निघा निघा चिऊताई

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 Mar 2025 - 11:12 am

निघा निघा चिऊताई
सारीकडे काँक्रीटले
दाणा पाणी हरवले
शहरी ह्या

विषारी धुरके आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही

उरलेली पाखरे ही
भयसूचनांचे गाणे
गाऊनी टिपती दाणे
अखेरचे

झोपू नका अशा तुम्ही
वाचविण्या मृत्युक्षणी
येईल का मग कोणी
बाळाला ह्या

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
बाळासकट ती जाई
कायमची!

इशारानिसर्गबालगीतजीवनमान

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Mar 2025 - 11:24 am | राजेंद्र मेहेंदळे

कविता छान आहे असे म्हणवत नाही. पण परीस्थिती अचूक टिपली आहे.

कर्नलतपस्वी's picture

21 Mar 2025 - 12:59 pm | कर्नलतपस्वी

येणारी पिढी चिऊताई बघायला संग्रहालयात न जाओ....

सटिक वर्णन म्हणावे लागेल. लहानपणी आंगणात पाहिलेल्या चिमण्या बघायला कुठे कुठे जावे लागते हा दैवदुर्विलास याची देही याची डोळा बघावा लागत आहे. कालच एक पक्षिमित्राने अमेरिकन चिऊताई चे फोटो पाठवले आहेत. काही चिमण्या अमेरिकेत जाऊन बदलल्या आहेत तर काही अजून तशाच म्हणजे देशी आहेत..

विश्व चिमणी दिवस यावर लेख लिहीण्याचा विचार होता. जुने साहीत्य खंगाळताना Paul Laurence Dunbar
1872 –1906 यांची एक खुप सुंदर कविता वाचनात आली.

Paul Laurence Dunbar
1872 –1906

A little bird, with plumage brown,
Beside my window flutters down,

A moment chirps its little strain,
Ten taps upon my window–pane,

And chirps again, and hops along,
To call my notice to its song;

But I work on, nor heed its lay,
Till, in neglect, it flies away.

So birds of peace and hope and love
Come fluttering earthward from above,

To settle on life’s window–sills,
And ease our load of earthly ills;

But we, in traffic’s rush and din
Too deep engaged to let them in,

With deadened heart and sense plod on,
Nor know our loss till they are gone.

एक संदेश पण आला आहे.

सरली सुरेख थंडी, फोफावला उन्हाळा,
संतप्त सूर्य झाला, ओकेल तप्त ज्वाळा. 

पक्षी दिशांना फिरतील, ते थव्यांनी
सुकतील,कंठ त्यांचे मग शोधतील पाणी,

सुकली तळी जळांची. पाणी पिण्यास नाही,
त्या सानुल्या जीवांची होईल लाही लाही,

त्यांच्या जीवाकरिता इतकी कराचं सेवा,
वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा. 

कर्नलतपस्वी's picture

21 Mar 2025 - 1:00 pm | कर्नलतपस्वी

येणारी पिढी चिऊताई बघायला संग्रहालयात न जाओ....

सटिक वर्णन म्हणावे लागेल. लहानपणी आंगणात पाहिलेल्या चिमण्या बघायला कुठे कुठे जावे लागते हा दैवदुर्विलास याची देही याची डोळा बघावा लागत आहे. कालच एक पक्षिमित्राने अमेरिकन चिऊताई चे फोटो पाठवले आहेत. काही चिमण्या अमेरिकेत जाऊन बदलल्या आहेत तर काही अजून तशाच म्हणजे देशी आहेत..

विश्व चिमणी दिवस यावर लेख लिहीण्याचा विचार होता. जुने साहीत्य खंगाळताना Paul Laurence Dunbar
1872 –1906 यांची एक खुप सुंदर कविता वाचनात आली.

Paul Laurence Dunbar
1872 –1906

A little bird, with plumage brown,
Beside my window flutters down,

A moment chirps its little strain,
Ten taps upon my window–pane,

And chirps again, and hops along,
To call my notice to its song;

But I work on, nor heed its lay,
Till, in neglect, it flies away.

So birds of peace and hope and love
Come fluttering earthward from above,

To settle on life’s window–sills,
And ease our load of earthly ills;

But we, in traffic’s rush and din
Too deep engaged to let them in,

With deadened heart and sense plod on,
Nor know our loss till they are gone.

एक संदेश पण आला आहे.

सरली सुरेख थंडी, फोफावला उन्हाळा,
संतप्त सूर्य झाला, ओकेल तप्त ज्वाळा. 

पक्षी दिशांना फिरतील, ते थव्यांनी
सुकतील,कंठ त्यांचे मग शोधतील पाणी,

सुकली तळी जळांची. पाणी पिण्यास नाही,
त्या सानुल्या जीवांची होईल लाही लाही,

त्यांच्या जीवाकरिता इतकी कराचं सेवा,
वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा. 

अनन्त्_यात्री's picture

21 Mar 2025 - 4:22 pm | अनन्त्_यात्री

माझ्याही आवडत्या कवितांपैकी एक आहे.

श्वेता२४'s picture

21 Mar 2025 - 2:11 pm | श्वेता२४

मी गॅलरीमध्ये दाणा पाणी ठेवते पक्षांसाठी...कधी आली चिमणी तर इतकं छान वाटतं तिच्या चिवचिवाटाने......!!! खरंतर हे नैसर्गिक सुखही आता किती दूर्मिळ झालंय...

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Mar 2025 - 3:06 pm | अमरेंद्र बाहुबली

छान कविता!

चिमणी दिनाच्या निमित्तानं आलेली कविता आवडली.
खरंच दुर्मिळ होत आहेत चिमण्या!!

( मागे मीही मिपावर एका हिंदी कवितेचे रूपांतर केले होते..)