लद्दाख
भूशास्त्राच्या अंकलिपीची
पाने इथली उलटी
रंगभारले पहाड, अवघड
रस्त्याची वेलांटी
रण वाळूचे पायतळी अन्
हिमकण माथ्यावरती
किती विरोधाभास पचवुनी
फुलते इथली सृष्टी
रंग नभाचे प्राशुनी वाहे
निवळशंख हे पाणी
रौद्र नि प्रशांत उभय रसांचे
मिश्रण केले कोणी
(नुकत्याच केलेल्या लद्दाख वारीदरम्यान रेखाटलेले शब्दचित्र)