पंचमीतले रंग सांडले........
पंचमीतले रंग सांडले
झाडांनी ते बघा झेलले
डोक्यावरती तुरे गुलाबी
धुंद होऊनी फाग नाचले
लुसलुशीत ही कवळी पाने
मोहरून गेली सर्वच राने
आंबोळ्या निंबोळ्या सवे खेळती
ओढून नुतन वस्त्रे गर्द पोपटी
कोण चितारी चित्र काढतो
रंगांची रागदारी मांडतो
कोकीळ मंजुळ कुजन करते
मन मुदित हिंदोळ्यावर झुलते
कसरत
२९-३-२०२२