्या प्रचंड आकाशाच्या पोकळीत तारे तरी किती. भिती वाटेल एवढे भयंकर हे आकाश. चंद्राकडे कधी टक लावून बघीतलेय?
चटईवरुन उठून ग्लासातलं पाणी पिलो. आजूबाजूला नजर मारली. एक सुन्न शांतता अंधारात गडद होऊन मिसळली होती. किती वाजले असतील ? माहीत नाही. अचानक जाग आली आणि मी असा.
झोपायचा वायफळ प्रयत्न केला. मग डोळे सताड उघडे ठेवून चंद्राकडे बघत बसलो. चंद्र कधी कधी तांबूस वाटतो. नीट बघितलं तर तिथे माणसं राहत असतील असंही वाटतं. अचानक तो मोठा झाल्याचा भास झाला. आता तो सरळ खाली येऊन आपटणार.
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती.
ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे.
इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता.
वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती.
पर्व
भाग १: इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना
भाग २: इतिहास्यास्पद (२) स्वातंत्र्यदिनाची तयारी
भाग ३: इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?)
भाग १: स्वातंत्र्यदिनाची कल्पना
इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना
भाग २: स्वातंत्र्यदिनाची तयारी
समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर?
आमचा कार्यक्रम संस्मरणीय असण्याचं हे कारण होतं. त्याला खास उपस्थिती होती. नाही तर ‘स्वातंत्र्यदिन’ या विषयावर कार्यक्रम करणं यात आता नवलाई राहिली नाहीये. अगदी तो परदेशात साजरा झाला तरी त्यात विशेष असं काही वाटत नाही आजकाल. पण हे स्थळ अनोळखी होतं. उर्वरित जगाला (म्हणजे आम्ही उपस्थित आणि ‘यम टी.व्ही.’ दर्शकांव्यतिरिक्त कुणाला) हे कळणार नव्हतं.
एक मुलाखत:
“नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली.
“पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले.