प्रवास
वयास माझ्या पैंजण घालित....
शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती
नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी
शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी
टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे
त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा
नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे
साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा
पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली
एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
शोक कुणाला? खंत कुणाला?
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी
धडधड धडधड रान पेटते......
शोक कुणाला? खंत कुणाला?
चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती
लपलप लपलप ज्वाला उठती......
शोक कुणाला?खंत कुणाला?
पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे
भडभड भडभड पाने रडती....
शोक कुणाला? खंत कुणाला?
पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे
चरचर चरचर डोळे झरती......
शोक कुणाला? खंत कुणाला?
कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते
करकर करकर शाप जीवांचे,
थरथर.... इथवर ऐकू येते.....
-शिवकन्या
त्सो मोरिरी : एक समृद्ध अनुभव
मागच्या वर्षी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात लेह लडाखला जाण्याचा योग आला. या अविस्मरणीय ट्रिप बद्दल सविस्तर लिहिण्याचा विचार आहे पण तूर्तास एक अशी घटना जी मनात कायम कोरलेली राहील.. शीत वाळवंट असलेल्या लडाखचे निसर्ग सौन्दर्य एकदम वेगळेच.. आधी कधीच न पाहिलेले.. राखाडी आणि तपकिरी रंगाच्या छटा बघताना निसर्गाच्या पॅलेट मधला मधला हिरवा रंग हरवलेलासा वाटला. एक प्रकारची गूढ शांतता, ठिकठिकाणी रचलेले दगडांचे मनोरे आणि बौद्ध धर्माचे मंत्र वाऱ्याद्वारे आसमंतात पसरवणाऱ्या रंगीत पताका संपूर्ण प्रवासात साथ देत राहिल्या.
पावसाळ्यातील एक प्रवास!
गेल्या आठवड्यात काही महत्वाच्या कारणांमुळे भर पावसात मुंबई-पुणे-निपाणी आणि परत पुणे असा प्रवास करावा लागला. त्या दरम्यान आलेले काही अनुभव लिहावे म्हटलं!
तस म्हटलं तर खूप काही वेगळं, थरारक नाही पण माझ्यासाठी तरी बऱ्याच गोष्टी कायम लक्षात राहतील अशा होत्या.
आमची धमाल मसुरी - ऋषिकेश सहल!
आमचा दहा जणांचा गृप. त्यापैकी आठ जण (किरण, दीपक, सचिन, धनंजय, आनंद, केदार, संतोष, आणि मी) एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंते झाले. अस्मादिक त्या आठपैकी एक. राहिलेले दोन जण (गजानन, संजय) नंतर मित्र झाले. अगदी जवळचे! आजदेखील आमचा हा गृप अभेद्य आणि अखंड आहे. काही "सामायिक सद्गुणांच्या आणि आवडींच्या" भक्कम पायावर ही मैत्री गेली २३ वर्षे टिकून आहे. नुसती टिकलेलीच नाही तर बहरलेलीदेखील आहे आणि चविष्ट लोणच्याप्रमाणे मुरलेलीदेखील आहे. इतकी मुरलेली आहे की कुणी नुसतं "कधी?" असं विचारलं की बाकीच्या सगळ्यांना लगेच अचूक संदर्भ लागतो.
तुझे शहर
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय –
डोळे न उघडता तुला पाहून आलेय
रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे –
तुझा हात घामेजला आहे
मंदिरातले कासव ओलांडले आहे –
तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे
दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे –
लोबानचा गंध दरवळत आहे
मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे –
हात चिकट, तोंड गोड झाले आहे
भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत –
तुझे डोळे चमकत आहेत
रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे –
तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे
' गोव्यातील गणेशोत्सव '
गोवा हे राज्य विवीध समृध्दतेने व हिरवाई ने नटलेले राज्य या राज्याची खासियत म्हणजे हिथले समुद्र किनारे.इथे विवीध जातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात.त्याचबरोबर इथे सर्व सण संभारभ मोठ्या धुमधड्याक साजरे होत असतात.पण हिथे दिवाळी सारखाच मोठ्या धुमधड्याक सार्वजनिक तसेच घरोघरी वाड्यावाड्यावर साजरा केला जाणारा उत्सव म्हणजेच ' गणेशोत्सव '.
(दाराआडची आई)
एक आई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार
जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....
करत असेल का तो तिचा काही विचार?
येत असेल का तो ही
खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे?
आईला दाराआडून बाहेर यायचं नाही...
मग ती वेताची काठी हळूच चाचपते,
ती काठी पाठीत घेऊन
मुलगा अविश्रांत कोकलत राहतो....
काठी सापडलेली आई
सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...
सुततच राहते....
-चमचमचांदन्या
पुणे ते शिडि प्रवास वणन
वर्ष २०१५ जानेवारी ०९ वेळ रात्री ११ वाजता भेटलो ते थंडीचे दिवस होते .व अचानक दुसर्या दिवशी शिर्डीला बाईक वर जायचे ठरले.त्यानुसार आम्ही सर्वजण ( ४ मित्र) १० तारखेला दुपारी १:३० मिनी.मोटारसायकलवर शिर्डीला जाण्यास सज्ज झालो व बांबांचे नाव घेऊन मोटारसायकल सुरु करुन आम्ही निघालो.जाताना रुबी हॉल (पुणे स्टेशन ) इथे नाष्टा करुन मग पुढे निघालो वाघोली नगर रोड मार्गे.मजल दर मजल करीत गप्पाटप्पा करित कधी आम्ही संध्या.५:०० ते ५:३० च्या सुमारास नगरमध्ये पोहचलो ते कळले पण नाही.मग नगरला चहापाण्यासाठी थांबुन आम्हीमग शनीशिगंणापुर मार्गे शिर्डीला जाण्याच नगरवरुन निघालो.शनीशिगंणापुरला संध्याकाळी ७:०० ते