!!बालदीन !!
असूया वाटते बघुनीया माथी केशसंभार
कसा आनंद घेऊ या तरूण मुलांसवे
लोपलेल्या केशकुंतलांच्या परागंदा मुळापासून
मिळते तुम्हा सुख नित काका अंकल संबोधून
किंचित केशकर्तनाचा कृष्ण दिवस आज
मस्तक वाळवंटी म्हणती त्यास खालदिन
छप्पर असता भाळी,मान वळे तारूण्याची
नजर देतसे दाद, नित देव कोंबड्यांची
शिलकीच्या तबल्यासम बालतळावर
स्कॉलरपणाची सुरेख नक्षी काढू
अनुभवांचे मीपण करूनी दिवसाही तारे तोडू
उद्याचे आदर्श नागरिक आजच (हि) घडवू
-झुल्पांकित (संतप्त खात्री कैवार पसार )
२२ जून २०१७
प्रतिक्रिया
14 Nov 2017 - 12:46 pm | प्रचेतस
बाल दिनाच्या दिवशी बाल दीन झालेल्या व्यक्तीचे उसासे उत्कटरीत्या तुम्ही तुमच्या लेखणीद्वारे मांडले आहेत.
15 Nov 2017 - 5:36 pm | अत्रुप्त आत्मा
आगोबाच्या आशयसंपण्ण प्रतीभांकित परतीसादाशी म्या शहमट हाय!
14 Nov 2017 - 5:45 pm | ज्ञानोबाचे पैजार
वाचताना गहिवरुन आले..
पैजारबुवा,
14 Nov 2017 - 11:37 pm | एस
समजू शकतो.
15 Nov 2017 - 10:01 pm | पैसा
अर्रर्रर्र