Skip to main content

mango curry

वसंतात मृगजळ खास

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 29/04/2022 21:53 या दिवशी प्रकाशित केले.

काठावरचे गुपित झेलता
अनु'मतीची महत्ता विशेष

वसंताचे मृगजळ खास
कटी बंधात उष्म निश्वास

नभी नाभी ताम्र गोल
चा'लते जातो तोल
आर्त कुंजन
आस पास

पर्ण विरहीत पुष्प तटी दाट
दिंगबर सुरेख मदन पाझरतो

.
.
.
.
.
.
.

स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

ऑफिसात जाऊन आलो

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 02/07/2019 13:19 या दिवशी प्रकाशित केले.

ऑफिसात गेलो,
गप्पा मारून आलो
कॅन्टीनला जाऊन मी
भजे खाऊन आलो

जरी थेंब पावसाचे आले
ओला .. भिजून आलो
भांबावल्या दुपारी
झोपा काढून आलो

होते कुणी न कोणी
नव्हतोच एकटे ना?
लोकां कसे पटावे
पाट्या टाकून आलो.. ?

पाकीट जरी रिकामे
अकाऊंट भरून आले..
चुकू मुळी न देता
लॉगिन करून आलो.

मूळ पेरणा
इथे आहे

...... कशाला ?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/03/2018 08:26 या दिवशी प्रकाशित केले.

पुन्हापुन्हा मी क्षणोक्षणी सावरू कशाला
उगाच ऐना बघून मी मोहरू कशाला

पुन्हा नभावर जरा दिसावी उनाड स्वप्ने
तुझे पसारे घडोघडी आवरू कशाला

तिला जरासा हवा अबोला रुसावयाला
जुनीच आहे सवय तिची बावरू कशाला

असे कसे बोलणे सखीचे मला कळेना
जरी तिचे वागणे दुटप्पी स्मरू कशाला

अजून सुद्धा तिच्याविना मी जगेन म्हणतो
जुनीच स्वप्ने पुन्हा अता वापरू कशाला

मरण मनोहर प्रिये तुझ्यासह असेल नक्की
तुझ्याविनाही जगेन मी घाबरू कशाला

जगावयाला हवे कशाला नवे बहाणे
सुखे तुझ्या सोबतीतली ठोकरू कशाला

काव्यरस

(काळी असे कुणाची)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 19/11/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.

लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....

काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,
मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,

सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,
ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,

काही करु पहातो, नसतात लोक तेथे,
पूसता कळे असे की, तो लायनीत आहे,

परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,
की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,

-(पैजारबुवा) आनंदीआनंद

(*गणे कसेच होते)

लेखक स्पा यांनी मंगळवार, 02/08/2016 08:00 या दिवशी प्रकाशित केले.

पेर्रणा -लाडका बुव्या

*गणे कसेच होते? येथे बघून गेलो
पाणी जराच होते, थोडा *गून गेलो

टमरेल टांगलेले, मी घेतले हातात
परसाकडील दारी, मी लगबगून गेलो

लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची
अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो

तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे
अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो

ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू
आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो

*गणे कसेच होते. .

"बुवा....."

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 28/01/2016 23:41 या दिवशी प्रकाशित केले.

पेर्णा - https://www.misalpav.com/node/34674

गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :)

गुर्जी अता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुवा अता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा अधार मिळायला लागतोय

मिशी नृत्य

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 15/01/2016 12:42 या दिवशी प्रकाशित केले.

असणे नसणे
जाणीव स्मृती
खर्‍या गूढ आभासी
मिशी नृत्य अधाशी

पुस्तक घेऊनी डोईवरी
शिष्या राहे उपाशी
असे ते शीष्ट दिसे
उष्टवी शब्द पिशी

मांडीने डाव मांडले
मिशीने शब्द पुसले-खुपसले
आपल्या जगण्यासाठी
शब्दांवरी नाच नाचला
तीने लेऊनी त्यांची मिशी

-स्वल्प प्रेरणा 'फ्रिडा काहलोची मिशी'

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

लेखक माहितगार यांनी बुधवार, 23/12/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
स्वप्नात झाले होते
पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!)
पंतप्रधान मोदींचे सचीव !! :)

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
वर्ष भर काय केले ?
ओबामां फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट दे सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !
हॅप्पी न्यू यीअर !!

मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून नववर्षाच्या शुभेच्छा ! (अजून येणे बाकी !!)

लेखक माहितगार यांनी बुधवार, 23/12/2015 10:51 या दिवशी प्रकाशित केले.

तुर्तासतरी क्षमा असावी, (उघडल्या उघडल्या एक कविता दिसावी अशी अपेक्षा असेल तर, किमान ह्या धाग्यातून स्फुर्ती घेऊन कुणी कविता बनवून प्रकाशित करत नाही तो पर्यंत) खरे म्हणजे इतिहासातल्या मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांना भारतात त्यांच्यावर एक चित्रपट रिलीज झाल्याचे कळले आणि मस्तानीला कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्या वाटल्या अशी एक कविता/ काव्य कल्पना सुचता सुचता माझ्या मनातल्या मनात राहीली, -कविता सुचताना लगेच लिहिणेबल माहोल नाही मिळाला का कोण जाणे उगाचच जरासे अस्वस्थ वाटते - हि कवि मनाची अस्वस्थता स्वतःपाशीच न ठेवता इतरांशीही शेअर करून, 'मस्तानी कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभे