निफा वायनरी - नाशिक

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
10 Apr 2025 - 9:45 am

ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची
DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या. विकांताचा पिझ्झारियो हा जानकी, शरयू या यंग आंत्रप्रिनोर लेकींचा उपक्रम, सोबतच आता कॅफेटेरिया देखील सुरू झालाय.
नेपोलिटन पिझ्झा म्हणजे गोल पिझ्झाच्या कडा जाडसर असतात. सुमारे ४८ तास फरर्मेंट झाल्याने जवळ जवळ सहा इंच फुललेला फ्रेश डोव्ह, गार्लिक बटर, ताजी बेसिल पाने अन् घरीच बनवलेलं टोमॅटो सॉस. जानकी अन् शरयू पाककृतीचे प्रत्येक वैशिष्ट्य सविस्तर सांगत होत्या.
इतक सारं डिटेलवण्याचं कारण म्हणजे इथे मिळणारा अप्रतिम फ्रेश, अगदी नसल्यासारखं toppings असणारे पिझ्झा आणि mouth watering गार्लिक ब्रेड. विटांनी बनलेली इन्सुलेटेड भट्टीत 550 डिग्री ला बेक होणारा Olive Oil coated thick crust Wood fire Pizza डोळ्यासमोर तयार होत असताना आपल्या taste buds तरातून येतात. इतर दिवशी दीड तासाची वायनरी टूर आणि वाइन टेस्टिंग तर विकांताला पिझ्झारियो असा हटके फेरफटका आणि योग जुळून आलाच तर या मनमौजी सुरवडे कुटुंबसोबत गप्पा असा एक भन्नाट प्लान होईल याची खात्री बाळगा. . .

वेब पेज लिंक https://www.niphawinery.com/

पाकक्रियाजीवनमानउपहाराचे पदार्थओव्हन पाककृतीथंड पेयपेयप्रवासवाईनव्यक्तिचित्रशेतीसद्भावनाआस्वादअनुभवशिफारसविरंगुळा