इंदुरी
(...मारीला म्यां डोळा ;)
पेरणा http://misalpav.com/node/47605
अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली
म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...
(सहजच..)
दाखवायचे दात बघून झाले असतील तर आता खायचे दात दाखवतो.. सहजच..
अचुम् आणि समुद्र (भाग १)
(मन भूत भूत ओरडते..)
पेरणा अर्थात प्राची तैंची मन राधा राधा होते...
आज दिव्याच्या अमावस्ये निमित्त मिपावरच्या सर्व ब्रम्हराक्षसांना आणि डाकीणिंना सादर नमन करुन
(मन भूत भूत ओरडते..)
तिन्हीसांजेच्या व्याकुळ वेळी
का बाहेरची बाधा होते?
मळभ दाटते तेव्हा
मन भूत भूत ओरडते..
सहावे इंद्रिय जेव्हा
शंकांची उडवीते राळ,
आवेग जरा वा-याचा
भासतो जणू वेताळ..
मिटताच डोळे माझे
उभा मज समोर ठाकतो,
रोज मला उठवाया
तो झोटिंग बनुनी येतो..
(सकाळी सकाळी)
पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी
घाण उग्र भपकारा
लांबूनच आला
क्वार्टर टाकून आला
सकाळी सकाळी
फेसाळत्या सोड्यात
बर्फाचा मनोरा
लिंबू जाउन बसले
जरासे बुडाशी
पाय जड झाले
दृष्टी नाही डोळी
अवस्था ही झाली
सकाळी सकाळी
किती पेग गेले
घशातून भरारा
म्हणे आठवांचा
सुटण्या येरझारा
घरचे निष्ठुर
म्हणती पितो देशी
विदेशी न मिळता
सकाळी सकाळी
(वळण)
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत
(कितनी राते....)
पेरणा अर्थात http://misalpav.com/node/46163
कितनी राते....
१.
तू हलकट पणे म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू की आरामात..
मी म्हणालो तूच बस भाड्या, तुला माहीत आहे, मला खाली बसता येत नाही!
पण त्या वेळेला तुझी ती कुत्सित नजर बघून मला मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला?
म्हणे "आरामात बसू"!
ट्रम्प व्हिझिट पुणे
माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन
मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत
रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद. शेवटी PMT ने शनवार पेठेतल्या खोलीकडे रवाना.
९ वाजता मोतीबागातील चहा आणि श्रीकृष्ण मिसळ यांचा नाश्ता आणि मेलानिया वाहिनी सोंबत तुळशीबागेत खरेदी.
(डबा)
(डबा)
आज पहाटे तो लवकर उठला
डबा उचलून धावत सूटला
लायनीताल्या लोकांना ढकलून दिले
दार जोराने बडवले
आताल्याला लवकर बाहेर बोलावले
जराही वेळ नाही असे सांगितले
आतले प्रकरण कुल वाटले
हालचालीच्या आवाजावरून मंद भासले
मनोमन स्वप्न रचले
वाटे आत गेल्यावर कोणी तरी म्हणावे
"अरे बाबा सावकाश आवर ,
होल वावर इज आवर"
आजची कथा अशी झाली
ज्याची बीजे त्याने कालच पेरली