सुंदरा मनामध्ये भरली

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जनातलं, मनातलं
3 Sep 2020 - 7:31 pm

सुपरमार्केटमध्ये जायचं म्हणून अगदी निगुतीनं यादी करावी आणि येताना यादीत नसलेले दोनचार जिन्नस तरी अधिक घेऊन घरी यावं तसं माझं शिकवताना होतं. मनातल्या मनात आज काय शिकवायचं याचं कितीही नियोजन केलं तरीही बायोलाॅजीबरोबर कधी फिलाॅसाॅफी, कधी सोशोलाॅजी तर कधी सायकोलाॅजीला हात लावून यावं हे ठरलेलं.
त्या दिवशीही तसंच झालं. बारावी सायन्सवर माझं लेक्चर होतं. Sex determination in different individuals हा टाॅपिक होता. त्याआधीचा बराचसा भाग केवळ माहितीवर आधारित (descriptive) असल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचे थोडेसे कंटाळलेले भाव जाणवत होते. तरीही थोडं पुढे रेटत शिकवणं चालूच ठेवलं...मनुष्यप्राण्यांचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांमध्ये XX प्रकारची गुणसूत्रे (chromosomes) असतात तर पुरुषांमध्ये XY. त्यामुळे स्त्रीबीज हे एकाच प्रकारचे असते तर पुरुषबीज मात्र दोन प्रकारचे. त्यामुळे sex of the child is determined by the male gamete that fertilises the female gamete. पण पक्ष्यांमध्ये मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती. नरपक्ष्यामध्ये ZZ म्हणजे एकाच प्रकारची गुणसूत्रे असतात तर मादीपक्ष्यामध्ये ZWअशी वेगळी. त्यामुळे त्यांच्यात females are resposible for determining sex of their babies... मुलांच्या इंटरेस्टचा खाली आलेला ग्राफ थोडा उंचावण्यासाठी यानंतर म्हटलं की नरपक्ष्याकडे एकाच प्रकारचे बीज असल्यामुळे तेच देण्याशिवाय त्याला गत्यंतर नसते. या कमतरतेवर मात करण्यासाठी म्हणूनच की काय निसर्गाने नरपक्ष्याला मादीपेक्षा काहीतरी 'विशेष गुण' किंवा 'रूप' देऊन आकर्षक बनवलं. उदा. कोकीळ पक्ष्याला मंजुळ आवाज दिला किंवा मोराला लांडोरीपेक्षा अधिक सुंदर बनवलं....so now I think you all can guess... what do I mean to suggest from this... Yes..that might be the reason due to which in humans females are more beautiful than males. ...म्हणून साैंदर्याचं वरदान मनुष्यप्राण्यांमध्ये स्त्रियांना मिळालं. वर्गात लगेच हशा पिकला.
....आणि तेवढ्यात पहिल्याच बाकावरून आवाज आला." Miss, I am an exception for this." माझ्या काळजात एकदम चर्र झालं आणि आपण विषय किती इंटरेस्टिंग करून शिकवतो हा उन्मादही एका क्षणात विरून गेला. त्या मुलीकडे धीर करून नजर वळवली तर दिसायला खूप सुंदर नसली तरी चारचाैघींसारखी होती ती. पण वागण्याबोलण्यात एक बेफिकीरी जाणवायची. टाॅमबाॅयसारखी राहायची म्हणून मुलींसारखं नटण्यामुरडण्यात, साैंदर्यात फारसा रस नसेल असं वाटायचं; पण त्या दिवशी कळलं साैंदर्याबद्दल हा न्यूनगंड होता म्हणून तिने टाॅमबाॅयसारखं राहणं पसंत केलं होतं. एका क्षणात कारण (because) आणि परिणामांचे (so) संदर्भच बदलून गेले. विस्कटलेलं सावरायला तर हवंच होतं, तेही तिला अवघडल्यासारखं, समजूत काढत असल्यासारखं वाटू न देता. त्या क्षणी मी कितीही तिला तिच्या साैंदर्याबद्दल ग्वाही दिली असती तरी नसतं पटलं तिला. मग म्हटलं ," अगं, मी विशेष गुणाबद्दल पण म्हटलंय...आणि पक्ष्यांचंच उदाहरण द्यायचं झालं तर केवळ मोराचं रूप किंवा कोकीळ पक्ष्याचा मंजुळ आवाज म्हणजे मिळालेलं वरदान नव्हे, सुगरण पक्ष्याचं घरटं बघितलंय? इतकं सुंदर घरटं विणण्याची कलादेखील नराला अवगत असते. तेही वरदानच की. If 'you' say that you don't have beauty, then start exploring yourself to find out what you have."
मला खात्री आहे; ज्या दिवशी तिला ते सापडेल, त्याच दिवशी तिला तिच्यातलं साैंदर्यही दिसायला लागेल...आणि आरशात न बघतादेखील तिच्यातलीच सुंदरा तिच्या मनात निश्चित भरेल.

अनुभव

प्रतिक्रिया

गणेशा's picture

3 Sep 2020 - 9:49 pm | गणेशा

If 'you' say that you don't have beauty, then start exploring yourself to find out what you have.

कित्येक शिक्षकांनी वेळोवेळी असे मना मनाचे बांध पुढच्याच्या सायकॉलॉजी प्रमाणे सांधल्याने कित्येक आयुष्य सुंदर झाली असतील..

Everybody should proud for this type of teachers.

__^__

शाम भागवत's picture

3 Sep 2020 - 10:10 pm | शाम भागवत

मस्तच उत्तर

Bhakti's picture

4 Sep 2020 - 7:43 am | Bhakti

अय्या.. आपण दोघी life science वंशातल्या आहोत.आनंद वाटला.प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो (with special characters )त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे. शिक्षक म्हणून आपण त्यांच अलगद बोट धरलं पाहिजे.

तुमच्या या उत्तराने नक्कीच ती सुखावली असणार.मस्त मस्त..
start exploring yourself to find out what you have.
I will add in this
Life is beautiful ,is precious live with full of Joy.. Everyone's​ smile is it's beuty..Keep smiling.. Enjoy your own identity.""

गवि's picture

4 Sep 2020 - 8:08 am | गवि

झकास. आवडलं...

सहज मनात आलेली एक गोष्ट, जी इतरत्रही वाचताना जाणवते की पुरुष XY म्हणून पुरुष हा अपत्याच्या लिंगनिश्चितीसाठी जबाबदार (इंग्रजीत responsible) असतो अशी शब्दरचना सहज केली जाते. त्यात विशिष्ट उद्देश नसतो. किंवा कदाचीत स्त्रीला या बाबतीत "जबाबदार", "दोषी" वगैरे ठरवण्याची अत्यंत दुरित प्रथा समाजात असल्यामुळे त्याची प्रतिक्रिया म्हणून पुरुषाबाबत तोच शब्दप्रयोग केला जात असू शकेल.

पण पुरुषही याला "जबाबदार" असतो असे म्हणता येणार नाही. कारण नेमके आऊटकम काय असेल हे अत्यंत random असल्याने त्यालाही त्याबाबत काही चॉइस नैसर्गिकरित्या नाहीये (म्हणजे अमुक एका लिंगाचे अपत्य पुरुषामुळे जन्माला आलं असं म्हणता येत नाही)

पुरुष हा अपत्य लिंगातील फरकाचे "कारण" असतो, स्त्री नव्हे असं म्हणता येईल.

चौथा कोनाडा's picture

4 Sep 2020 - 1:05 pm | चौथा कोनाडा

+१
"जबाबदार" आणि "कारण" ... छान पद्धतीने मांडलंय !

विनिता००२'s picture

4 Sep 2020 - 10:31 am | विनिता००२

छान ! आवडले :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2020 - 1:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! मस्त, आवडले. अशाच वर्गशिक्षिका लाभल्या पाहिजेतम सर्व विद्यार्थ्याना. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

अनन्त्_यात्री's picture

4 Sep 2020 - 2:10 pm | अनन्त्_यात्री

गोष्टीला अपवाद आहोत हे उघडपणे सांगण्याचे धैर्य होते तिला त्याच गोष्टीचा न्यूनगंड होता हे गृृृृहित पटले नाही.

मी-दिपाली's picture

5 Sep 2020 - 11:20 am | मी-दिपाली

त्या न्यूनगंडावर तिने तिच्यापरीने उपाय शोधला होता. पण तो uproot झाला नव्हता.
जखम वरून बरी होणं आणि आतून बरी होणं यात फरक असतो.
एखाद्या समोर व्यक्त होणं हे त्या समोरच्या व्यक्तिने कमावलेल्या विश्वासावर अवलंबून असतं, त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठीच कदाचित त्या क्षणी तिला बोलावंसं वाटलं असेल.

नेत्रेश's picture

5 Sep 2020 - 4:05 am | नेत्रेश

पुरुष X व Y दोन्ही गुणसूत्रे देतो, पण X आणी Y मधले काय घ्यायचे हा चॉईस शेवटी स्त्रिचाच असतो ना?

मी-दिपाली's picture

5 Sep 2020 - 11:10 am | मी-दिपाली

समस्त वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार.

गवि तुमचा मुद्दा रास्त आहे. रुढार्थाने जबाबदार असा अर्थ होत नाहीच. निसर्गतः होणार्‍या निवडीचं पुरुष माध्यम ठरतो. That too not by his choice.

कदाचित स्त्रीला या बाबतीत "जबाबदार", "दोषी" वगैरे ठरवण्याची अत्यंत दुरित प्रथा समाजात असल्यामुळे त्याची प्रतिक्रिया म्हणून पुरुषाबाबत तोच शब्दप्रयोग केला जात असू शकेल.

कदाचित याचाच परिणाम म्हणून माझ्या लेखातदेखील दोन वेगवेगळ्या वाक्यरचनांचा नकळतपणे प्रयोग केला गेला.

१) sex of the child is determined by the male gamete that fertilises the female gamete.
२) females are responsible for determining sex of their babies... (पक्षांच्या बाबतीत)

उलट इथे पक्षी का असेना पण मादीच्या बाबतीतच responsible (जबाबदार) हा शब्द वापरला गेला.

प्रसाद गोडबोले's picture

6 Feb 2022 - 1:37 pm | प्रसाद गोडबोले

.so now I think you all can guess... what do I mean to suggest from this... Yes..that might be the reason due to which in humans females are more beautiful than males.

पटले नाही शिवाय त्यांनंतर तुम्ही दिलेले स्पष्टीकरण तर अतिषयच चुकीचे वाटले . मुळातच beautiful ही संकल्पना मानवनिर्मीत आहे. निसर्गात beautiful असे काही नसते. ज्याला माणसे beautiful म्हणतात त्यासाठी खरा योग्य शब्द आहे फिजिकल फिटनेस . जे जे सौंदर्यांचे ट्रेट्स आहेत ते ते सारे सेक्सुअल रीप्रॉडक्शन साठी आपण तयार आहोत , आपण फिट आहोत हे दर्शवणाचे ट्रेट्स आहेत , उदाहरणार्थ सिंव्हाची आयाळ , हत्तीचे हस्तिदंत सुळे , हरीण चिंकारा मुज ची शिंगे , गोरिला मध्ये सिल्व्हर बॅक अर्थात चंदेरी केस . हे सर्वच्या सर्व ट्रेट्स मेल्स मध्ये असतात म्हणुन काय फीमेल्स कुरुप ठरत नाहीत त्यांचे सौंदर्याचे अर्थात फिजिकल फिटनेस चे ट्रेट्स भिन्न असतात.

माणासातही हेच आहे . रुंद खांदे , स्नायुयुक्त पिळदार छाती आणि हात , पोटावर अगदी नाममात्र चरबी , भरगच्च दाढीमिशा हे सारे पुरुषातील फिटनेस चे सौंदर्याचे ट्रेट्स आहेत तसेच लांबसडक केस, नाजुक त्वचा , भारदार स्तन , कमनीय कटी , प्रशस्त नितंब हे स्त्रीयांमधील फिजिकल फिटनेस अर्थात सौंदर्याची लक्षणे प्रतिके आहेत .

पण त्या दिवशी कळलं साैंदर्याबद्दल हा न्यूनगंड होता म्हणून तिने टाॅमबाॅयसारखं राहणं पसंत केलं होतं

समजा ती मुलगी टॉमबॉय सारखी दिसत असेल तर ती निसर्गाच्या मानकांनुसार स्त्री म्हणुन अनफिट , कुरुपच आहे !
"सर्वच जण सुंदर असतात , beauty comes in all shapes and sizes" हा आधुनिक निओमार्क्क्षिस्ट गाढवपणा आहे , दुसरे काही नाही.

मी जर त्या मुली समोर असतो तर मी तिला सांगितले असते की - "होय , निसर्गाचा अन विज्ञानाच्या परिमांणांच्याअनुसार तु कुरुप आहेस पण ही काही परमनंट स्थिती नाही, लांब केस वाढव, त्वचेची निगा राख, त्वचेचा रंग महत्वाचा नाही तर तकाकी महत्वाची असते , नियमीत व्यायाम कर , स्तनकटीनितंब योग्य त्या प्रमाणात आण , बॉडीमास इंडेक्स योग्य त्या लेव्हला आण , मासिक धर्माची अनियमितता असेल तर डॉक्टरांना भेट , योग्य ती हार्मोनल ट्रीटमेंट घे कारण ह्या एका गोष्टीने बाकी सार्‍या गोष्टी आपोआप नियमीत होतील अन तुही नक्की सुंदर दिसशील ! मनाचे संदर्यही महत्वाचे आहेच पण ...but it does not supersede phyisical beauty. "

असो.

अवांतर : हे असे स्पष्टवक्तेपणा मुळे आम्हाला कॉलेजात अगदीच मोजक्या गर्लफ्रेंड्स लाभल्या , पण ज्या लाभल्या त्या पर्फेक्ट होत्या . Pauca sed matura ;)

अमेरिकन त्रिशंकू's picture

6 Feb 2022 - 5:05 pm | अमेरिकन त्रिशंकू

Pauca sed matura

एकदम गाउस??? पण बरोबर बसतंय या संदर्भात

nutanm's picture

15 Feb 2022 - 11:59 am | nutanm

pauca sed matura म्हणजे ? जरा स्पष्टीकरण द्याल तर माझ्यसारखीला जिचा science या विषयाशी फारसा संबध न आलेलीला व्यवस्थित समजेल. तसेच "एकदम गाउस " पण बरोबर बसतय या संदर्भातचाही अर्थ व reference to context द्यालच.

अमेरिकन त्रिशंकू's picture

22 Feb 2022 - 12:48 am | अमेरिकन त्रिशंकू

इंग्रजीमधे लिहितोय माफ करा.

Gauss was a German mathematician and he along with Archimedes and Newton are considered the three best mathematicians in the history of mathematics. He was a perfectionist and refused to publish work which he did not consider complete and above criticism.
e.g. he had developed foundations of non-Euclidian geometry a couple of decades earlier than when it was officially published by Bolyai and Lobachewski. Gauss did not publish his work because he did not consider it complete in his mind.

Gauss’ personal motto in Latin was “Pauca sed Matura” ("few, but ripe").

https://en.wikipedia.org/wiki/Carl_Friedrich_Gauss