लालची कावळा आणी नाचण
ही लिंक आपल्याला तू नळीवर घेऊन जाईल. चित्रफित बघा. रोजच्या पक्षीदर्शनात विविध पक्षांचे मानव सदृश्य स्वभाव बघायला मिळतात. ते बघताना प्रकृतीबद्दलचे कुतुहल आणखीन वाढत जाते.
ही लिंक आपल्याला तू नळीवर घेऊन जाईल. चित्रफित बघा. रोजच्या पक्षीदर्शनात विविध पक्षांचे मानव सदृश्य स्वभाव बघायला मिळतात. ते बघताना प्रकृतीबद्दलचे कुतुहल आणखीन वाढत जाते.
नोंद - हे गाणे बनव्हायला सुरुवात मी केली पण त्याच्या ३ दिवस आधी तरी हेच गाणे ससे वापरून बनवले होते पण वीडेओ नव्हता शॉर्ट होते
मी पूर्ण ३+ मिनिटाचा वीडेयो बनवला आहे
५ -५ सेकंदाचे व्हिडियो बनवणे आणि जोडणे खूप जिकिरीचे काम होते ,शेवटी शेवटी आधीचीच फुटेज थोडी वापरली (लहानपणी ऍनिमेशन गाणी बघतांना बर्याच वेळा एकाच क्लिप रिपीट का दाखवतात हे आज कळाले )
पण ना नफा तोटा वर बनवत असल्याने चूकभूल देणे घेणे
कृपया हे गाणे सगळीकडे शेयर करा
२००० views आरामात होतील ,मग पुढचे गाणे ,तसेच तुम्हाला अजून एखादे बालगीत बनवून पाहिजे असेल तर कंमेंट किंवा व्यनि करावा
गंगाेत्त्रीच्या त्या बर्फाच्छादित प्रदेशात सूर्य अस्ताला जात होता. हिमालयाच्या शांत, पण भीषण वातावरणात मी विचारमग्न होऊन चालत होतो..घर सोडून 9 महिने होऊन गेले होते. आयुष्याच्या गुंत्यात गुरफटलेलो, अपराधी भावनेने पछाडलेलो. काहीतरी हरवले होते माझे पण शोधायचे कुठे ते कळत नव्हते त्याचा शोध घेत मी इथवर आलो होतो.
"कोणता शोध आहे तुझा?"
एक शांत, पण गूढ आवाज ऐकू आला. मी वर पाहिलं. समोर शुभ्र वस्त्रांमध्ये एक योगी उभा होते.. पांढर्या दाढीचे लाटा वाऱ्यासोबत हेलकावत होते. त्यांच्या डोळ्यांत खोल तलावासारखी शांती होती.
"माहिती नाही" विषण्णतेने उद्घागरलो..
समथिंग इज मिसिंग असं वाटतं असतांनाच काही मराठी सिनेमे मन गाभाऱ्याशी पुन्हा नाळ जुळवून देतात.नाळ सिनेमाने आई आणि मुल या नात्याची वेगळीच कथा दाखवली होती.चैत्याचा गोड निरागस वावर ,त्याची आईच्या नजरेत भरण्याची हुरहूर सगळं कसं अलगद तरीही मनात वेगाने घडत होतं.
नमस्कार. माझ्या मुलीचं पाचवीचं हिंदी पुस्तक वाचताना एका पुस्तकाची माहिती मिळाली. उत्सुकता वाटली म्हणून हे पुस्तक विकत घेतलं आणि लवकरच वाचूनही झालं. अमेरिकन बाल साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेलं आजवरचं एकमेव भारतीय लेखकाचं पुस्तक! धान गोपाल मुकर्जींनी लिहीलेलं 'गे-नेक: द स्टोरी ऑफ अ पिजन!' 'गे-नेक' पिजन म्हणजे रंगीत मानेचं कबूतर आणि हे पुस्तक म्हणजे ह्या कबुतराची कहाणी! १९२५ मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या समृद्ध भावविश्वामधील प्रत्यक्षातील अनुभवांचं वर्णन आहे. आज आपण "त्या काळापासून" खूप दूर आलो आहोत.
माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी. शिवाय आम्ही जिथे राहायचो तिथे खूप बकर्या सोबत असायच्या. मी बकर्या आणि गायी- बैलांसोबत खेळायचो. माझे दिवस खूप मजेत जात होते. आजूबाजूला असलेले डोंगर- झाडं मला ओळखीचे वाटायला लागले होते.
आपल्याला वाटते तसे लहान पोरं ही निष्पाप असतात ही भारी गैर समजूत आहे. जन्माच्या पहिली दिवसापासून ते आपला स्वार्थ सिद्ध करण्याची राजनीती शिकू लागतात. जशी निवडणूक जवळ येते मुंबईत अनेक नेत्यांची मराठी अस्मिता जागृत होते. तसेच आमच्या छकुलीची ही मराठी अस्मिता अचानक जागृत झाली. असाच एक किस्सा.
छकुलीचा लहान भाऊ तेजस ( बदलेले नाव) तिला बडी दीदी म्हणतो. त्याच्यापेक्षा सहा महिने मोठ्या चुलत बहीणीला तो छोटी दीदी म्हणतो. तिन्ही मुले मला आबा आणि सौ.ला आजी म्हणतात
प्रेरणा - सर्वज्ञात
चालु होते माझे
रोजचेच काम
रोजचाच घाम
गॅसपाशी
एकीकडे होते
तांदुळ शिजत
दुधही तापत
दुजीकडे
लाटून कणिक
पोळ्या मऊसुत
गंध सुगंधित
खरपुस
इतक्यात येई
सख्याची ती साद
भलतीच याद
भलत्या वेळी
काय करावे ते
सुचेना काहीच
भर दुपारीच
चांदणे ते
मोहरले मीही
काम बंद केले
हात ही पुसले
पदराला
जवळ येऊनी
सख्या साजणाने
ओढले हाताने
अलगद
दुपारची वेळ
करुया साजरी
कशाला लाजरी
होत आहेस
प्रेर्ना - मातीचे पाय
पयन स्प्र्शुन अले
ते हत मलले होते
लक्क उमग्ले तेवहा
ते पय मतिचे होते
मि केवल पहत होतो
पयन्च्य खल्चि धुल
ति ललतस लववि
हे एकच मथि खुल
मि इथ्वर पहुन अलो
पौल्खुना विर्नर्या
अधि कुन्वत, मगुन
कप्ति विकत हस्नर्या
अत पुन्ह चलवे पुधे,
कि परत फिर्वे?
सोस न-लयक पयन्चे
पुसुन अव्घे तकवे?
प्रेमल श्ब्दन्चि ओल
मनत र्झिपत नहि
व्हवे नत्मस्त्क
पयहि दिसत नहि
फार फार वर्षांपूर्वी एका पर्वताच्या माथ्यावर एक भलाथोरला पाषाण राहत होता. त्याच्या आजूबाजूला खूप हिरवळ, झाडे आणि वेली असल्यामुळे तिथले वातावरण नेहमीच प्रफुल्लित असायचे. वसंत ऋतूत तर तिथे कोवळ्या रानफुलांच्या ताटव्यांनी बहार यायची. तो पाषाण तिथल्या सर्व झाडवेली आणि फुलांशी मनमोकळ्या गप्पा मारायचा. त्या सर्वांची एकच भाषा होती, स्पर्शाची. असेच दिवस मजेत चालले होते. सर्वजण सुखाने आजूबाजूला नांदत होते.