मराठी दिन २०१८: मणी गोष्ट..............(अहिराणी)
मणी गोष्ट..............
एक गाव मां एक राजा रास. त्याले एक पत्नी आणि पोरे रातस.
राजा एकदम साधा माणूस रास. त्यान गावं बी खूश रास. राजा ना पोरे आण प्रजा ना पोरे एकच शाळा मा जातस.
एक दिन काय व्हस ; दुसरा गाव ना राजा त्याले निरोप धाडस. " तू मनासंगे युद्ध कर , मी तुले हराई टाकसू"
मग राजा बोलस त्याले तु मन गाव बरबाद करी टाकशी त्यानापेक्षा आपण एक युक्ती करु. अमना गामना गावं मां आपण एक वादविवाद स्पर्धा ठेऊ . जर तुमी माले हारी टाक तर हाई गावं तुनं . राजा अशी अट टाकस.'त्या प्रमाणे एक दिन तो दुष्ट राजा येस येवाण ठरावस.