****************************
मिसळपाव वर माझी ही पहिली कविता.
म्हणूनंच, सुरुवात गणरायाच्या स्तवनाने.
गजाननाचे वंदन, गजाननाला अर्पण!
****************************
गजाननाचे वंदन गाऊ|
रोज आधी हो त्यालाच पाहू||
हाच देवसे कला-बुद्धीचा,
हाच कांत प्रिय रिध्दी-सिद्धीचा,
आशीष हा साफल्य, वृद्धीचा,
कृपा निरंतर मागत राहू|
गजाननाचे वंदन गाऊ||१||
दुर्वांकुर नीरज जासवंद,
केवड्याचा ये मंद सुगंध,
मोदकाचा ही पुरवू छंद,
शुभ्र कपाळी चंदन लाऊ|
गजाननाचे वंदन गाऊ||२||
कार्याच्या शुभ आरंभाला,
मिळून आळवू गणरायाला,
विसरु नित संकट विघ्नाला,
फूल भक्तीचे चरणी वाहू|
गजाननाचे वंदन गाऊ||३||
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2319
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म.
छान आहे कविता. आवडली.