अमेरिकेतील किराणा खरेदीचा अनुभव
हि २०१० सालातील गोष्ट आहे. मी अमेरिकेत नुकताच आलो होतो आणि त्यावेळी स्मार्टफोनचे तितकेसे प्रस्थ नव्हते आणि माझ्याकडेही स्मार्टफोन नव्हता. त्यामुळे बारीक सारीक गोष्टींसाठी गूगल करणे नसायचे. मी माझ्या रूममेट बरोबर रहात होतो आणि अमेरिकेत येऊन मला ४ दिवस झाले होते. घर दाखवताना घरमालकाने इथून १० मिनिटावर किराणा - भाजीपाला ह्यासाठीच दुकान आहे असे सांगितले होते. पहिले २ दिवस भारतातून आणलेले पदार्थ खाऊन काढले पण आज जरा गरम खायची हुक्की आली. रूममेटला कांदा बटाट्याचा रस्सा करता येत होता , तो म्हटला मस्त रस्सा आणि भात करू , तू सामान घेऊन ये . आता किराणा आणण्याची गरज होती.