(ढबोला...)
पेरणा :- प्राची ताईची अबोला..
http://misalpav.com/node/50707#comment-1153556
ढबोला...
तुझ्या ढबोल्या भावाने
सोडला मागे भस्मासूर
जीव झाला वेडापिसा
त्याचा पाहुनिया नूर
तुझ्या ढबोल्या भावाने
कशी ओरपली नळी?
उरे हडकांचा ढीग
रस्साजाई खोल तळी
तुझ्या ढबोल्या भावाने
किती भाकरी हादडल्या..
अगं वेडे भातही
आता आला नं संपाया!