सानी मिसऱ्याची ओळ क्रांतिताई (क्रांति साडेकर) यांची,
तरही साठी ओळीबद्दल आभार, त्यांना न विचारता ही ओळ वापरली त्याबद्दल क्षमस्व! ओळ वाचून नाही राहवलं.
===================================
त्याच वाटेवर जुन्या भटकायचे नव्हते मला
(या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला)
पेन्शन खातेच मी बदलून गावी घेतले
आणखी शहरात त्या राहायचे नव्हते मला
मी मुलांना मारले अन शिस्त करडी लावली
देशवासी कमकुवत घडवायचे नव्हते मला
नवकवी बोलावला नाहीच त्यांनी एकही
मैफलीला त्यामुळे ह्या जायचे नव्हते मला
काय आम्ही खायचे नेसायचे कपडे कसे
शासनाने हे उगा सांगायचे नव्हते मला
मार्ग माझा अन दिशाही जोखली मी वेगळी
चारचौघांसारखे वागायचे नव्हते मला