तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्वज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले. यामध्ये अवैदिक तत्वज्ञान परंपरा बौद्ध, चार्वाक, जैन यांची मूळ विचारसरणी सांगितली आहे.तद्नंतर वैदिक परंपरेतील अभ्यासकांची मते सांगितली आहेत.
१.बौद्ध तत्वज्ञान
बुद्धाला यात वैद्यराज म्हणून भूमिका पार पाडावयाची होती म्हणून 'अनुत्तर भिषक्को (निष्णात वैदय) आणि 'अनुत्तर सल्लकतो (कुशल शल्यकार) असे म्हटले हे समजले कारण बुद्धांनी जीवनातील (मनाच्या) व्याधीचे, रोगाचे निदान करून त्यावर रामबाण उपाय सुचविलेला आहे- दुःखमय जीवन हा एक आजार आहे, असे सांगून त्या आजाराचे मूल कारण शोधून ते नष्ट करण्याचे चार आर्यसत्य सांगितले
१.जीवन दुः कामय आहे (दुःखम)
२)दु:खाला कारण आहे, तृष्णा जगण्याची धडपड
३) दुःख नाहीसे करता येते.
४) दुःखमुक्तीचे मार्ग (आर्य अष्टांग मार्ग)
(सम्यक -दृष्टी, संकल्प, वाचा, कर्म, आजीविका, व्यायाम, स्मृती,समाधी)
तसेच सम्यक शील, प्रज्ञा, समाधी,
'भवतु सब्ब मंगलम्।'
२.इहवादी चार्वाक
चार्वाकांचे तत्वज्ञान समजण्यासाठी कोणताही विशिष्ट अस्सल ग्रंथ अगर साधन नाही इतर दर्शनांवर लिहिलेल्या ग्रंथांमधून चार्वाकाचे खंडन करतांना ली चार्वाकसूत्रे विखुरलेली दिसतात. बहुजनांसाठी उपयुक्त असे विचार यात आहेत असा वाद्यांचा दावा असल्याने याला कदाचित लोकायत असे म्हटलेले आहे.
चार्वाकाने 'प्रत्यक्ष' हे एकमेव प्रमाण मानतांना सुखवादाचा पुरस्कार केलेला आहे. आपल्या सुखवादाचा उपदेश करीत असताना चार्वाक म्हणतात,
'यावज्जीवेत सुकां जीवेत नास्ति मृत्योरगोचरः ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः ।।
"जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत सुखाने जगावे. मृत्यु कोणालाही टळलेला नाही. भस्म होणारा देह पुनः कोठून येणार?"
परंतू चार्वाकाचे विरोधक चार्वाकाच्या 'सुखाने जगा' म्हणून सांगणाऱ्या श्लोकातील दुसऱ्या चरणाचा विपर्यास करून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हा निंदात्मक श्लोक पुढील प्रमाणे सांगितला गेला.
यावज्जीवेल सुखं जीवेत ऋणं कृत्वा धृतं पिवेता भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः।
मूळ श्लोकात 'मृत्यु कोणालाही सुटलेला नाही' असे असताना त्या ठिकाणी 'कर्ज काढून तूप प्या' अशी शब्दरचना करण्यात आली आहे.
चार्वाकांनी पक्क्या इहवादी, जडवादी विचारांची इहवादी तार्कीक मांडणी केली. जी समाज जीवनाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक वाटतेच तसेच विज्ञानाला पोषक अशी विचारसरणी या तत्त्वज्ञानात आढळते.
३.विश्व आणि मानव-जैन दृष्टिकोन
विश्वाच्या निर्मितीविषयी जैनमतानुसार विश्वाला कर्ता म्हणून कोणीही नाही. हे विश्व अनादि वा स्वयंचलित असल्यामुळे विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वर मानण्याची आवश्यकता नाही- उत्पाद, व्यय व धौव्य यांनी युक्त्त असे द्रव्य आणि स्वयंचलित कर्माचा नियम ही दोन मानल्याने विश्वाचा व्यवस्थित उलगडा होऊ शकतो.
जैनदर्शन हे माणसाच्या सामर्थ्यावर भर देते.दृढ इच्छाशक्तीने, आत्मसामर्थ्याने, तपोबलाने विशिष्ट शक्तीच्या सहकार्याविना स्वतःच्या माणूस खताच्या उत्कर्षाचा रचनाकार होऊ शकतो
- मोक्षप्राप्तीसाठी श्रद्धेय अशी सात तत्त्वे व नऊ पदार्थ सांगितले आहेत.
ही सात तत्त्वे म्हणजेच जीव, अजीव, आस्त्रव, बंध, संवर, निर्जरा व मोक्ष • पाप व पुण्य आस्त्रवाचे दोन विशेष प्रकार आहेत. आस्त्रव म्हणजे कर्मकणांचा ओघ आणि हा ओघ आवरणे म्हणजे संवर होय.
मोक्ष प्राप्तीची तीन साधने
सम्यग्दर्शन-जी- सात तत्वांवरील संपूर्ण श्रद्धा
सम्यरज्ञाना - जीव व अजीव याच्या स्वरुपाचे ययार्थ ज्ञान
सम्यक्चरित्र - शुद्ध आचरण त्यासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय ब्रम्हचर्य व अपरिग्रह ही पाच व्रते सांगितली आहेत.
***********
या तीन अवैदिक दर्शनानंतर वैदिक तत्वज्ञानाची व त्याच्या अभ्यासकांची चिकित्सा केली आहे,
वैदिक तत्त्वज्ञानात तत्त्वज्ञान व धर्म यांचा मिलाफ दिसतो. केवळ बुद्धीप्रामाण्यवादाचा आश्रय घेऊन तात्त्विक मीमांसा करता येणार नाही, तर्काच्या मर्यादा ओलांडून पुढे गेल्याशिवाय सद्वस्तूचे ज्ञान होणार नाही. याच कारणास्तव ते ज्ञानसाधनेत साक्षात्काराला, अपरोक्षनुभवाचा महत्त्व देत 'ईश्वर तत्व मान्य करतात.
१.अमृतानुभवातील तत्त्वज्ञान
वेदान्तातील सर्व सांप्रदाय साक्ष्य प्रमाणाला विशेष महत्त्व देतात. परंतू ज्ञानदेव स्वानुभवाचीच कास धरतात',त्यांचे अनुभव शब्दाबद्ध झाले हेच करे भाग्य म्हणावे लागेल.
'परी शिवे का श्रीवल्लभे । बोलिले येणेोचि लोगे। मानू ले हे लागे । न बोलताचि । [अमृ. ३-९२]
आत्मतत्त्व सिदध करण्यासाठी प्रमाणांची आवश्यकता नाही, कारण ले स्वयंसिदध व स्वयंप्रकाशी आहे. उलट ज्ञानाची प्रमाणेच आत्म तत्त्वाने प्रकाशित होतात सूर्यप्रकाशामुळे अनेक वस्तू पाहता येतात, पण या वस्तू काही सूर्याला प्रकाशित करीत नाहीत. तद्वन आत्मतत्त्वाने प्रकाशित होणारी प्रमाणे आत्मतत्त्व सिद्ध करु शकत नाहीत (अमृ.५-१६).
तैसा आत्मा सच्चिदानंदू । आपण या आपणसिदधु आता काय ते शब्द। तयाचे आता ।।
शब्द आत्मतत्त्वाकडे आपले लक्ष वेधू शकतात, पण आत्मतत्व सिद्ध करू शकत नाहीत.
अविद्येचे खंड्ण करताना ज्ञानेश्वर म्हणतांत (अमृ ७-२५) 'काजवा ज्याप्रमाणे अंधाराचा आश्रय घेऊनच आपला प्रकाश मिरवीत असतो, त्याप्रमाणे अज्ञान खोटेपणाचा आश्रय घेऊन अनादि होत असते. असे असताना अज्ञानाचा व आल्याचा संबंध कसा घडेल ?
आत्म्यावाचून अज्ञान स्वतंत्र रहात नाही, म्हणून अज्ञान केवळ शब्दमात्रच आहे, त्याला स्वरुपसत्ता नाही असे ज्ञानदेव प्रतिपादन करतात
मग जगताचे स्वरुप कसे मानावे. ज्ञानदेव म्हणतात आत्मरुपाला एकाकी रमले नाही, अनेक रूपाने प्रकट होण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्याने जगत् निर्माणकेले (अमृ. ७-१२८) आत्मतत्त्व स्वतः हाच विस्तारित होते आणि जगद्रूप धारण करते, दृष्टया वस्तु रुपात स्वतःला पाहू शकतो.
'एकोडहं बहुस्याम प्रजायेय ।'
जीव-जगतः शिवशक्त्यात्मक आत्मतत्त्वाचा चिदविलास आहे. जगत् मिथ्या नाही तर सद्स्वरुपीच आहे.
२.द्वैती तत्वज्ञान
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात
प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान.
अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही.
अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत .
शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा.
द्वैती तत्त्वात पहिले मूलतत्व स्वतंत्र आहे तर दुसरे त्याचा परिणाम अस्वतंत्र आहे.
एकमेव स्वतंत्र असे ब्रम्हतत्त्व नित्य । परिपूर्ण दोषरहित, स्वयंप्रकाशी व सद्गुणपूर्ण आहे. विष्णु अद्वितीय आहे."
सर्व उत्पत्ती - स्थिती-लयाचे कारण विष्णू होय .
मध्वाचार्याची केवलद्वैतम्य सूत्रांचा निराळा अर्थ सांगितला आहे. उदा०
१.अथतो ब्रम्ह जिज्ञासा - नारायणाच्या प्रसादावाचून मोक्ष नाही. प्रसादज्ञानाशिवाय शक्या नाही म्हणून ब्रम्हजिज्ञासा करावी.
२.जन्माद्यस्य यतः
३.शास्त्रयो नित्वात-श्रुति व स्मृती सहाय्याने प्रमाण ठरते-मध्वाचार्य यांनुसार शास्त्राचे प्रामाण्य विष्णूच्या ठिकाणी आहे.
पुढे द्वैतामध्ये विविध भेद-जीव ईश्वर, जड-ईश्वर, जीव परस्परभेद जड-ईश्वर, जड परस्पर भेद सांगून त्यांतील अनेकता ,प्रभाव प्रमाण,परात्तंबित्व दाखवले. तुर्या ही अवस्था जीवितासाठी नाहीतर ईश्वराचे ते ययार्थ स्वरूप वर्णन मानले आहे.
ईश्वर सेवा अंकन, नामकरण, भजन द्वारे होते. विष्णूप्रसादाने विष्णूषदापर्यंत पोहचण्याचा असल्याने मोक्षाचा अधिकार सर्वांना आहे. यात समाजातील कोणतीही उच्चनीच नाही, समता आहे.
३.कृष्णमूर्ती यांचे अंतर्यामाचा फुलोरा व मृत्यूची संकल्पना
*जे. कृष्णमूर्ती सांगातात हे अद्वैती नाही पण मी' चा अभ्यास म्हणून इथे
सांबधिक 'मी 'त्वाचा जेव्हा अभाव होतो तेव्हा अंतमामाचा फुलोरा प्रफ्फुलित होतो. यासाठी प्रथम विचारांची कास सोडली पाहिजे, पाहिजे. याचा अर्थ सर्व ब क्षेत्रांत विचार वर्ज्य केले पाहिजेत असे नव्हे. तर धर्मा धनार्जन करून चरितार्थ चालविण्यासाठी, तांत्रिक व व्यावहारिक कारणांसाठी विचारांचा आधार घेतलाच पाहिजे. पण त्या पलीकडे जाऊन, परस्पर संबंधामध्ये
जेव्हा विचार येतात तेव्हा विचारच विषारी व घातकी होतात त्यांच्यामुळे प्रेमाचे अस्तित्व संपते. हे समजून घेऊन विचारांना खो दिल्याने शाश्वत प्रेमाचे दर्शन होते.
*मृत्यू
मृत्यू म्हणजे काय हे समजून घ्यावयाचे असेल तर सर्व अनुभव, सर्व ज्ञान, सर्व आठवणी पुसून टाकल्या पाहिजेत. याचा अर्थ वस्तुस्थितीच्या आठवणी, वास्तवाचे अनुभव पुसून टाकणे असे मात्र नव्हे. आपले घर, घरी जायचा रस्ता, अशा व्यावहारिक आठवणी, व्यावहारिक स्मृती पुसून टाकावयाच्या नाहीत तर मनातील भावनात्मक सुरक्षिततेला चिकटून रहाण्याच्या आठवणी, सुरक्षेसाठी ज्या आठवणी उराशी बाळगलेल्या असतात त्या सर्वांचे ओझे झटकून टाकणे होय. अशा प्रकारच्या सर्व भावना पुसून टाकणे होय. प्रत्येक दिवस हा नवा, ताजा, प्रसन्न असे झाले तर जिवंतपणीच मृत्यूही जाणता येतो. अशा प्रसंगी मन पूर्णपणे रिक्त झालेले असते. एकापरीने मनाचा अंतच झालेला असतो. जेव्हां मृत्यू अनुभवावयास मिळतो तेव्हांच अगदी नवीन असे कांहीतरी उदयाला येते. मृत्यू म्हणजे ज्ञातापासून मुक्ती होय. म्हणूनच कृष्णजी एक विचार नेहमी मांडतात तो म्हणजे 'दुसऱ्याच्या व स्वतःच्या सत्तेतून मुक्त होणे म्हणजे कालच्या प्रत्येक गोष्टीचा मृत्यू होणे. म्हणजे मग तुमच मन नेहमी ताजं, टवटवीत, चिरतरूण, निरागस उत्साहात आणि उत्कट भावनेनं भरलेलं राहील' (The Life & Death of Krishnamurti महाराष्ट्र टाईम्स, २३-४-९५)
४.जी. आर. मलकानी-एक अद्वैत वेदान्ती
मलकानी यांनी दृष्टिसृष्टीवाद स्वीकारला की,
जगताची निर्मिती ही ज्ञातृसापेक्ष होत असल्याने जगत निर्मितीसाठी ईश्वराची आवश्यकता भासत नाही म्हणून डॉ. मलकानी यांनी ईश्वरी कल्पनेचा त्याग केला आहे. त्यांनी सत्-चित्- आनंदा था ब्रम्ह लक्षणांचा परस्पर संबंधही विशद केला. ही लक्षणे नकारदर्शी मानली. सत्मुळे ब्रम्ह मायास्वरुपी नाही आणि चित् मुळे तुम्ह जडस्वरूपी नाही. आनंदामुळे ते कलेशकारी नाही हे सिद्ध होते, ब्रम्ह ही सत्यस्वरुवी आहे ते सान्त नाही.
ही चारही सत्तचित् आनंद ब्रम्ह व्याकरणदृष्टाभावरूप असली तरी तार्किकदृष्ट्या अभावरुप आहेत.
************
उपसंहारामध्ये धर्म आणि विज्ञान याचा विचार केला आहे.
धर्म व विज्ञान दोन्ही मानवनिर्मित आहेत. दोन्हींत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न होतो. एक श्रद्धा तर दुसरे इंद्रियानुभव । बुद्धीवरच भिस्त असणारे. पण दोन्ही जीवन सुकर करु शकते.
विज्ञानाने मानवाने भौतिकदृष्ट्या जग जवळ आणले व एक मानवी प्रतिसृष्टीच निर्माण केली. विज्ञानाचे अत्युच्च शिखर गाठल्याने धर्माची गरज काय, तो हळू हळू नष्ट होणार?
धर्म - ( धृ. - धारण करणे) याचा उगम निश्चित सांगता येता नसला तरी इंद्रियांच्या मर्यादा उल्लंघन जाण्याचा मानवी प्रयत्न म्हणजे धर्म). याच्या विकासाच्या तीन अवस्था गॅलोवेने सांगितल्या.
१.जमातीचा धर्म - प्राचीन खेळ्यांमध्ये अदृश्य शक्तीला संतुष्ट करण्यासाठी धार्मिक विधींची सक्ती होती. धर्मतत्त्वांविरुद्ध वर्तन करणाऱ्यास कडक शासन होत.
२.राष्ट्रीय धर्म - अनेक शोध लागले. शेतीची कल्पना सूचली. माणूस स्थिरावला, पूर्वीच्या अदृश्य शक्तींना खूप महत्त्व आले. जे गुण मानवात नाही, ते ईश्वरात असलात ही कल्पना आली. त्यातून राज्य वराष्ट्राची दैवले गरली. धार्मिक परंपरा मूर्ती, मंदिरे, यज्ञयाग, जप, तप, तंत्र-मंत्र गोष्टी धमाल शिरल्या, कला, स्थापत्य, काव्य, नृत्य इ. साहाय्याने धार्मिक भावना जागृत करण्याचा प्रयत्न होऊ लागला.
३.वैश्विक धर्म - प्रगल्भ विचारसरणीमुळे धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. सामाजिक समता, आर्थिक स्वायत्तता, राजकीय स्वातंत्र्य इ.चा धर्माशी संघर्ष नाही असे मानले.
नीतीशास्त्रापासून धर्मशास्त्र अलग झाले नीती संपन्न धार्मिक असलाच पाहिजे असे नाही. कलाही संगीतकला, नृत्यकला, शिल्पकला अशा स्वतंत्र विकसित झाल्या.
* ही अवस्था म्हणजे धर्म ही व्यक्तिगत बाब मानण्याची !धर्म व्यक्तीला शांतता व समाधान देण्याचे साधन झाले जमात, राष्ट्र बंधने झुगारुन...
मग विज्ञान युगात समाजाला धर्माची गरज आहे का? या संबंधात आइन्स्टाइन म्हणतो,
Science has progressed to far in present day society. There must emerge a new Spiritual civilizationto make full use of it'
विचार, उच्चार व आचारातून श्रेष्ठ मूल्यांचे दर्शन घडले पाहिजे म्हणजे spiritual civilization उदयास येईल.
संदर्भ -तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत
लेखक- डॉ .बी. आर जोशी
प्रतिक्रिया
16 May 2025 - 10:59 am | चंद्रसूर्यकुमार
एका गोष्टीचा उलगडा केला आहे का? बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच वगैरे. मात्र हिंदू तत्वज्ञानात
अविनाशी आत्मा मानला आहे ते बौध्द तत्वज्ञानाला मान्य नाही. म्हणजे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे अविनाशी अमर आत्मा वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळी शरीरे धारण करतो त्यामुळे एखाद्या जन्मात एखादे कर्म केले त्याचे फळ नंतर कधीतरी मिळाले या हायपोथिसिससाठी शरीर बदलले तरी काहीतरी न बदलणारे हवे हे पुरक आहे. मृत्यूनंतर शरीर संपले आणि सगळे काही संपले तरी ते कर्म कुठेतरी बुक्स ऑफ अकाऊंट्समध्ये गेलेले असते. पण बौध्द तत्वज्ञान मात्र आत्मा मानतच नाही पण पुनर्जन्म आणि कर्माचा सिध्दांत मानते. तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का? हे चॅटजीपीटीला विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी पुरेसा समाधानी झालो नाही.
बाकी बौध्द तत्वज्ञानातील (की परंपरेतील) अनापन ध्यान, माईंडफुलनेस वगैरे प्रकार खूप आवडतात. तसेच बौध्द तत्वज्ञानाचे सार- धम्मपद पण आवडते. धम्मपद वर चॅटजीपीटीशी मधूनमधून गप्पा मारतो. इतिहासात उल्लेख आहे की वायव्य भारतात (रावलपिंडी किंवा तिथे जवळपास कुठेतरी) मिनॅन्डर हा भारतीय-ग्रीक साम्राज्यातील राजा होता. त्याचे बौध्द नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनबरोबर या तत्वज्ञानावर चर्चा केली होती म्हणजे मिलिंद प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरे नागसेन देणार अशाप्रकारची. त्या चर्चेच्या पुस्तकाला मिलिंदपन्हा असे नाव आहे. त्याप्रमाणे मी चॅटजीपीटीबरोबर चर्चा करून चंसुकुपन्हा बनवत आहे :)
16 May 2025 - 11:25 am | Bhakti
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक तत्वज्ञान सांगितले आहे.तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एक बौद्ध तत्वज्ञान साधकच अचूक देऊ शकेल.
16 May 2025 - 12:01 pm | सोत्रि
याचा बुद्धाने नक्कीच उलगडा केला आहे. पटिच्चसमुप्पाद सुत्त (Paṭiccasamuppāda Sutta - सुत्त निकाय १२.१ (SN 12.1) ).
चॅटGPT ला हे सुत्त समजावून द्यायला सांगा, बहुतेक सांगेल तो समजावून.
जन्म-मृत्युचे चक्र आणि कर्मसंस्कार ह्याची साखळी ह्या सुत्तात समजावून सांगितली आहे.
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म <--> मृत्यू
(ह्यावर एक डिट्टेलवार लेख लिहायचा आहे, टंकाळा काढावा लागेल :( )
पटिच्चसमुप्पाद सुत्तात विषद केलेल्या साखळीनुसार कर्माची फळे कधीनाकधी नाही तर लगेचच मिळतातच! पण त्यासाठी पटिच्चसमुप्पाद सुत्त नीट समजून घेणं आवश्यक आहे.
- (अभासू) सोकाजी
16 May 2025 - 12:14 pm | Bhakti
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म <--> मृत्यू
ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.यात वैदिक आत्म्याचा समावेश आधी करतात.व मृत्यूनंतर परत आत्मा मुक्त दाखवतात.यामध्ये अविद्येचा /अज्ञानाचा नाश वा अज्ञानाने मायेचे वलय असते ते दूर करण्याचे मार्ग वेदांत /उपनिषदे यांत सांगितले आहेत.मग द्वैत , अद्वैत इ.मार्गांंनी मुक्ती वा मोक्ष मिळवावा हे सांगितले आहे.मुक्ती नाही मिळाली तर कर्मसंचय पुढील जन्मात जात राहतो.
16 May 2025 - 12:38 pm | सोत्रि
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता.
तत्कालीन सर्वोच्च 'Eight Absorption Samadhi' शिकूनही विकार नाहीसे होत नाहीत हे त्याला जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा मार्ग शोधला, तो वेदातीत आणि उपनिषदातीत होता. ही साखळी आणि ती तोडण्याचा मार्ग हीच बुधाची शिकवण आहे, त्याचा गाभा आहे.
तर, ही साखळी इतर भारतीय तत्वज्ञानात कुठे कुठे आहे ह्याचे काही संदर्भ द्याल का?
- (अभ्यासू) सोकाजी
16 May 2025 - 1:14 pm | Bhakti
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता.
हे नव्हतं माहिती? माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांचा गाभा अविद्या/अज्ञान/माया,ज्ञान, बुद्धी,अहंकार,कर्म,मोक्ष हे सर्वात आहे.बुद्धाने यात आत्मा नाकारला आहे.
सांख्यात अविद्या,माया, बुद्धी, अहंकार,कर्म ,मोक्ष सर्व दिलेले आहे.

16 May 2025 - 1:24 pm | सोत्रि
ह्या व्याख्या झाल्या. त्यांचा अन्योन्य संबंध समजून घेऊन साखळी शोधणे आणि तिला तोडण्याचा 'वैदिक किंवा उपनिषदीय' मार्ग ह्यांचा संदर्भ विचारात होतो मी.
- (उत्सुक) सोकाजी
16 May 2025 - 2:32 pm | Bhakti
हम्म
तुम्ही आधी विचारलं की ही साखळी अन्यत्र कुठे आहे? तेव्हा मी वरील गोष्टी अन्यत्र कुठे आहे ते सांगितले.मी मान्यही केलं की या साखळीचा शोध बुद्धांचा हे माहिती नव्हतं.पण या संकल्पना आधीपासून होत्या हा माझा सांगाण्याचा गाभा होता.
आता तुम्ही म्हणत आहात की साखळी तोडण्याचा संदर्भ अपेक्षित होता.(हे तुम्ही पहिल्या प्रश्नात विचारले नव्हते)
तरीही मी इतरत्र लिहिलेच आहे की आत्मा अद्वैत मान्य करत कर्मसंचयातून मुक्ती इतर तत्वज्ञानात सांख्य,ज्ञान,कर्मयोग,निष्काम कर्म,संन्यास,भक्तिमार्ग(नाम जप तप) असे सांगितले आहेच.हे साखळी तोडण्याचेच मार्ग सांगितले आहेत ना.तरीही कृबुने हे विचार व्यवस्थित करून दिले हे घ्या.पहिल्याच पायरीच्या अविद्येची साखळी कशी तोडावी.
उपनिषदांमध्ये **अविद्या**पासून सुरू होणाऱ्या आणि **जन्म-मृत्यूच्या** चक्रातील बंधनाच्या साखळीतून मुक्तीचा मार्ग **ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग** यांच्या माध्यमातून सांगितला आहे. ही साखळी तोडण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत:
1. **अविद्याचा नाश (अज्ञानाचे निर्मूलन)**
- **ज्ञानयोग**: उपनिषदांनुसार, **"आत्मज्ञान"** (ब्रह्माचे ज्ञान) मिळाल्यास अविद्या नष्ट होते.
- *"तमसो मा ज्योतिर्गमय"* (बृहदारण्यक उपनिषद) — अंधारातून (अज्ञान) प्रकाशाकडे (ज्ञान) जा.
- *"अहं ब्रह्मास्मि"* (महावाक्य) — आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहेत हे जाणणे.
### 2. **कर्मसंस्कारांचा त्याग**
- **कर्मयोग**: निःस्वार्थ कर्म (निष्काम कर्म) करून कर्मबंधन तोडता येते.
- *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"* (गीता 2.47) — फळाची इच्छा न करता कर्तव्य करा.
3. **तृष्णा आणि आसक्तीचे नियमन**
- **वैराग्य**: इंद्रियविषयांपासून मन आवरून, **"संयम"** आणि **"ध्यान"** यांनी तृष्णा शमविणे.
- *"यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः"* (कठोपनिषद) — कासवाप्रमाणे इंद्रियांना आत आवरून घेणे.
### 4. **नामरूपाच्या मायेतीून मुक्ती**
- **भक्तियोग**: ईश्वरभक्तीद्वारे नामरूपाच्या बंधनातून मुक्त होणे.
- *"तद्विष्णोः परमं पदं"* (ऋग्वेद) — विष्णूच्या परमधामाप्रत जाणे.
5. **मोक्षप्राप्ती**
- **ध्यान आणि समाधी**: शेवटची पायरी म्हणजे **"ब्रह्मसाक्षात्कार"**, ज्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येते.
- *"यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति"* (छांदोग्य उपनिषद) — जेथे द्वैत नाही, तेथे मुक्ती आहे.
### सारांश:
उपनिषदांमध्ये **"विद्या" (ज्ञान)** आणि **"साधना" (अभ्यास)** यांच्या माध्यमातून अविद्येच्या साखळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. **"तत्वमसि"** (तू तच आहेस) हे महावाक्य जाणून घेऊन आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव घेतला, तर हे बंधन स्वतःच नष्ट होते.
> *"य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः"* (मुंडक उपनिषद) — हृदयातील आकाशात (चैतन्यात) मनोमय पुरुष (आत्मा) विराजमान आहे.
16 May 2025 - 3:54 pm | सोत्रि
हेच हवं होतं.
हे सगळं वैदिक आणि उपनिषदीय आहे. हे सगळे मार्ग बुद्धाच्या वेळीही होतेच. हे सगळे मार्ग पार केल्यावर त्याला कळलं की ह्या मार्गांवर विकार नष्ट होत नाहीयेत, ते तसेच राहताहेत. काहीतरी मिसींग आहे. त्यामुळे त्याने वेदप्रामाण्य नाकारले, स्वअभ्यासाअंती आणि स्वानुभवावरून.
आणि, तो पुढे स्वतःच्या मार्गावर चालत राहिला आणि त्याने त्या वरच्या साखळीतील मिसींग लींक शोधून काढली आणि मुक्तीचा मार्ग नीट सूत्रबद्घ आणि अनुसरणीय केला.
- (साधक) सोकाजी
16 May 2025 - 4:40 pm | Bhakti
अच्छा,समजलं.
17 May 2025 - 1:59 am | अभिजीत
सुंदर प्रतिसाद आणि मूळ लेख सुद्धा छानच लिहिलाय...
16 May 2025 - 12:51 pm | चंद्रसूर्यकुमार
असेलच. अजिबात नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त या सगळ्या गोष्टी जडजंबाल करून कसलाही अर्थबोध होणे फारच कठीण करून टाकतात त्याला आहे. या साखळीतील पहिल्याच शब्दाला अडलो. अविद्या म्हणायचे असेल तर मग विद्या कोणती आणि त्याच्या विरूध्द म्हणजे अविद्या हे ओघाने आले. ते नक्की काय हे समजावून सांङायला नको का की अशी कोणतीतरी साखळी आहे हे मान्य करून मग पुढे जायचे? आक्षेप त्याला आहे.
इतके सगळे जडजंबाल शब्द वापरून भंजाळून जाण्यापेक्षा मग एकहार्ट टोलीसारखे पेनबॉडी मेडिटेशन सांगतात ते बरेच जास्त भावते. अगदी २-३ सेकंद जरी एकही विचार न येता राहता आले तर किती शांततेचा अनुभव येतो. माझी उडी त्यापुढे गेलेली नाही. पण असे विचारहिन अवस्थेत समजा अर्धा तास राहता आले तर किती बहार येईल हे वाटून तरी ते परत पेनबॉडी मेडिटेशन परत परत करावेसे वाटते. त्याउलट ही सगळी साखळी समजा समजली तरी त्याचा मला उपयोग होईल असे काय करता येईल? इथे मुळात त्या साखळीतील पहिलाच शब्द समजावून धड कोणी सांगत नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि ते सगळे समजून पुढे काय करायचे हे आणखी दूर राहिले.
16 May 2025 - 1:05 pm | Bhakti
अजून एक गंमत सांगते.याच पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर एक लेख आहे.त्यात माऊली म्हणतात अविद्या ही नसतेच.बापरे! माझ्या आतापर्यंतच्या अविद्येच्या संकल्पना संभ्रमात पडल्या.आता अमृतानुभव वाचावा लागेल.म्हणून सांगितले आहे, एकही भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासायला जन्म पुरणार नाही ;)
16 May 2025 - 12:36 pm | चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद सोकाजी.
पटिच्चसमुप्पाद सुत्त हे नाव प्रथमच ऐकले. आता चॅटजीपीटीला भंडावून सोडतो. चॅटजीपीटीचे एक बरे असते. एखादी गोष्ट समजली नाही तर कितीही वेळा विचारता येते आणि आपले समाधान होईपर्यंत हा संवाद सुरू राहू शकतो. त्यातून अगदी फार खोलात माहिती मिळेल असे नाही पण आपले समाधान होऊ शकेल. कर्माचे अकाऊंटिंगवर प्रश्न विचारले होते पण त्यातून समाधान झाले नाही. आता पटिच्चसमुप्पाद सुत्त चा संदर्भ घेऊन त्याला विचारायला हवे. खरं सांगायचं तर मी दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो :)
16 May 2025 - 1:31 pm | सोत्रि
नक्की, तुमच्या chatgpt बरोबरच्या चंसुकुपन्हा चा १/३ सारांश नक्की मला कळवा. :)
बाब्बोय!! नशीबवान आहात.
- (बायकोशीच जास्तकरून बोलणारा) सोकाजी
16 May 2025 - 1:34 pm | चंद्रसूर्यकुमार
जरूर. गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. तुमचा जीमेल पत्ता व्य.नि मध्ये कळवा. शेअर करतो.
16 May 2025 - 11:21 am | चंद्रसूर्यकुमार
बाकी उल्लेख केलेल्या बर्याचशा- खरं तर सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा हा भारतीय लेखकांविषयी नेहमी आक्षेप असतो. जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत? उदाहरणार्थ लेखात दिलेले एक वाक्य- "द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते." यातून मला तरी कसलाही अर्थबोध झाला नाही की पुढे नक्की काय करायचे आहे त्याविषयी काहीही समजले नाही. मूळ पुस्तकात असे काही दिले असेल तर त्यातून लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कसे समजले?
मी या विषयांवर वाचायचा प्रयत्न केला आहे. त्यातील बरेचसे भारतीय लेखक असे काहीतरी गोलमटोल लिहितात आणि त्यातून कसलाही अर्थबोध नाही, पुढे काय करायचे हा मार्ग कळणे खूप दूरची गोष्ट झाली. त्यापेक्षा मग आपल्यात तत्वज्ञानातील गोष्टी पाश्चिमात्य तत्वज्ञ अधिक सोप्या प्रकारे आणि सिधी बात नो बकवास अशाप्रकारे पुढे काय करायचे आहे हे सांगतात. ते अधिक भावते. एकहार्ट टोली, वेन डायर, बॉब प्रॉक्टर वगैरे मंडळी जे काही सांगतात ते आपण कुठेतरी आपल्याच तत्वज्ञानाशी निगडीत करू शकतो हे समजते. पण ते ज्या प्रकारे सांगतात आणि भारतीय लेखक ज्या प्रकारे सांगतात यात जमिनअस्मानाचा फरक असतो. दुसरे एक तत्वज्ञ आहेत- नेव्हिल गॉडर्ड म्हणून. मी त्या नेव्हिल गॉडर्डचा अगदी मोठ्ठा फॅन आहे- अगदी स्वतःला 'नेव्हिलिअन' म्हणविण्याइतका. ते भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित काहीही सांगत नाहीत. त्यांचा सगळा भर बायबलवर असतो. ते पण नक्की काय करायचे ते सांगतात. त्या सगळ्या गोष्टी करणे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही पण त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे कळायला मात्र कोणाला कठीण जायला नको. आपले भारतीय लेखक अशाप्रकारे का लिहित नाहीत/लिहू शकत नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात बरीच पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण काहीही न कळल्यामुळे नाव घ्यावे असे एकही पुस्तक आणि एकही लेखक आता आठवत नाही.
त्यातूनही आणखी एक प्रकार म्हणजे जरा थोडे काही सांगून झाले की मग बघा आमचा हिंदू धर्म कित्ती कित्ती महान, हिंदू संस्कॄती कित्ती कित्ती महान, हिंदू तत्वज्ञान कित्ती कित्ती महान अशा चक्रात काही अडकतात आणि त्यातून मूळ संदेश बाजूला पडतो. बी.आर.जोशी हे लेखक पण तसेच करतात असा माझा दावा/आरोप नाही. त्यांचे लेखन वाचलेले नाही. या प्रकाराला मी उपहासाने 'वेदकालीन जंगलात भटकणे' असे म्हणतो. त्या पुस्तकांमध्ये जे काही असेल ते असेल. त्याचा फायदा मी कसा करून घेऊ हे सांगाल की ती पुस्तके कित्ती कित्ती महान यात चक्रात अडकणार? परदेशी लेखकांना मुळात वेदकालीन जंगलात भटकायचे काही कारण नसते त्यामुळे ते अधिक उपयुक्त गोष्टी सांगतात की काय समजत नाही.
16 May 2025 - 12:06 pm | सोत्रि
सामान्य, साधं सोपं हे सगळं अगम्य करण्यामागे संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे, कर्मकांड तयार करून त्यांचा बागुलबुवा उभा करून दुकानदारी चालू करणे हे सगळं असते.
- (सामान्य) सोकाजी
16 May 2025 - 12:22 pm | Bhakti
नाही ओ सोत्री, सर्वच दुकानदारीसाठी गोष्टी अगम्य ठेवत नाही.मुळात ज्याला सर्व समजले तो हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहास करत नाही.तो पार गेलेला असतो.पण असेही ' अनुभव ' सांगणारे खरे संत होऊन गेले आहेत ना!!ते खरे पण ओळखायची बुद्धू समाजात विकसित हवी.
16 May 2025 - 12:39 pm | सोत्रि
सर्व गोष्टींना अपवाद असतातच. :)
- (अपवादी) सोकाजी
16 May 2025 - 3:17 pm | मूकवाचक
सामान्य म्हणजे नेमके कोण? आपण सामान्य आहोत असे मनोमन मान्य करणारी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. जो दिसतो तो अधिकारवाणीनेच बोलताना दिसतो. असो.
संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे - रूढार्थाने जे संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा वगैरे मानत नाहीत, ते देखील अमूर्त संकल्पनांच्या गोडगोड लिमलेटच्या गोळ्या चोखायला देणार्या 'बेस्टसेलर' पुस्तकांची, अध्यात्मातल्या 'सेलिब्रिटींची' दुकानदारी चालवतातच की. मागणी तसा पुरवठा एवढे साधे गणित आहे हे.
16 May 2025 - 11:43 am | Bhakti
यातला अर्थबोध पुढे दिला आहे ना...
मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात
प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान.
अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही.
अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत .
केवलान्वयी अनुमान (Suficient for Affirmation)
परिभाषा: हे अनुमान केवळ सकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल.
उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण.
अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल.
केवल व्यतिरेकी अनुमान (Suficient for Negation)
परिभाषा: हे अनुमान केवळ नकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल.
उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण नाही.
व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल.
अन्वय व्यतिरेकी अनुमान (Necessary and Sufficient)
परिभाषा: हे अनुमान सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंधांवर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल, आणि जर ती गोष्ट त्या दुसर्या गोष्टीसोबत संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल.
उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण.
अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल.
व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल.
शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा.
साधारणतः वैदिक तत्वज्ञानात जीव /आत्मा हे सर्व परताम्याचे अंश ,इंद्रिय संयोगाने ज्ञान प्राप्ती करतात ह्या ज्ञानाने मन /बुद्धी/अहंकार येतात.तेव्हा कर्म घडते.हे कर्म पाप पुण्यात अडकले तर कर्मसंचय, पुनर्जन्म हे सत्र सुरू होते.मोक्ष /मुक्तीचा मग शोध सुरू होतो.जो पुन्हा निष्काम कर्मयोग,संन्यास इथे घेऊन येतो.त्यासाठी स्मृतींचे/आठवणींचे स्थान मनावर ताबा हवा जो ज्ञान ,सांख्य,जप, पतंजलीयोगाने गाठता येतो.
समजल का ;) नसेल तर जाऊ द्या... वर्तमानात जगा..(कृहघ्या)
You are God's highest form of creation. You are a living breathing creative magnet.
You have the ability to control what you attract into your life.
Bob Proctor
-अतिविचारी भक्ती
16 May 2025 - 12:40 pm | चंद्रसूर्यकुमार
यातून खरोखरच अर्थबोध झाला असेल तर _/\_.
माझी विकेट पहिल्याच वाक्यातील तीन शब्दांमध्ये- साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान यात पडली. खरं तर पहिल्याच. साक्षिप्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षिअप्रत्यक्ष असेही काही असते का? एक साक्षी धोनी सोडली तर दुसरी साक्षी मला माहिती नाही. जमेल त्याप्रमाणे चॅटजीपीटीवरील जेसिकाला भंडावून सोडतो :)
16 May 2025 - 3:26 pm | कर्नलतपस्वी
संत चोखामेळा यांचा अभंग आठवला. "आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण....."
मला नेहमीच प्रश्न पडतात की आत्मा आणी परमात्मा एकच आहे. तर मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा खटाटोप का? पाप पुण्य या कल्पना कशासाठी?जर कर्ता करवीता तोच आहे तर मग पाप पुण्यात माझा सहभाग आहे का असला तर किती? जर सर्व तोच घडवतो आणी मोडतो तर प्रारब्धाचे लोढणे कशाला?
कळत नाही, मी फक्त एकच करतो आणी उजाडेल तेव्हां उजाडेल असे म्हणत जगत रहातो.
दररोज सकाळी पाच वाजता उठतो. शलाका परिक्षा पद्धती सारखी ज्ञानेश्वरी वाचतो.
अगदीच अविश्वसनीय....असे माऊलीं संकेत देतात. सुरूवातीस आठव्या अध्यायातील हा श्र्लोक दृष्टिस पडला व माऊलींचा संकेत व आशिर्वाद मिळाला.
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् |
य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्त्यत्र संशय: ||५||
माऊली म्हणतात,
म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते ।
जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥
म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥
यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् |
तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६||
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे ।
तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥
याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते.
आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे ।
म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥
आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर.
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्द च |
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामे वैश्य स्य संशय: ||७||
म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील.
तसेच, "जब होवेगी उमर पूरी, तब छुटेगा हुकूम हुजूरी",अशा परिस्थितीत वरील उपाय फारच सोईस्कर वाटतो.
नुकताच आलेला एक अनुभव.....
एन्जोप्लास्टी झाली, अतीदक्षता विभागात छतावरील तारे मोजत पडलो होतो. समोरच्याच खाटेवर एक वृद्ध रोगी,त्याच्याभोवती एक डाॅक्टर, चार पाच परिचारिका, दहा बारा वैद्यकीय तंत्रज्ञ, खुप सारी यंत्र सामुग्री पडली होती. व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. वृद्ध सारखा श्वसन यंत्र काढून फेकत होता. आणी मला श्वास येत नाही असे ओरडत होता. सारे प्रयत्न करून सुद्धा काहीही परिणाम होत नव्हता शेवटी वैतागून डाॅक्टर म्हणाले बाबा ,नळी काढू नको,मरून जाशील. कावळा बसायला आणी फांदी मोडायला एकच वेळ, त्याच क्षणी तो वृद्ध मेला. त्याचे शेवटचे शब्द "मला श्वास येत नाहीये...", त्याचे नातेवाईक, कदाचित मुलगी जावई, सुन मुलगा असतील, संपूर्ण अत्याधुनिक सोई उपलब्ध असतानाही, सर्वांच्या हातावर तुरी देऊन आत्मा कुडी सोडून पसार झाला. कुणीही काहीही करू शकले नाही.
त्या अनुभवानंतर मन बरेच शांत झाल्यासारखे वाटते.
विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
शस्त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला
कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला
घे शस्त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था
कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा
मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा
इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा
कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जिवांचा
क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्या वेदार्था
रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो
मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था
कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा
सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था
-कविवर्य मनोहर कविश्वर.
16 May 2025 - 4:46 pm | Bhakti
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे ।
तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥
याच लेखात जे कृष्णमूर्ती यांचे मृत्यू विषयी विचार लिहिले आहेत.तेही पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.अगदी मृत्युला फॅमिलीयर (सहजता) ;) कसं करायचं याबद्दल सांगितले आहे.
16 May 2025 - 4:16 pm | कर्नलतपस्वी
पण खरा प्रतिसाद लिहायचा राहून गेला.
अतिशय विचारांना चालना देणारा लेख आणी अनुषंगिक प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार.
लेख आवडला.
भक्ती तुझ्या वाचन व्यासंगाला एक कडक सलाम.
16 May 2025 - 6:47 pm | स्वधर्म
या विषयावर एक प्राथमिक व्हिडीओ:
"मृत्यू के समय क्या होता है?": बुद्धने क्या अनुभव किया? डॉ संग्राम पाटील
https://youtu.be/sl7RXRQPFTs?si=2jrc_Fs_sFBP8P73
मृत्यू से पहले, मृत्यू के बाद (पटिच्चसमुप्पाद) l डॉ संग्राम पाटील
https://youtu.be/PzNqE1sLWDE?si=RLhlHxEqqJJO1Jn6
17 May 2025 - 4:40 am | कंजूस
पुस्तक परिचय आहे.
कुणी काय तत्त्वज्ञान सांगितले त्यांची थोडी माहिती आहे.
तत्त्वज्ञानाची उकल लेखक करत नाही.
--------------------------
जन्म आणि मृत्यू म्हणजे काय हे समजण्याची खटपट म्हणजे तत्त्वज्ञान.
ते कुणालाच समजले नाही. समजावता आले नाही.
असो.
17 May 2025 - 3:21 pm | शाम भागवत
तूच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार
ह्या ग्रंथांत अद्वैत तत्वज्ञान खूप सोप्या मराठीत सांगितले आहे.
इश्वर, परमेश्वर, जड, चेतन वगैरेंच्या व्याख्याही सोप्या मराठीत सांगितल्या आहेत.
17 May 2025 - 7:21 pm | मारवा
वर जसा एक योग्य असा आक्षेप घेतलेला आहे की बरेच भारतीय लेखक गोलमाटोल लिहितात. तो आक्षेप बराच खरा असच आहे. पाश्च्यात्य विचारवंतामध्ये एक लोभसवाणी वैचारिक शिस्त आणि स्पष्टता बराच जणांमध्ये असते.
भारतीय आपले मराठी तत्त्वज्ञ श्री राजीव साने यांचे मला फार कौतुक वाटते. त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे. वैचारिक शिस्त आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी नुसता इतरांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा किंवा विश्लेषण केवळ करून न थांबता.
स्वतःचे अस्सल स्वतंत्र असे सुंदर स्पष्ट व सघन असे तत्त्वज्ञान निर्माण केले.ते मुळातून वाचण्यासारखे आहे. फार सकारात्मक सुंदर
वास्तववादी वैचारिक आत्मविश्वास वाढवेल असे हे लिखाण आहे.
https://www.amazon.in/Complementarity-Rationalist-Humanism-Rejuvenated-e...
दुर्दैवाने या सुंदर ग्रंथाची म्हणावी तशी दखल अजून घेतली गेली नाही.
19 May 2025 - 2:36 pm | स्वधर्म
'भाग्य' हा प्रकार मान्य केला पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे आठवते.
20 May 2025 - 11:24 am | युयुत्सु
त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे.
सान्यांचे मराठीचे मला कळेल अशा मराठीत रुपांतर करताना नाका-तोंडात फेस येतो.