Skip to main content

फलज्योतिष

मी काय चुकीचे केले??

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी गुरुवार, 11/04/2024 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय चुकीचे केले?? “कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या. मी काय चुकीचे केले?? भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले. मी काय चुकीचे केले?? एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

# तुम्ही(च) म्हणालात

लेखक सुरिया यांनी शुक्रवार, 21/05/2021 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा मित्रों...... तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही. व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही. ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले. लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर, लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर. पण तुमच्यासारखं असं कुणी माझ्यावरती रुसतं का? इतकी माया करुनही नशीब ममतावरच हसतं का? तेव्हापासून रागावून मी एकही करार केला नाही वाटलं होतं इथेच बन

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

लेखक गड्डा झब्बू यांनी मंगळवार, 08/12/2020 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती.

माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 10/09/2020 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित.

साडेसातीतले वास्तविक उपाय!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 24/01/2020 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो! आज दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनी मकर राशीत प्रवेश करेल.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपेल आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु होईल.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती असेल. साडेसाती आली की सोशल मिडियावर "घाबरुन जाऊ नका.शनीला अभिषेक करा,शनिवार करा अडचणी कमी होतील वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं आढळेल.एवढंच नाही तर पुढे शनी हा हाडाचा शिक्षक आहे, तो कष्ट देऊन शिकवतो तिथपासून ते आपल्या पूर्वकर्मांची फळेच साडेसातीत मिळत असतात"वगैरे तत्वज्ञान वाटल्याचेही आढळेल. पण वास्तवात असं आहे का?

(दाराआडची आई)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 05/04/2019 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 18/10/2018 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो.

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

अँजेलिना जोलिची 'कुंडली' भाग: २

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 31/05/2017 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग: १ स्थळ : PINK LOTUS BREAST CENTER , LOS ANGELES Dr. Kristi Funk च्या कन्सल्टिंग रूममध्ये अँजेलीना जोली तिचा BRCAचा ( BReast CAncer ) जेनेटिक्स रिपोर्ट काळजीपुर्वक वाचत होती, तपासणीमध्ये BRCA1 आणि BRCA2 जीन्समध्ये म्युटेशन आढळले होते. अशा पेशंटला सल्ला व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा Dr. Kristi Funk ना दांडगा अनुभव होता, त्यामुळे हॉलीवूडची ख्यातनाम अभिनेत्री अँजेलीना जोली निश्चिंत होती. जोलीच्या चेहर्‍यावर कुठल्याही प्रकारचा तणाव दिसत नसल्यामुळे डॉक्टरांनाही तिच्याशी संवाद साधायला सोपे जाणार होते.