चकल्या….. ३४२५
नमस्कार मंडळी.
यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे.
तिसरी कथा मजेदार आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता? …
१) १२३४५६७८९……
मी माझ्या बायकोच्या दबावा मूळे या प्रयोगात सामिल झालो होतो.
माझ्या कवटीला भोक पाडताना सुध्दा ती डॉक्टरांना अखंड सूचना देत होती.
माझे डोके बधिर असल्यामुळे परत बधिर करायची गरज नाही असे तिनेच डॉक्टरांना सांगीतले होते,
ऑपरेशन सक्सेसफुल, डॉक्टरांनी जाहिर केले, आणि हिच्या चेहर्यावर आन्ंदाचा महापुर उसळला,
लगेच तिने पर्स मधुन एक बटाटा काढून डोक्याच्या पोकळीत टाकला.