(वास्तव किचन)

अहिरावण's picture
अहिरावण in जे न देखे रवी...
15 Sep 2023 - 1:58 pm

प्रेरणा - सर्वज्ञात

चालु होते माझे
रोजचेच काम
रोजचाच घाम
गॅसपाशी

एकीकडे होते
तांदुळ शिजत
दुधही तापत
दुजीकडे

लाटून कणिक
पोळ्या मऊसुत
गंध सुगंधित
खरपुस

इतक्यात येई
सख्याची ती साद
भलतीच याद
भलत्या वेळी

काय करावे ते
सुचेना काहीच
भर दुपारीच
चांदणे ते

मोहरले मीही
काम बंद केले
हात ही पुसले
पदराला

जवळ येऊनी
सख्या साजणाने
ओढले हाताने
अलगद

दुपारची वेळ
करुया साजरी
कशाला लाजरी
होत आहेस

इतक्यात काय
झाले ते कळेना
आशंकीत मना
भिती दाटे

चल हो तु पुढे
येते मी मागुनी
थोडे आवरुनी
पटकन

वेळ नको लाऊ
सखा आर्जवित
गेला बिछान्यात
आतुरतेने

मनीची भिती
खरी ठरली ती
आपदा भलती
भलत्या वेळी

शय्यागृही जात
साजणा बोलले
बेत बदलले
नको आता

काय झाले सोनु
विचारी साजण
आनंदी विरजण
काय बरे

काय सांगु आता
दुर्देव ते माझे
स्त्रीत्वाचेच ओझे
"प्रॉब्लेम" झाला

काहीच्या काही कविताबालकथा

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

15 Sep 2023 - 2:01 pm | सौंदाळा

अरेरे, अगदी केएलपीडी का काय म्हणतात ते झाले नेमके

गड्डा झब्बू's picture

15 Sep 2023 - 2:24 pm | गड्डा झब्बू

अवकाळी पावसामुळे सामना रद्द!!! :-) :-)

कानडाऊ योगेशु's picture

15 Sep 2023 - 3:17 pm | कानडाऊ योगेशु

...
सख्या वदे मज...
सोनु..काय झाले..
मी हळूच म्हणाले...
अ...ड...च..ण...! :)

अहिरावण's picture

15 Sep 2023 - 7:23 pm | अहिरावण

क्या बात !

हाच जन्मजात कवी आणि ओढून ताणून कवीमधला फरक असतो.. :)

कर्नलतपस्वी's picture

15 Sep 2023 - 7:44 pm | कर्नलतपस्वी

ऐकूनी मंद नाद घुंगरांचा
काय झाले? सख्याने पुसता
ती हळूच म्हणाली त्याला
कावळा मज शिवला

रंगीला रतन's picture

15 Sep 2023 - 10:31 pm | रंगीला रतन

अफाट!

सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे, कविता ज्यांना कळाली त्यांचे आभार आणि अभिनंदन !