अबोला..
तुझ्या एका अबोल्यानं
उदासली फुलदाणी.
जीव झाला वेडापिसा
आणि काळजाचं पाणी..
तुझ्या एका अबोल्याची
कशी खुलावी रे कळी?
सुचेनासे होते काही
लोकं म्हणतात खुळी.
तुझ्या एका अबोल्यात
किती चंद्र गेले वाया..
अरे वेड्या, पाऊसही
आता आला नं संपाया!
तुझ्या एका अबोल्याशी
आता माझाही अबोला,
बघतेच किती वेळ
झुलतो हा खेळझुला!
तुझ्या एका अबोल्याशी
मस्त!
तुझ्या एका अबोल्याशी
ज्ज़े बात.
तुझ्या एका अबोल्याशी
क्या बात... क्या बात... क्या बात
सुरेख कविता!
अनुभवाचे बोल खालील प्रमाणे
हाहा!
मस्त.
व्वा, सुंदर!
:):)
खेळझुला
खूपच सुरेख
सर्वांना मनापासून धन्यवाद!
सुरेख
सुरेख
_________/\_________
इंदिरा संतांची
खरेच मलाही अगदी हेच वाटले.
चांदणे संदीप आणि अनंतयात्री,
खूप सुरेख कविता!
सुरेख कविता.
विजुभाऊ, अभिजित आणि श्वेता..