का संपली पुण्याई.....
कोकिळा गप्प झाली का
माहीत नाही का रुसून गेली
कोण गाईल आता अंगाई
का संपली पुण्याई
कोण रिझवेल आता
कोण निजवेल आता
ऐकता भजन, भूपाळी
दिस उगवेल का नाही
गानसम्राज्ञी दिदीनां सजल नयन भावपूर्ण श्रद्धांजली.
कोकिळा गप्प झाली का
माहीत नाही का रुसून गेली
कोण गाईल आता अंगाई
का संपली पुण्याई
कोण रिझवेल आता
कोण निजवेल आता
ऐकता भजन, भूपाळी
दिस उगवेल का नाही
गानसम्राज्ञी दिदीनां सजल नयन भावपूर्ण श्रद्धांजली.
*दिसला गं बाई दिसला*
आपल्या महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तीपीठं आहेत. तशीच भारतात शनि देवाची पण साडेसात शक्तीपीठं आहेत.
त्यातील साडेतीन शक्तीपीठं स्वतः प्रभु रामचंद्रांनी स्थापन केलेली आहेत.
एक मध्यप्रदेशातलं उज्जैन सोडलं तर बाकी अडीच नाशिक व बीड जिल्ह्यात. आम्ही तीघी मैत्रिणींनी हि अडीच पीठं तरी जाऊन येऊ असं ठरवलं.
तसंही लाॅकडाऊन पासून म्हणजे मार्च 2020 नंतर भटकंती बंदच होती. आताशा सगळं नाॅर्मल होतय हळुहळू तर आपण योग्य काळजी घेऊन जाऊन येऊ असं म्हणून निघालो.
सुपरमार्केटमध्ये जायचं म्हणून अगदी निगुतीनं यादी करावी आणि येताना यादीत नसलेले दोनचार जिन्नस तरी अधिक घेऊन घरी यावं तसं माझं शिकवताना होतं. मनातल्या मनात आज काय शिकवायचं याचं कितीही नियोजन केलं तरीही बायोलाॅजीबरोबर कधी फिलाॅसाॅफी, कधी सोशोलाॅजी तर कधी सायकोलाॅजीला हात लावून यावं हे ठरलेलं.
Man without handkerchief is a naked man.
काही दिवस किंवा महिन्यांपूर्वी मिपा वर एक लेख वाचला होता,त्यात आपल्याच एका मिपाकराने त्यांचा हार्ट अटॅक आल्याचा अनुभव अगदी व्यवस्थित पणे सविस्तर लिहिला होता,
त्यांना अटॅक येतानाचे हाताचे ,खांद्याचे, छातीत दुखणे,त्या वेदना चालू असताना सुद्धा त्यांनी स्वतः फोन करून वैद्यकीय मदत मागवणे(बहुतेक ते परदेशास्थित असावेत)इत्यादी अतिशय छान विवेचन केले आहे,
कृपया मला त्या ध्याग्याची लिंक मिळवून द्यायला मदत मिळेल का?
श्रीकृष्णायनम:!
नमस्कार,
लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?!
कशी गम्मत असते बघा.... लग्न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं की तू लग्न करून सुखी आहेस का तर तो/ती नक्कीच म्हणतात की उगाच या फंदात पडलो/पडले. एकटं असणं जास्त सुखाचं असतं.... आणि तरीही या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मुलांनी लग्न करायला हवंच असतं. असे किती पालक असतील जे म्हणतात की बाळा, तू अजिबात लग्न करू नकोस.
नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज!
गोपाळकाल्याच्या निमित्ताने
काल मी एक कविता whatsapp वर वाचली. अनेकांकडून ती मला forward झाली होती. अलीकडे जो सण असतो त्याबद्दल कोणा थोरामोठ्यांनी काही म्हंटलेले असते ते किंवा मग असे माहित नसलेले अनेक लेखक-कवी यांच्या शब्दबद्ध झालेल्या भावना आपण आपल्याच मानून एकमेकांना पाठवत असतो. त्यातलीच ही एक कविता..... मात्र ही कविता वाचली आणि अगदी खोल मनाला स्पर्शून गेली. वाचल्यापासून ती मनात घोळत होती; आणि वाटलं या कवितेनंतर मनात आलेले विचार तुमच्यासोबत शेअर केलेच पाहिजेत....
(कविता.....
कृष्ण भेटायलाच पाहिजे.
आयुष्यात प्रत्येक वळणावर
कृष्ण भेटायलाच पाहिजे.