आयकर सुट
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
पोळीत लपला आलूवडा, चहा कपभर खास
बजेटची चर्चा झाली, आता सगळं झालं बास
खिशात राहतं थोडं, केला सगळ्यांनी नवस
निर्मला ताईंनी बनवला सगळ्यांचा हसरा दिवस
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
सायकल चालवली जरा, फिटनेसची शान
बजेट ऐकत बसलो, झाला गोड ताण
टॅक्सचा जुगाड संपला, हसू फुटलं मुक्त
निर्मला ताईंनी दिली सूट, मिळालं आयुष्याचं गिफ्ट!