गुंतवणूक

म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - ४ अंतिम)

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
21 Apr 2021 - 3:05 pm

माझ्या गुंतवणुकीच्या प्रवासातले म्युच्युअल फंड हे महत्वाचे स्थानक आहे. सिप च्या माध्यमातून गेली बारा वर्षे गुंतवणूक करण्याचे फायदे मी अनुभवतो आहे. हेच अनुभव तुमच्या समोर मांडण्याची संधी ह्या निमित्ताने मिळाली. मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्ट नाही. या लेखमालेतील माहितीचा कोणाला फायदा झाला तर आनंदच आहे. ह्या लेखमालेच्या सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे आभार
_________________________________________________________________________________________________________________

विचारगुंतवणूक

Index Investing भाग २

अतरंगी's picture
अतरंगी in जनातलं, मनातलं
18 Apr 2021 - 3:39 pm

भाग १:- http://misalpav.com/node/48675

आपण जेव्हा आपल्या स्वकमाईचे पैसे जास्त परताव्याच्या अपेक्षेने गुंतवत असतो तेव्हा सर्वात आधी त्यातले फायदे आणि तोटे समजून घ्यायला हवेत. आपण ज्यात पैसे गुंतवत आहोत त्यात काय, किती आणि कोणत्या प्रकारची रिस्क आहे हे समजून घ्यायला हवे. या भागात आपण Index Investing चे आणि वेगवेगळ्या ईंडेक्सचे फायदे/ तोटे पाहू.

लेखगुंतवणूक

म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - ३)

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
17 Apr 2021 - 9:23 pm

मागच्या भागात आपण इक्विटी फंडांचे काही प्रकार पहिले ... या भागात इक्विटी फंडाचे अजून काही प्रकार आणि डेट व इतर फंडाबद्दल बोलूया
______________________________________________________________________________________________________________________________

विचारगुंतवणूक

Index Investing भाग १

अतरंगी's picture
अतरंगी in जनातलं, मनातलं
17 Apr 2021 - 12:36 pm

गुंतवणूक हा तसे पहायला गेले तर फार मोठी व्याप्ती असलेला आणि व्यक्तिसापेक्ष विषय आहे. गुंतवणूक कधी, कुठे, किती करावी याविषयी आंतरजालावर मुबलक प्रमाणात लेखन आहे. आजही अनेक जण स्वतःच्या ज्ञानानुसार याविषयी लिहित असतात. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, त्यातील एक म्हणजे कंपन्यांचे समभाग म्हणजेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स.

लेखगुंतवणूक

म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - १)

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
7 Apr 2021 - 4:42 pm

ही लेखमाला लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे गणेशा भाऊंची "शेअर मार्केटची बाराखडी" ही लेखमाला. या लेखमालेत शेअर्स मध्ये गुंतवणूक कशी करावी (विशेषतः Position Trading) हे उत्तम पणे सांगत आहेत ... अर्थात ही प्रक्रिया किचकट आहे. तसेच High Risk High Gain हे तत्व इथेही लागू होते.

विचारगुंतवणूक

रंग रंग तू, रंगिलासी

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
12 May 2020 - 2:59 pm

रंग रंग तू, रंगिलासी

दंग दंग तू, दंगलासी

भंग भंग तू, भंगलासी

वेड्यापिश्या रे जिवा

जाशी उगा जीवाशी

अव्यक्त बोल रे तुझे

शब्दांचे झाले तुला ओझे

का धावीशी उगा तू रे

कुणी नाही वेड्या रे तुझे

तो सूर्य देई एकला शक्ती

समिंदराची ओहोटीभरती

आकाश झेलते तारे

मग का हवे रे , तुला सारे ?

का जन्म घेतलासी ?

हा डाव साधलासी

रंगात रंगुनिया साऱ्या

संसार मांडलासी

गती मंद होत तुझी जाईल

मग हार गळ्याशी येईल

अग्नीत दग्ध होई सारे

आला तसाच रिता जाशील

व्यक्तिचित्रणगुंतवणूकज्योतिष

नाद ब्रम्ह होई अंगी , चढे चढे भक्तिज्वर

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
28 May 2019 - 6:48 pm

नाद ब्रम्ह होई अंगी

चढे चढे भक्तिज्वर

अरे तोच रे ईश्वर

तोच तोच रे ईश्वर

तुझ्या मायेची सावली

आम्हा सर्व चरावर

देई पर्वत ताकद

जशी दुधात साखर

स्वामी स्वामी राया तुम्ही

तुमच्या पडतो पाया आम्ही

देगा आशीर्वाद आम्हा

तूच स्वामी सर्व ब्रम्हा

उघडा ज्ञान दार सर्वा

तुमच्या सर्वार्थ शक्तीने

घालू अभिषेक आम्ही

आमच्या प्रेमळ भक्तीने

बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ,, स्वामी समर्थाना मनोभावे अर्पण

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

गुंतवणूक

गडगडत्या बाजारातील संधी

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
16 Apr 2019 - 10:23 am

लोक हो

माझ्या "दर महा ८% ते १०% परतावा शक्य आहे का?" या धाग्यावर भवति न भवति होऊन बरीच धूळ उडाली. त्यात एक मत पुन:पुन: व्यक्त केले गेले ते असे की फक्त चढत्या बाजारात असा परतावा मिळु शकेल. गडगडत्या बाजारात असा परतावा मिळणे शक्य नाही, इ०

या प्रश्नाचा पुरता छडा लावण्यासाठी अलिकडेच २०१८ मध्ये म्ह० २८ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये बाजार गडगडलेला असताना काय चित्र दिसते याचा तपास करायचा ठरवले. या अभ्यासाठी माझ्याकडील ChartAlert या सॉफ्टवेअरची मदत घेतली.

लेखगुंतवणूक

अर्थव्यवस्थेच्या दिशेचा अंदाज

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
24 Feb 2019 - 5:25 pm

शेअर मार्केट्मध्ये पैसा कमवायचा असेल तर केव्हा आणि कुठे या दोन प्रश्नांमध्ये सगळी ग्यानबाची मेख असते. मग कॉमनसेन्स वापरून असेही म्हणता येते की अर्थव्यवस्थेला जेव्हा गती मिळते तेव्हा शेअरमार्केट तापायला सुरुवात होते.

सामान्य गुंतवणुकदार "अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीसाठी" वेगवेगळ्या आर्थिक विश्लेषणांच्या गदारोळात गोंधळुन जातो. या विश्लेषणांवर अनेकदा आकडे फुगवल्याचे आरोप केले जातात. साहजिकच सामान्य गुंतवणुकदार निर्णय घेताना वस्तुनिष्ठ आणि सारासार विचार करू शकत नाही.

विचारअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूक

देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
21 Jan 2019 - 7:27 pm

देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल

दे ना रे मजला

मी कि नई छान छान खायला

करून घालेन तुजला

कशाला हवाय डोक्याला ताप नि तो पगार

कशाला होतील चोऱ्या नि माऱ्या

कुठेच पडणार नाहीत दरोडे कि होणार नाहीत कुणाचे खून

लुटेल , हो फक्त लुटेल

ते सूर्यनारायणाचे ऊन

तू काया बनवलीस

सोबतीला कमी कि काय म्हणून माया बनवलीस

खायला तोंड दिलेस नि भरायला पॉट

तरी बी सारे शोधत बसलेत

कुठं लागतोय का ते जॅकपॉट ?

झाड बघा ना, कुठंच जात नाही

तिथेच राहतं नि ऊन खाऊन जेवण बनवून देतं

जीवनमानराहणीव्यक्तिचित्रणगुंतवणूक