श्रीगणेश

त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
2 Sep 2022 - 9:21 pm

चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्‍या
सृष्टी आणि प्रकृतीच्या
रक्षाबंधनाच्या
कर्तव्याला पाळण्यासाठी
साक्षात रुद्राच्या
रौद्ररुपाला झेलणार्‍या
त्यागी गजानना तुझ्या शौर्याला
आमचे शतशः नमन असो.

Nisargगजेंद्रनिसर्गमाझी कवितामुक्त कविताविठोबाशिववंदनाश्रीगणेशवीररसरौद्ररसशांतरसचारोळ्यामुक्तकव्यक्तिचित्र

देव

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
5 May 2021 - 3:01 pm

देव म्हणजे हवा, नाही अगरबत्तीचा सुगंध
तो अन्नात आहे, उपवासात नाही.
देव दानशूर मोठा, लाचार नाही
न्यायी आहे देव, नवसाचा व्यापारी नाही.

देव आहे सदाचारात, अन्यायाचा शत्रू
देव मुहूर्त नाही, अनंत काळ आहे.
देवही भक्त आहे, भावाचा भुकेला
देव नाही खजिनदार-पुजारी.

देव देवळात नाही फक्त, आहे सगळीकडे
देव दाढीत नाही, शेंडीतही नाही.
जीवन देव आहे, मृत्यूही तोच
प्रचारात देव नाही, तो प्रकांड आहे.

देव म्हणजे गंभीर गोष्ट
माणूस त्याची गंमत करतो.
गुलाबजाम जणू पाकातला
हलवायाची व्याख्या करतो.

अव्यक्तजाणिवभक्ति गीतमुक्त कविताश्रीगणेशधर्मकवितासाहित्यिक

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Mar 2020 - 1:21 pm

प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर
दा.= दादा ता. = ताई

उंटावरल्या प्रा.डॉ. दादा ताई
तुमच्या वणी आमास्नी मागे
प्रा न्हाई डॉ न्हाई
मात्र येक सांगुन ठ्येवते
उंट हाय तुमचा लंगडा

बुडत्या नावेतून वाचण्यास
देव प्रत्यक्षात येत नाही
हे अनुभवातन म्हाईत र्‍हातय
तेवड आमा बी कळतय
कळण्यास आमा प्राडाँचे
नवनास्तिक शहाणपण लागत न्हाई.

अभंगकालगंगादुसरी बाजूदेशभक्तिभक्ति गीतमुक्त कवितारतीबाच्या कविताविठोबाविठ्ठलश्रीगणेशश्लोकअद्भुतरसधर्मकविताओली चटणी

गीत - गँ गणपतये

कौस्तुभ आपटे's picture
कौस्तुभ आपटे in जे न देखे रवी...
23 Sep 2018 - 11:03 am

॥श्री॥
गँ गण ण ण ण,गँ गण ण ण ण
गँ गण ण ण ण, गँ गणपतये
देवांमाजी, अग्रदेव तू,
त्रिवार वंदन स्विकार अमुचे॥धृ॥

हे शिव-शक्तिच्या संगमा
हे बुद्धि-युक्तिच्या अग्रजा
त्या श्रुती-स्मृतिंचा पाठक अन तू
वेदांची रे मंत्रणा !
विद्या-कला
ठायी तुझ्या
तू सर्वेश्वर तुज वंदना ॥१॥

तू श्रेष्ठ लिपीक तुजला गती
हे देवांच्या सेनापती
रविचंद्रधिनायक विश्वही तुजला
सुर्याने ओवाळती
सिद्धेश्वरा,
विघ्नेश्वरा,
हे करूणाकर , तुज मोरया ॥२॥

गाणेश्रीगणेशसंगीतकवितासाहित्यिक

द्वादशैतानि नामानि

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Sep 2018 - 4:12 pm

अगा वक्रतुण्डा, ध्यान जरा द्यावे
जनांसी करावे, थोडे सुज्ञ II १ II

अगा एकदंता, ध्वनी प्रदूषण
वाढविती जन, ऐकवेना II २ II

कृष्ण-पिंग-अक्षा, ऊर्जेची नासाडी
करिती आवडी, अज्ञ जन II ३ II

अगा गजवक्त्रा, बाजारू संगीत
पिडे दिनरात, धाव आता II ४ II

अगा लंबोदरा, वर्गणीची सक्ती
जुलूमाची भक्ती, थांबवावी II ५ II

अगा हे विकटा, साथ नवसाची
करी जनतेची, बुद्धी भ्रष्ट II ६ II

विघ्नराजेंद्रा रे -जल, भूमी, वात
सर्व प्रदूषित, कैसे झाले II ७ II

अगा धूम्रवर्णा, पर्यावरणाची
जाणीव जनांची, वाढवावी II ८ II

मराठीचे श्लोकश्रीगणेशकविता

गजाननाचे वंदन गाऊ

सुमेध रानडे's picture
सुमेध रानडे in जे न देखे रवी...
9 Jan 2016 - 9:20 pm

****************************
मिसळपाव वर माझी ही पहिली कविता.
म्हणूनंच, सुरुवात गणरायाच्या स्तवनाने.
गजाननाचे वंदन, गजाननाला अर्पण!
****************************

गजाननाचे वंदन गाऊ|
रोज आधी हो त्यालाच पाहू||

हाच देवसे कला-बुद्धीचा,
हाच कांत प्रिय रिध्दी-सिद्धीचा,
आशीष हा साफल्य, वृद्धीचा,
कृपा निरंतर मागत राहू|
गजाननाचे वंदन गाऊ||१||

दुर्वांकुर नीरज जासवंद,
केवड्याचा ये मंद सुगंध,
मोदकाचा ही पुरवू छंद,
शुभ्र कपाळी चंदन लाऊ|
गजाननाचे वंदन गाऊ||२||

श्रीगणेशकविता