(पितृभाषा)
तूम्ही
भकार,
मकार, गकाराने
सुरु होणारे शब्द उच्चारत
माझ्या एक
सणकन कानफाटीत मारता,
तेव्हा
मी तुमचे
राकट् हात
लालसर डोळे
पहात राहतो.
तुम्हाला पाहुन जीव इतका का घाबराघुबरा व्हावा?
तुम्ही माझे मनगट
कचकन पिरगळून
पाठीत दणका घालता,
पितृभाषा कि काय
तिच्यातच जीव जातो बघा,
बापाचा माल आहे का? म्हटल्याशिवाय
वाक्य सुध्दा पूर्ण होत नाही....