चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
13 Oct 2025 - 11:11 am

नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.

आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.

१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )

२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५

३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!

संस्कृतीधर्मविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

13 Oct 2025 - 11:53 am | विजुभाऊ

नव्या घडामोडीत राज उद्धवर एकत्र येणार अशा बातम्या येताहेत. पण ते एकत्र येऊन काय होणार आहे हेच कळत नाही.
वर्तमानपत्राना बातम्या दाखवता येतील इतकेच.
उद्धवनी कितीही जाहीर केले तरी राज मात्र कोणत्याच बातमीवर मत प्रकट नाहियेत. उबाठांच्या पक्षाचे प्रतोद मात्र रोज वेगवेगळ्या विषयावर कुणी न विचारताच मतप्रदर्शन करत आहेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2025 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत. महाराष्ट्राने आता इतके बदल पाहिले आहेत की त्याची काही मर्यादा राहिली नाही. तेव्हा, हाही बदल महाराष्ट्राने एकदा पाहुनच घ्यावा.

स्व.बाळासाहेबांनी उद्धव ऐवजी राज यांचीच तेव्हा निवड करायला पाहिजे होती असे मला कायम वाटले आहे.

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

14 Oct 2025 - 2:47 pm | शाम भागवत

राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.

मलाही असेच मनापासून वाटते. तसे झाले तरच ठाकरे ब्रँडमधे धुगधुगी शिल्लक राहील व शिंदेंकडे सैनिकांचा ओघ वाढून शिंदे आणखीन बळकट होणार नाहीत.
भाजपाला महाराष्ट्रात स्वबळावर सरकार जोपर्यंत आणता येत नाही व जोपर्यंत शरद पवार राजकारणात आहेत, तोपर्यंत तरी उध्दवजी, राजजी व अजित पवार राजकारणात शिल्लक राहिलेच पाहिजेत.
:)
शरद पवार असेपर्यंत तरी वरील तिघांना मोदी अभय देणारच.
:)
आणि शरद पवारांचे सर्व डावपेच ओळखून ते उधळून लावण्याची क्षमता असणारे देवाभाऊ मुमं म्हणून राहणारच.

एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.

कानडाऊ योगेशु's picture

16 Oct 2025 - 7:57 am | कानडाऊ योगेशु

एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.

शरद पवार साहेब राजकारणातुन संन्यास घेतील हे दिवास्वप्न (देवास्वप्न :) ) आहे. ठाकरे बंधुंचा इगोच इतका मोठा आहे कि त्यापुढे त्यांना बाकीचे पक्षासंबंधित राज्यासंबंधित असलेले फायदे दिसतच नाहीत. जरी दोन्ही बंधु एकत्र आले तर ते दोन्ही पक्षांसाठी एक मोठे अराजक ठरेल असे वाटते.

अभ्या..'s picture

16 Oct 2025 - 4:54 pm | अभ्या..

राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.

भारी निरागस काड्या टाकता हां सर.
परफेक्ट ठासलेल्या चिलिमी धुमसू लागतात लगेच.

शाम भागवत's picture

16 Oct 2025 - 5:24 pm | शाम भागवत

:)

सुबोध खरे's picture

13 Oct 2025 - 7:49 pm | सुबोध खरे

बैल गेला आणि झोपा केला.

या म्हणीची आठवण झाली.

मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Oct 2025 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली

मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही. .
निवडणूक आयिगाने भाजपला मदत न करता प्रामाणिक निवडणूक घेतल्या तर नक्की होईल.

रात्रीचे चांदणे's picture

13 Oct 2025 - 9:53 pm | रात्रीचे चांदणे

राज आणि उद्धव दोघेही आळसी आहेत. ऐन निवडणुकीतही दोन नाहीतर तीन सभा घेतेत. शक्यतो एकच. त्यामुळे एकत्र आले तरी फारसा काही फरक पडणार नाही.

कानडाऊ योगेशु's picture

14 Oct 2025 - 8:33 am | कानडाऊ योगेशु

तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे.

सगळीकडे हीच समस्या आहे. जवळचा एक नातलग अश्या अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार काम केले अथवा नाही केले तरी संबंधित अधिकार्यावर कारवाई करणे हे नित्याचेच झाले आहे. म्हणजे अश्या अटी पुर्या करताना वरुन प्रेशर येते कि अटी शिथिल करा व कालांतराने त्याच शिथिल केलेल्या अटींमुळे संबंधित अधिकारी अडचणीत येतो.

सौन्दर्य's picture

14 Oct 2025 - 6:39 pm | सौन्दर्य

अफगाणातील तालिबान सरकारला दिलेले समर्थन तसेच त्यांच्या बरोबरची मैत्री घातक ठरणार आहे. 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' हे ऐकायला कितीही गोड वाटत असले तरी काही बाबतीत त्याला अपवाद हा असतोच.

सुबोध खरे's picture

14 Oct 2025 - 7:12 pm | सुबोध खरे

तो शुद्ध व्यापार आहे. अफगाणिस्तान बेचिराख झाला आहे त्याची पुनर्बांधणी होईल तेंव्हा तेथे आपल्या अनेक कंपन्यांना कंत्राटे मिळू शकतील

याशिवाय तेथे असलेला दुर्मिळ खनिजांचा खजिना हा एक फार महत्त्वाचा भाग आहे

Afghanistan possesses significant deposits of rare earth minerals like lanthanum, cerium, and neodymium, along with other valuable minerals such as lithium, cobalt, and niobium. These resources are crucial for modern technologies, but their extraction has been hindered by political instability, security issues, and lack of infrastructure. The Helmand province is known to have some of the most important deposits.

चीन वरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने हा एक फार मोठा आधार ठरू शकतो.

अमेरिका अफगान युद्धात आणि कोव्हीड मध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर मानवतावादी मदत केली आहे याबद्दल अफघाण लोक कृतज्ञ आहेत.

याशिवाय अगोदर रशिया आणि नंतर अमेरिकेशी युद्ध केल्यामुळे अफघाण लोकांचा या दोघांवर अजिबात विश्वास नाही. तेथील खनिज उत्खननासाठी त्यातनं तंत्रज्ञान हवेच आहे जे भारताजवळ आहे शिवाय स्वस्त आहे

हेलमंड प्रांतात असलेली हि खनीजे चाबहार या इराणच्या जवळच्या बंदरातून (होर्मूझ च्या समुद्रधुनीच्या पूर्वेकडून) आपल्याला हि खनिजे आणणे फार सोपे आहे

अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage)

अफगाण लोकांना भारताबददल बरीच आत्मीयता आहे हा एक अजून फायदा.

जगाच्या इतिहासात कोणताही देश आपला कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो.

>> अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage)

अफगाणिस्तान - चीन व्यापार
चीनक्डून आयातः ९६२ मिलियन डॉलर्स
चीनला निर्यातः ६३.९ मिलियन डॉलर्स

अफगाणिस्तान - भारत व्यापार
भारताकडून आयातः '--' (बहुधा किरकोळ असावी, त्यामुळे दिलेली नाही
भारताला निर्यातः ६६७ मिलियन डॉलर्स

याचा अर्थ चीनचा अफगाणिस्तानशी व्यापार आपल्यापेक्षा खूपच जास्त असून अफगाणिस्तान चीनकडून जेवढ्या वस्तू आयात करतो, त्याच्या जवळ्पासही भारताकडून काही घेत नाही परंतु भारताला चीनपेक्षा १० पटीहून अधिक निर्यात करतो. हे खूपच विषम चित्र आहे.

त्यामुळे आपल्याला फर्स्ट मूव्ह वगैरे काहीही फायदा नाही. चीनबरोबरचा त्यांचा व्यापार आपल्यापेक्षा १० पट जास्ती आहे. शिवाय ते आपले ग्राहक नसून आपण त्यांचे ग्राहक आहोत. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्याला खूष ठेवायला हवे. अफगाणिस्तानची एवढी दाढी कुरवाळण्याची काय गरज आहे? समर्थन म्हणजे काहीही केले तरी सरकारचे समर्थन करायचेच, हे अजब आहे.

स्वधर्म's picture

14 Oct 2025 - 8:03 pm | स्वधर्म
सुबोध खरे's picture

14 Oct 2025 - 9:37 pm | सुबोध खरे

India Exports to Afghanistan was US$333.52 Million during 2024, according to the United Nations COMTRADE database on international trade.

बाकी चालू दया

सुबोध खरे's picture

14 Oct 2025 - 9:50 pm | सुबोध खरे

Based on recent reports in October 2025, Afghanistan is actively inviting India to invest in and import several minerals, including critical resources like copper, lithium, and rare-earth minerals. While past exports have been limited due to instability, these new developments signal Afghanistan's desire to significantly expand its mineral trade with India.

स्वधर्म's picture

14 Oct 2025 - 9:54 pm | स्वधर्म

कृपया दुवा द्या

स्वधर्म's picture

15 Oct 2025 - 3:00 pm | स्वधर्म

चीनबरोबरचे अफगाणीस्तानचे व्यापारी संबंध भारतापेक्षा निश्चितच जास्त आहेत असा माझा मुद्दा होता. त्यावर तुंम्ही दिलेल्या दुव्यांमध्ये चीनच्या तुलनेत भारताला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हान्टेज मिळेल असे काहीही आढळले नाही.

बाकी त्यांनाही आपली तितकीच गरज आहे. आपण ग्राहक म्हणून तालिबानला वाकवूच शकतो. त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत. हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा.

अभ्या..'s picture

15 Oct 2025 - 4:10 pm | अभ्या..

हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा.
त्यातल्या त्यात २००१ साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी "तालिबान्यांकडून बामियानच्या बुध्दमूर्तीच्या नाशामुळे" मानवतेच्या आवाजासाठी तत्कालीन कित्येक सरकारांना आणि युनायटेड नेशन्स ला आवाहन केलेले होते, मोदी आणि योगीकडून ज्या तालिबानी कृत्याची निर्भत्सना कित्येक वेळी केली गेली आहे त्याच घटनेचे बुध्द मूर्ती विनाशानंतरचे पेन्टींग पार्श्वभूमीवर लावणे ह्यात तालिबानचा कोणता गौरव घेऊन ते भारतात आले आहेत हेच स्पष्ट होते.
नॉर्मल भेट ठिकच आहे पण महिला पत्रकारांना प्रवेश नाकारणे आणि मुद्दामून तेच पेंटींग घेऊन येणे (कारण ते भारतात कुणी दिले असेल त्यांना तर अधिक गंभीर आहे) आणि त्याचे प्रदर्शन करणे हेच तालिबानच्या हेतूमधील खोच आणि आपल्या सरकारचे सरपटणे दाखवते.
बाकी सौदीचा देवबंदींना पतपुरवठा थांबल्यापासून ते आता सौदीचा पाकिस्तानसोबतचा संयुक्त सुरक्षा करार आणी तालिबानचा भारतासोबतचा करार, पाकिस्तानचे चीनसोबतचे भारतावरच्या अक्रमणातले सहाय्य आणि ज्या रशिया अमेरिकेने अफगाणी दगडांवर डॉके फोडून घेतलेले आहे त्या रशिया अमेरिकेचे भारतासंबधात बदलेलेले संबध हा प्रवास रोचक आहे.

सुबोध खरे's picture

15 Oct 2025 - 6:44 pm | सुबोध खरे

त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत.

पूर्वग्रह असला कि मूलभूत गोष्टींचा विसर पडतो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे.

विकिलीक्स वाला ज्युलियन असांजे हा लंडन मध्ये सात वर्षे इक्वेडोर देशाच्या वकिलातीत राहत होता. तेथे ब्रिटनचा कायदा चालत नाही.

तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.

त्याचे राजकारण काँग्रेसच्या राजकारण्यांनी केले यात नवल नाही.

कारण इथे मिपा वर सुद्धा मूलभूत माहिती न घेता तोंड सोडणारे लोक कमी नाहीत मग सामान्य लोकांची काय कथा?

सरकारबद्दल कमालीचा द्वेष असला तरी परराष्ट्र धोरण, लष्कराबाबत किंवा इसरो अणुऊर्जा इत्यादीसाठी घेतलेली दूरगामी धोरणे एका रात्रीत बदलत नाहीत.

काँग्रेसचे सरकार असते तरी येथे तालिबान बरोबर संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न केले गेले असते याबद्दल मला शंका नाही.

जर १९७१ मध्ये युद्ध लष्कराने लढले असले तरी त्याचे श्रेय श्रीमती इंदिरा गांधी यांना च दिले जाते तद्वत आज ऑपरेशन सिंदूर चे श्रेय श्री मोदी यांनाच मिळणार आहे मग आपण कितीही आदळ आपट किंवा चिडचिड करा.

अभ्या..'s picture

16 Oct 2025 - 12:40 pm | अभ्या..

परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे.
तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.

.
काहीही काय फेकताय?
मूळ अधिकृत वकिलात असली तर तेथे ती इम्म्युनिटी आणि स्वातंत्र्य.
भारताने २०२१ लाच अफगाणिस्तानातली वकालत बंद केली आणि सगळे डिप्लोमॅट्स, विद्यार्थी, जमेल तेवढे नागरिक परत आणले.
परत ह्या महिन्यात ती चालू केलेली आहे पण अद्याप तालिबान सरकारला अधिकृतता दिलेली नाहीये.
अफगाणिस्तानची भारतातली एम्बसी २०१५ ला उद्घाटन झाले. जमीन १९५६ ला घेतलेली होती.
ऑगस्ट २०२१: तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर, नवी दिल्लीतील अफगाण दूतावास हा बहिष्कृत प्रजासत्ताक सरकारमधील राजदूतांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहिला. बहुतेक आंतरराष्ट्रीय समुदायाप्रमाणे भारतानेही तालिबान प्रशासनाला मान्यता दिली नाही.
नोव्हेंबर २०२३: नवी दिल्लीतील दूतावास कायमचा बंद झाला. माजी सरकारच्या राजदूतांनी भारत सरकारकडून पाठिंबा नसणे आणि तालिबानचा दबाव हे बंद करण्याचे कारण असल्याचे सांगितले.
२०२४-२०२५: तालिबान नियंत्रण आणि पुन्हा सुरू होण्याची शक्यता शोधत आहे
२०२४: तालिबान प्रशासनाने मुंबईतील अफगाण दूतावासात एक वाणिज्य दूत नियुक्त केला, ज्यामुळे भारतात त्यांची वाढती राजदूतीय उपस्थिती दिसून आली. मुंबई आणि हैदराबादमधील अफगाणिस्तानचे वाणिज्य दूतावास मर्यादित सेवांसह कार्यरत राहिले.
ऑक्टोबर २०२५: तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यातील ऐतिहासिक बैठकीनंतर, दोन्ही देशांनी पूर्ण राजदूतीय दूतावास पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली. दूतावास पुन्हा सुरू करण्यासाठी तालिबान राजदूत आता नवी दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे
.
मग कुठली आलीय इम्म्युनिटी?
.
सध्या रशिया हे एकमेव राष्ट्र आहे कि ज्यानी तालिबान सरकारला अधिकृतता बहाल केली आहे. बाकी सर्वानी कंडीशनल अ‍ॅक्सेस आणि काही बोलणी चालू आहेत.
.
म्हणजे ही कुठली पध्दत की घराचे अ‍ॅग्रीमेंट करायला घरात बोलवायचे आणि अद्याप काही व्यवहार न होता त्याला मालकी बहाल करुन चाव्या सोपवायच्या, नवीन मालकांने पण स्वतःच्या नेमप्लेटसहीत, पेंटींग्स लावून घर सजवायचे तेही मालकाचा अपमान करुन आणी जुन्या मालकाच्या पाळीव लोकांनी त्याचा घरमालक म्ह्णणून अधिकारच आहे असा उदोउदो करायचा.
सरपटणे ह्यालाच म्हणतात.
जळजळीला ओवा चालतो, पाठीचा कणाच मोडला की सरपटावेच लागते.

स्वधर्म's picture

16 Oct 2025 - 5:08 pm | स्वधर्म

अभ्या, तुंम्ही लिहिलेले मुद्दे १००% टक्के बरोबर आहेत. त्यामुळे या प्रकारच्या वागणुकीस सरपटणे असेच म्हणावे लागेल.
पहिले असे की, भारताने अजून इस्लामिक इमिरेट ऑफ अफगाणिस्तान या तालिबान नियंत्रित सरकारला अधिकृत मान्यताच दिलेली नाही. भारताने अजूनही वकालतीची मालकी इस्लामिक रिपब्लीक ऑफ तालिबान या पूर्वीच्या सरकारकडून तालिबान सरकारकडे वर्ग केलेलीच नाही.
Taliban representatives claim full control over the embassy, although India has not officially transferred authority to Taliban-appointed diplomats.

दुसरे असे की पंतप्रधान भारतात कधीही खुली पत्रकार परिषद घेत नाहीत, पण अमेरिकेत गेल्यावर त्यांना तिथले नियम पाळावेच लागलेले आहेत. त्यामुळे टेलिप्रॉम्प्टर वापरून का असेना, तिथल्या नॉन-गोदी मिडीया समोर त्यांना खुल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागतात. (त्यात काय होते हा मुद्दा वेगळा). त्यामुळे भारतात आल्यावर तालिबानींना इथले नियम पाळले पाहिजेत.

तिसरे असे की, अफगाणिस्तान पेक्षा भारत हा जवळजवळ सर्व दृष्टीने विकसित, बलवान व मोठा आहे. तरीही आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर का कच खावी?

सुबोध खरे's picture

16 Oct 2025 - 6:21 pm | सुबोध खरे

सरपटणे ह्यालाच म्हणतात.

मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.

हे वाचलंच नाहीये म्हणून अशी जळजळ होते आहे.

चालू द्या.

तुंम्ही चीनच्या तुलनेत आपल्याला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हांटेज मिळेल हा मुद्दा मांडला होता. त्यावर मी तसे का नाही हे सांगणारे उत्तर दिले होते. आता आपण तो मुद्दा सोडून फक्त महिलांच्या पत्रकारपरिषदेतील प्रवेश बंदीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे फर्स्ट मूव्हचा मुद्दा बरोबर नव्हता हे मान्य केले असे समजायला हरकत नाही.

बाकी रेअर अर्थ खनिजांबाबत जे व्यापार युध्द सुरू आहे त्यात हा एक व्हिडिओ पाहिला. Trade war explained: The rare earth metals China dominates and US needsया क्षेत्रात उत्पादक म्हणून भारताचे नांव आहे पण अफगाणिस्तानचे नांवही नाही. त्यामुळे तालीबानचे लाड करण्यामागे तुंम्ही म्हणता तसा शुध्द व्यापार आहे या तुमच्या (एन डी टी व्ही च्या?) मतावर विश्वास ठेवणे कठीण आहे. काही उद्योगपतींना मिळू शकणारी तिथली कंत्राटे हा मुद्दा आणि तालीबान्यांची सरबराई यात काही संबंध आहे का?

शाम भागवत's picture

16 Oct 2025 - 6:16 pm | शाम भागवत

आपली संरक्षण सिध्दता तेल विहीरी उत्खननातून स्वयंपूर्णता, देशी विमानांचे इंजिन या गोष्टी पूर्ण होईपर्यंत म्हणजे अंदाजे २०२९ पर्यंत तालाबानशी मर्यादित चुंबाचुंबी करायला काहीच हरकत नाही. मला वाटते आपल्या अस्तनीतले निखारे शोधण्यासाठी तालीबानचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे.
:)

सौन्दर्य's picture

16 Oct 2025 - 12:41 am | सौन्दर्य

खरे साहेब,
राजकारणातही कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे म्हंटले जाते. तरी देखील तालिबानचे कायदे, त्यांची इतर वर्तणूक पाहता अशा लोकांशी मैत्री ही आज ना उद्या अंगाशी येणारच. स्व:ताच्या देशाचा फायदा, इतर देशांना लांब ठेवणे, खनिजे वगैरे कितीही आकर्षक वाटले तरी देखील ही एक अभद्र युती ठरेल व पुढेमागे आपल्या देशासाठी घातक ठरेल.

सुबोध खरे's picture

14 Oct 2025 - 7:15 pm | सुबोध खरे

The Taliban are sitting on $1 trillion worth of minerals the world desperately needs

https://edition.cnn.com/2021/08/18/business/afghanistan-lithium-rare-ear...

सुबोध खरे's picture

14 Oct 2025 - 9:52 pm | सुबोध खरे

Beijing could be skeptical of partnering on ventures with the Taliban given ongoing instability, however, and may focus on other regions. Khan pointed out that China has been burned before, having previously tried to invest in a copper project that later stalled.

“I believe they will prioritize other emerging/frontier geographies well before Taliban-led Afghanistan,” said RK Equity partner Howard Klein, who advises investors on lithium.

चौथा कोनाडा's picture

14 Oct 2025 - 10:48 pm | चौथा कोनाडा

महत्वाची आणि रोचक माहिती....
तालीबानने जुन्या अफगाणीस्थानची धोरणे अवलंबली तर १९८० च्या वेळेचे मैत्रीपर्व पुनर्जिवित होऊ शकते !

रात्रीचे चांदणे's picture

14 Oct 2025 - 10:39 pm | रात्रीचे चांदणे

तळीबान बरोबर आपण चर्चा चालू केली ती योग्यच आहे. हे आगोदरच करायला पाहिजे होत.
त्यांना इतर मदतीबरोबरच सरक्षण साहित्याची मदत पण करायला पाहिजे.

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Oct 2025 - 9:24 am | चंद्रसूर्यकुमार

अफगाणिस्तान आणि तत्कालीन ब्रिटिश भारतामधील ब्रिटिशांनी आखलेली ड्युरंड लाईन पठाणांना अजिबात मान्य नाही. त्या सीमारेषेच्या दोन्ही बाजूंना जर पठाण राहात असतील तर ती कृत्रिम सीमारेषा नको असेच पठाणांना वाटते- म्हणजेच खैबर पख्तुनवा प्रांत आपलाच असे अफगाणिस्तानातील पठाणांना वाटते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मतभेदांचे हे कारण पूर्वीपासून होते. अफगाणिस्तान आपल्या नियंत्रणात ठेवता येईल म्हणून पाकिस्तानने तालिबानची निर्मिती केली पण त्याचवेळेस अफगाणिस्तानातील पठाणांनाही खैबर पख्तुनवा हवा आहे हे ते विसरले बहुतेक. अमेरिकेकडून पैसे खायला मिळतील म्हणून ९/११ नंतर मुशर्रफने अमेरिकेला मदत केली आणि त्यातून तालिबानवर हल्ले करायला पाकिस्तान हा बेस मिळाला तेव्हापासूनच तालिबानचे पाकिस्तानशी संबंध बिघडायला सुरवात झाली. एकीकडे अमेरिकेकडून पैसे खायचे आणि दुसरीकडे ओसामाला लपवून ठेवायचे हा पण डबल गेम पाकिस्तानने खेळला. काहीही असले तरी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उखडली गेली आणि त्याला पाकिस्तानने मदत केली हे पठाण विसरू शकले नसावेत. त्यात तात्यांना काबूलचा बगराम हवाईतळ हवा आहे. त्यांना खूष करायला म्हणून मुनीरने थेट काबूलवर हवाई हल्ले केले. ही गोष्ट तालिबान कसे सहन करतील? ही आपल्याला उत्तम संधी आहे. त्याचा फायदा आपण उठवायला पाहिजे. तालिबान म्हणत असतील की काश्मीरवर भारताचा हक्क आहे तर आपण पण खैबर पख्तुनवावर अफगाणिस्तानचा अधिकार मान्य करावा. आयजीच्या जीवावर बायजी उदार होऊन पेशावर आणि तो प्रदेश अफगाणिस्तानचा आहे हे आम्हाला मान्य आहे असे म्हटले (म्हणजे उघडपणे म्हटले नाही तरी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात भांडणे लावून द्यायला काही केले) तर आपल्या बापाचे काय जाणार आहे? पाकिस्तानात पठाण लोक नुसते खैबर पख्तुनवामध्येच आहेत असे नाही तर इतर भागाताही पसरले आहेत. ते पठाण आणि पंजाबी वर्चस्व असलेली पाकिस्तानी व्यवस्था यांच्यात भांडणे लागून दोघे एकमेकांना मारत असतील तर ते आपल्यासाठी चांगलेच आहे ना?

काहीही असले तरी तालिबान हा आपला दीर्घकालीन मित्र वगैरे होणे अशक्य आहे. पाकड्यांना ठोकायला म्हणून ही तात्पुरती व्यवस्था आहे. त्याच पठाणांच्या टोळधाडींनी भारतात शेकडो वर्षे नंगानाच चालवला होता हे आपण विसरू शकणार नाही/विसरू नये. एकदम आयडिअल परिस्थिती होईल की एकमेकांना मारताना पाकिस्तान आणि तालिबान दोघेही संपून गेले तर. तसे होणे जरा कठीणच आहे. पण पठाण आणि पंजाबी एकमेकांशी अनिश्चित काळ भांडत राहिले तर ते आपल्यासाठी चांगले होईल. पठाणांनी वर्षानुवर्षे संघर्ष यापूर्वी अनेकदा चालू ठेवला आहे- ब्रिटिश, रशियन आणि अमेरिकनांविरोधात. तसाच पाकड्यांविरोधात पण चालू ठेऊ देत. कदाचित पुढील काही वर्षात पाकिस्तानचे तुकडे पडतील. काहीही झाले तरी त्या पठाणी टोळधाडींच्या मध्ये कमकुवत का होईना कोणतातरी प्रदेश त्या पाकिस्तानच्या तुकड्याच्या निमित्ताने हवा.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Oct 2025 - 8:55 am | अमरेंद्र बाहुबली

अफगाणिस्थानशी मैत्री नी अमेरिकेशी संबंध खराब! :)
ह्यामुळेच आजच्या काळाला “गोबरयुग” संबोधले जात असावे का?

अप्पा जोगळेकर's picture

15 Oct 2025 - 11:48 am | अप्पा जोगळेकर

Afaganistan is connected to POK & it is likely that India is aiming to make use of older silk route to reach Europe.
This is way more cheaper than existing Suez Cancal Route and beneficial for Afganistan as well.
Hence Indian Army mentioning that Pakistan will have its Geography changeद & Taliban mentioning 'POK is integral part of India' may not be a coincidence.

अफगाणीस्तानशी मैत्री ही शत्रु चा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने आहे.
दुसरे हे की अफगाणिस्थानमधे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी भारतीय कम्पन्याना व्यवसाय मिळू शकतो.
पाकिस्थानला जर शह द्यायचा असेल / चाप लावायचा असेल तर भारताला इराण आणि अफगाणीस्थान सोबत मैत्रीसंबन्ध ठेवणे गरजेचे आहे

तालिबान आणि भारत चर्चा .......

भेटीमागचं कारण काय असेल?
१.पत्रकार परिषदेत दोन तीन महिलाही होत्या हे चानेलवाले दाखवत होते. महिलांबाबत उदार धोरण अवलंबत आहोत हे दाखवायचे आहे का?
२. अफगाण सरकारची अमेरिकेतील संपत्ती गोठवली गेली आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतील का?
३. भारतीय गुंतवणुकदारांची बरीच गुंतवणूक बुडीत झाली आहे त्याबद्दल प्रयत्न?
काय सांगता येईल?

कपिलमुनी's picture

16 Oct 2025 - 7:34 am | कपिलमुनी

यांची स्त्रियाबद्दलची मूळ शिकवण सारख्याच विचारांची असल्याने भाजप्ये समर्थकांना त्याचे समर्थन सोपे जात आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Oct 2025 - 10:12 am | अमरेंद्र बाहुबली

+१

सुबोध खरे's picture

16 Oct 2025 - 10:49 am | सुबोध खरे

इतका द्वेष आणि इतकी जळजळ?

कोण सनातनी आज अशा राजकारणात आहेत जे असे स्त्रियांना पायाचे बोट जरी दिसले तरी सार्वजनिक रित्या फटके मारण्याचे समर्थन करत आहेत? केवळ रा स्व संघाचा द्वेष म्हणून हिंदुत्ववाद्यांना सनातनी म्हणून त्यांची तालिबानशी तुलना करायची

आज शरिया लागू करा म्हणणारे मुस्लिम नेते निदान ५० % असतील.

जरा काही झाले कि इस्लाम खतरे मे है म्हणणारे नेते सहज दिसतात त्यांच्याबद्दल बोलायची तुमच्यात हिम्मत नाही. कारण सर तन से जुदा होण्याची भीती. भेकडपणा आणि दांभिकपणा हि फुरोगामिनची खासियतच आहे

इस देश के कितने भी तुकडे हो जाये हम किसी को अपने मझहब से खिलवाड करने नही देंगे म्हणणारा समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो.

किती हे अध:पतन

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Oct 2025 - 11:19 am | अमरेंद्र बाहुबली

समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो.
उठ सूठ कुणाच्याही मागे इडी लावून त्रास देणाऱ्या भाजपने ह्या दोघांच्या मागे कधी इडी लावली आहे का? काय कारण असावे? सारखीच विचारसरणी आहे म्हणून? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणी तालिबान ह्यांच्या विचारसरणीत काहीही फरक नाही. संघाने कधीही मनुस्मृतीला विरोध केलेला नाही. संघाचा मनुस्मृतीला छुपा पाठिंबा आहे, मनुस्मृतीत स्त्रियांबद्दल काय लिहिले आहे माहीत करा! तालिबानी नी संघ/भाजप ह्यांची विचारसरणी एकसारखी आहे, नाहीतर महिलांचे शोषण करनारे कुलदीप सेंगर, ब्रिजभूषण सिंह ह्यांचे समर्थन सोशल मीडियावर अंधभक्ताना समर्थन करावे लागले नसते तसेच मोदी सरकारनेही त्याना वाचवायचे आटोकाट प्रयत्न केले नसते! तेव्हा भाजप/ संघ हा महिलाविरोधी नाही, मध्ययुगीन मानसिकता भाजपेयींचो नाही ह्याचे खोटे समर्थन बंद करा!

जौ द्या हो. ह्यामुळेच आजकाल धाग्यावर कुणी फिरकत नाही. ह्यांची एकच टेप लागलेली असते. वरुन २/३ होयबा आहेत तळी उचलायला ..

सुबोध खरे's picture

16 Oct 2025 - 11:45 am | सुबोध खरे

you said it.

चपखल

शाम भागवत's picture

16 Oct 2025 - 12:40 pm | शाम भागवत

संघाला विरोध करण्याची (अपयशी) पध्दत १०० वर्षानंतरही चालू ठेवण्याचा ठाम निर्धार खरोखरच कौतुकास्पद आहे. ही केविलवाणी धडपड आहे असे कोणी म्हणेल. पण मी त्याला दुर्दम्य आशावाद समजतो.
:)))

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Oct 2025 - 3:45 pm | चंद्रसूर्यकुमार

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे म्हणत एका तथाकथित पक्षाचे तीन पिढ्या दुकान चालले. तसेच आहे हे. संघाला विरोध करत करत अनेकांची चार पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय झाली आहे- आणि कदाचित आणखी पिढ्यांच्या पोटापाण्याचीही सोय होईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Oct 2025 - 5:03 pm | अमरेंद्र बाहुबली

त्यांच्या प्रयत्नांमुळेच मुंबई महाराष्ट्रापासून तुटली नसेल! चिंता करू नका! त्यांच्या पुढच्या पिढ्याही नाही तुटू देणार! पहिलीपासून हिंदी लाडा किंवा मराठी संपवायचा कितीही प्रयत्न केला तरीही!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Oct 2025 - 1:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

-दिलीप बिरुटे

पत्रकारपरिषदेनंतर भांडूपचा भोंगा बंद पडला असे काल ऐकण्यात आले.