bocheghol

(चकणा जरा)

मार्कस ऑरेलियस's picture
मार्कस ऑरेलियस in जे न देखे रवी...
11 Dec 2021 - 6:54 pm

आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620

मागवतो चकणा जरा
नेक्स्ट पेग आधी
घाल पाणी, घाल सोडा
"कच्ची" पोटास बाधी ||

चालते व्हिस्की किंवा
रम माँन्कच्या वतीने
टाळतो आता बीयर
ढेरी सुटायच्या भीतीने ||

संपवला चकणा पुन्हा
न पिणार्‍या हातांनी
अन पिणारे केव्हाच गेले
उंच आकाशी विमानी ||

रंगते रात्र पुन्हा अन
पडे गफ्फांचा सडा,
किचन बंद होण्याआधी
मागवु चकणा जरा ||

- टल्ली

Biryanibochegholअनर्थशास्त्रअभय-गझलआगोबाआता मला वाटते भितीकैच्याकैकवितागरम पाण्याचे कुंडविडम्बनविडंबनसामुद्रिक