जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
22 Jun 2020 - 9:00 am

जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
आणि तुला माझी खूप खूप आठवण येईल ना,
आणि तेव्हा जेव्हा आपण भेटू ना,
तू म्हणशील, "नमस्कार मॅडम!"
मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग तुझ्या बाजूला गाडीत बसेन.
"अगं, बेल्ट!"
मी मग चिडून बेल्ट लावेन.
"बोला!", तू म्हणशील.
मग मात्र मला रहावणार नाही.
मी तुझा गीअरवरचा हात हातात घेईन.
गालापाशी नेईन.
तू हसशील..म्हणशील, लोक बघतील
मी म्हणेन बघुदेत.
रहावणार नाहीच मला..
बेल्ट काढेन, अशी अख्खी झुकून मी तुझ्या जवळ पोचेन.
तुझ्या छातीवर डोक ठेवेन..
मान वर करून तुझ्याकडे पाहीन.
तू एवढा ताडमाड उंच, कशी पोचू तुझ्या ओठांकडे??
तू आता गाडी कशी चालवू या चिंतेत असशील..
मी हसून पुन्हा डोकं तुझ्या रुंद छातीवर ठेवेन, विश्वासाने..
तुझा गंध भरून घेईन श्वासांमध्ये..
बघेन ठोके वाढतायत का..
आणि मग...
.....
पण जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
तेव्हा तुला माझी आठवण येईल ना?
खूप खूप आठवण येईल ना?????

आठवणीकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Jun 2020 - 9:28 am | प्रचेतस

क्या बात..! बहोत खूब.

मोगरा's picture

22 Jun 2020 - 8:25 pm | मोगरा

छान

सस्नेह's picture

22 Jun 2020 - 9:43 pm | सस्नेह

लडिवाळ कविता !

प्राची अश्विनी's picture

23 Jun 2020 - 9:05 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!:)

श्रीकांतहरणे's picture

22 Jun 2020 - 10:27 pm | श्रीकांतहरणे

वा हा खूप खूप प्रकार ....खरंच ... खूपच आहे बाबा....

प्राची अश्विनी's picture

23 Jun 2020 - 9:01 am | प्राची अश्विनी

:):)

वीणा३'s picture

22 Jun 2020 - 10:31 pm | वीणा३

जीव घेतलात आज :)

रातराणी's picture

22 Jun 2020 - 11:51 pm | रातराणी

हा हा मला पण टेन्शन आलं आता हा गाडी कशी चालवणार म्हणून :) :)
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक ;)

कविता आवडलीच :)

प्राची अश्विनी's picture

23 Jun 2020 - 9:06 am | प्राची अश्विनी

हम्म.. मनाचा ब्रेक..;)

सत्यजित...'s picture

23 Jun 2020 - 12:16 am | सत्यजित...

असं सहज सोप्पं हळवं लिहिणं अतिशय अवघड!
खूप छान! खासंच!

शा वि कु's picture

23 Jun 2020 - 8:25 am | शा वि कु

.

मूकवाचक's picture

23 Jun 2020 - 9:11 am | मूकवाचक

+१

प्राची अश्विनी's picture

23 Jun 2020 - 9:08 am | प्राची अश्विनी

प्रचेतस, मोगरा, सस्नेह, श्रीकांत हरणे, रातराणी, वीणा, सत्यजित आणि शाविकु., धन्यवाद!!

प्रसाद गोडबोले's picture

23 Jun 2020 - 7:43 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर कविता !

ही कविता , हा क्षण जगलोय मी ... यवतेश्वरच्या पठारावर.

आठवण येते अगदीच नाही असं नाही, पण अगदी खुप प्रकर्षाने येते असंही नाही . फॅक्टय , खोटं नाय बोलत.

दर वेळी जुन्या पावसाची आठवण काढत बसलं की हाताशी असलेल्या पावसात मनसोक्त चिंब भिजता येतं नाही, आत्ता आहे ह्या क्षणात राहुन , अत्ता आहे तो पाऊस स्वतंत्रपणे एन्जोय करता येणं ह्यात खरी मजा आहे ;)

प्राची अश्विनी's picture

25 Jun 2020 - 6:51 pm | प्राची अश्विनी

किती प्रांजळ प्रतिसाद! आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2020 - 8:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लास !

-दिलीप बिरुटे

गणेशा's picture

23 Jun 2020 - 8:18 pm | गणेशा

वा मस्तच
पुन्हा वाचली.. अप्रतिम

जव्हेरगंज's picture

23 Jun 2020 - 9:37 pm | जव्हेरगंज

सहज, सुंदर, मस्त!!

बबन ताम्बे's picture

24 Jun 2020 - 10:16 pm | बबन ताम्बे

खूप छान ! चिंब पावसात हुरहूर लावणारी कविता.

प्राची अश्विनी's picture

25 Jun 2020 - 6:52 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद!!