भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक भेट - २१ डिसेम्बर आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस
संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आज रोजी Winter/December Solstice म्हणजे उत्तरायणाचा प्रारंभ होत असलेला २१ डिसेम्बर हा दिवस "आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस" म्हणून साजरा करायला मान्यता दिली आहे. २१ जूनच्या "आंतरराष्ट्रीय योग दिवस" ह्या यशानंतर भारताने आणखी एक यश मिळवले आहे. योगानंतर "ध्यान" हि भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक भेट (cultural export gift) आहे. प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसाचे उदघाटन करण्यात येणार आहे.